Winter Update 2025 मुंबई: उत्तर भारतातून दक्षिणेकडे पुन्हा थंड वारे वाहण्यास सुरुवात झाली असल्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर कोकणचा किमान तापमानाचा पारा शनिवारपासून खाली येणार आहे.

Winter Update 2025 मुंबईचे किमान तापमान 17, तर राज्यभरातील किमान तापमान 10 अंश सेल्सियसपर्यंत राहणार आहे. जेष्ठ हवामान शात्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात थंडीची शक्यता आहे.
रासायनिक खतांच्या दरामध्ये झाली पुन्हा वाढ, कोणत्या खताच्या किंमतीत किती रुपयाने वाढ?
Winter Update 2025 यामध्ये पुणे जिल्ह्यासह लगतच्या परिसराचा समावेश असेल, तर मराठवाड्यातही पारा खाली उतरणार आहे. 1 ते 3 डिसेंबरपर्यंत थंडी कायम राहील. उत्तर कोकणातही सकाळी किमान तापमानाचा पारा खाली येईल.

Winter Update 2025 नागपूरचे किमान तापमान 13.6
विदर्भात थंडी परतली असून, शुक्रवारी नागपूरचे किमान तापमान 13.6 अंश सेल्सियस नोंदले गेले, जे मागील 14 तासात 4 अंशांनी कमी झाले आहे. भंडाऱ्याचा पारा 10 अंश सेल्सियसपर्यंत घसरला तर गोंदियाचे किमान तापमान 11 अंश सेल्सियस नोंदवले गेले.
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |