Wheat Cultivation Technology 2025 महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या अन्नधान्य पिकांपैकी गहू हे रब्बी हंगामातील एक महत्वाचे पीक आहे. गहू हा जिरायत व बागायत अशा दोन्ही प्रकारे घेतला जातो.

Wheat Cultivation Technology 2025 गव्हाचे उत्पादन वाढविण्यासाठी सुधारित तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उत्पादनात भरघोस वाढ करणेही शक्य होईल. यामध्ये अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांचा वापर वेळेवर पेरणी योग्य अंतरावर पेरणी शिफारशी प्रमाणे खतांचा वापर तणनियंत्रण सावेंदनशील अवस्थेत पाणी व्यवस्थापन आणि पीक सौरक्षण या उतपादन तंत्राचा अवलंब करावा.
जैविक रोगनियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा एक जैविक वरदान!!
जमीन: Wheat Cultivation Technology 2025
गव्हाच्या अपेक्षित उत्पादनासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी जिरायत गहू मात्र ओलावा टिकवून धरणाऱ्या भारी जमिनीतच घ्यावा.

हवामान: Wheat Cultivation Technology 2025
गहू पिकासाठी थंड कोरडे आणि स्वच्छ सूर्यप्रकाशित हवामान चांगले मानवते गहू पिकाच्या वाढीसाठी साधे 21°c तापमानाची आवश्यकता असते वेळी याच्या वेळी थंडी पडण्यास फुटव्यांची संख्या वाढण्यास स मदत होते दाणे भरण्याच्या वेळी 25 °c तापमान असल्यास ओंबीची लांबी दाण्याची संख्या आणि दाण्याचा आकार वाढवण्यास मदत होते. थंडीचा कालावधी वाढल्यास उत्पादनात भर पडते आणि थंडी खंडित झाल्यास उत्पादनावर परिणाम होतो.
मशागत: Wheat Cultivation Technology 2025
गहू पिकाच्या मुळ्या जमिनीत 60 ते 75 सेमी खोलवर जातात. म्हणून या पिकासाठी नांगरट व कुळवणी करून जमिनीची मशागत करावी. शेवटच्या कुळवणीच्या आधी हेक्टरी 8 ते 10 टन कुजलेले शेणखत मिसळून घ्यावे. सोयाबीन पिकाच्या बेवडावर गव्हाच्या पिकाचे उत्पादन अधिक येत असल्याचे प्रयोगांती सिद्ध झाले आहे. त्या पिकानंतर फणपाळी किंवा रोटाव्हेटर वापरून राण तयार करावे.
सुधारित वाण:
गहू संशोधन केंद्र निफाड येथून संशोधन केलेला सुधारित जाती तक्ता क्रमांक. 1 मध्ये दिल्या आहेत. सण 2014 मध्ये फुले समाधान हा नवीन वाण बागायतीसाठी वेळेवर व उशिरा पेरणीस शिफारस केला आहे. सन 2017 मध्ये कोपरगाव तालुक्यात फुले समाधान या वानाचे एकराप्रमाणे 40 शेतकऱ्यांच्या शेतावर प्रात्यक्षिके घेण्यात आली. त्यामध्ये फुले समाधान वाणाने एकरी 18 ते 20 क्विंटल उत्पादन मिळाले. त्या परिसरातील प्रचलित वाणापेक्षा हे उत्पादन 20 टक्क्यांनी अधिक मिळाले.
शिफारस केलेले सुधारित गव्हाचे वाण:
सुधारित वाण: जिरायतीसाठी, नेत्रावती (एनआयएडब्ल्यू- 1415), प्रसारण- 2010
वैशिष्ठ्ये- द्वीपकल्पीय या विभागातील जिरायती किंवा एका ओलिताखाली वेळेवर पेरणीसाठी तांबेरा रोगास प्रतिकारक प्रथिने 12 टक्क्यांपेक्षा जास्त, चपातीसाठी उत्तम लोह 43 पीपीएम, जस्त 55.5 पीपीएम, 105-110 दिवसात कापणीस तयार, उत्पादन: जिरायत 18 ते 20 क्विंटल एक सिंचन -22 ते 25 क्विंटल/हेक्टर.
सुधारित वाण: जिरायतीसाठी पंचवटी (एनआयडीडब्ल्यू-15), प्रसारण- 2002
वैशिष्ठ्ये- जिरायती पेरणीसाठी, उत्तम बन्सी वाण, दाणे टपोरे, चमकदार आणि आकर्षक, प्रथिनांचे प्रमाण 12 टक्के तांबेरा रोगास प्रतिकारक रवा, शेवया, कुरडया यासाठी उत्तम, पीक 105 दिवसात कापणीस तयार, उत्पादन क्षमता 12 ते 15 क्विंटल प्रतीकेक्टरी.
सुधारित वाण: बागायती शेतीसाठी, फुले समाधान (एनआयएडब्ल्यू-1994), प्रसारण- 2014
वैशिष्ठ्ये-अधिक उत्पादन देणारा वाण, बागायती वेळेवर पेरणीसाठी आणि बागायत उशिरा पेरणीसाठी एकमेव सरबती वाण, तांबेरा रोगास प्रतिकारक, प्रथिने 12% पेक्षा 115 दिवसात कापणीस तयार कापणीस तयार, उत्पादन क्षमता 45 ते 50 क्विंटल प्रतीकेक्टरी.
सुधारित वाण: बागायती शेतीसाठी, गोदावरी (एनआयडीडब्ल्यू-295), प्रसारण- 2005
वैशिष्ठ्ये-बागायत वेळेवर पेरणीसाठी उत्तम आनंदाने टपोरे चमकणारा आणि आकर्षक प्रतलाचा 12% पेक्षा अधिक तांबेरा रोगास प्रतिकारक रवा, शेवया, कुरडया यासाठी उत्तम वाण, पीक 110 ते 115 दिवसात कापणीस तयार, उत्पादन क्षमता 45 ते 50 क्विंटल प्रतीकेक्टरी.
पेरणीची वेळ: Wheat Cultivation Technology 2025
जिरायत गव्हाचे पेरणी ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात करावी, तर बागायती गव्हाची पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. या कालावधीत पेरणी केलेल्या फुटव्यांची संख्या, दाण्यांची संख्या, दाण्याचा आकार आणि वजन वाढून अपेक्षित उत्पादन मिळते. थंडी उशिरा सुरू झाल्यास उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकास त्याचा फायदा होतो. बागायती गव्हाची पेरणी 15 नोव्हेंबरनंतर केल्यास प्रत्येक पंधरवड्यात हेक्टरी 2.5 क्विंटल उत्पादन कमी येते. तसेच उसाची तोडणी झाल्यानंतर गव्हाचे पीक घेतले जाते. तथापि 15 डिसेंबर नंतर गव्हाची पेरणी केल्यास उत्पादनात घट येते.
बियाणे व बीजप्रक्रिया:
गव्हाची वेळेवर पेरणी करण्यासाठी हेक्टरी 100 ते 125 किलो बियाणे वापरावे उशिरा पेरणीस 125 ते 150 पेरणीपूर्वी बियाण्यास कॅप्टन किंवा थायरम्य या बुरशीनाशकाची 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. तसेच प्रति 10 किलो बियाण्यास अझाटोबँक्टर व 250 ग्रॅम पीसीबी या जिवाणू संवर्धन खताची बीजप्रक्रिया करावी. यामुळे गव्हाची प्रत व उत्पादनात 10 ते 15 टक्के वाढ होते. जमिनीची चांगले मशागत झाल्यानंतर बियाणे पेरावे म्हणजे बियाणे जास्त खोल जाणार नाही आणि उगवण 95 ते 100% होते.
पेरणी: Wheat Cultivation Technology 2025
यापूर्वी गव्हाची पेरणी दोन ओळीत 22.5 सेमी अंतर ठेवून करावे अशी शिफारस होती. अंतराबाबत पुन्हा प्रयोग घेण्यात आले त्यामध्ये दोन ओळीत 20 सेमी अंतर ठेवून गव्हाची पेरणी केल्याने उत्पादन वाढल्याचे दिसून आले तर पेरणीस उशीर झाल्यास दोन ओळीत अंतर ठेवून पेरणी करावी ट्रॅक्टरने पेरणी करत असताना बियाणे 5 सेमी पेक्षा जास्त खोल जाणार नाही याची दक्षता घ्यावी. पाण्याचा प्रवाह, जमिनीचा उतार व प्रकार लक्षात घेऊन गाव्हासाठी 2.5 ते 3 मीटर रुंदीचे सरे पाडावेत.
अन्नद्रव्य व्यवस्थापन:
माती परीक्षण अहवालानुसार अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी जास्त असल्यास त्याप्रमाणे खते कमी करावीत किंवा वाढून द्यावीत. बागायती गव्हाच्या वेळेवर पेरणीसाठी हेक्टरी 8 ते 10 टन पूर्ण कुजलेले शेणखत आणि लोहाची कमतरता असणाऱ्या जमिनीत 20 किलो हिराकस 100 किलो शेणखतात 15 दिवस मुरवून नंतर द्यावे. जिरायत पेरणी करताना संपूर्ण नत्र आणि स्फुरद पेरणीच्या वेळी द्यावे.
महाराष्ट्रातील बागायती क्षेत्रात गव्हाचे अधिक उत्पादन मिळवण्यासाठी 2 टक्के 19:19:19 या विद्राव्य खताची किंवा 2 टक्के डीएपी(200 ग्रॅम 10 लि. पाणी.) या खताची फवारणी 55 आणि 70 दिवसानंतर केल्याने उत्पादनात 17 टक्के वाढ झाल्याचे प्रयोगांती आढळून आले आहे. त्याचप्रमाणे गव्हाच्या पिकात खतांच्या ब्रिकेटचा वापर या तंत्रात पेरणीपूर्वी हेक्टरी 1 टन शेणखत द्यावे. त्यानंतर गव्हाची पेरणी जोड ओळीत (15 ते 30 सेमी) करावी. पेरणी नंतर हेक्टरी 70:35 नत्र-स्फुरद किलो, युरिया-डीएपी ब्रिकेट 15 सेमी अंतराच्या जोड ओळीत प्रत्येकी 30 सेमी अंतरावर 10 सेमी खोल खोचावी.
पाणी व्यवस्थापन:
गव्हाच्या पिकास हेक्टरी (40 लाख लिटर) पाणी लागते. पेरणी शेत ओलावून वापसा आल्यावर करावे. कोरड्यात पेरणी केल्यास पेरणीनंतर पाणी देऊन त्यानंतर आंबवणीचे पाणी द्यावे. त्यापुढे 21 दिवसांच्या अंतराने चार पाणी द्यावेत. मध्यम जमिनीत एक जास्त पाणी गरजेनुसार द्यावे. पीक वाढीच्या काळात पुढील संवेदनशील अवस्थेत पाणी देणे फायदेशीर ठरते.
पाणी | पाणी देण्याची वेळ | पिकाची अवस्था |
पहिले पाणी | पेरणीनंतर 18 ते 21 दिवसांनी | मुकुटमुळे फुटण्याचे सुरुवात |
दुसरे पाणी | पेरणीनंतर 40 ते 45 दिवसांनी | कांडी धरणाची अवस्था |
तिसरे पाणी | पेरणीनंतर 60 ते 65 दिवसांनी | फुलोरा आणि चीक धरण्याची अवस्था |
चौथे पाणी | पेरणीनंतर 80 ते 85 दिवसांनी | दाणे भरण्याची अवस्था |
पुरेसे पाणी देणे शक्य नसल्यास पाण्याच्या उपलब्धतेनुसार केव्हा पाणी द्यावे याचाही अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये एकच पाणी देणे शक्य असल्यास ते 40 ते 45 दिवसांनी द्यावे. गहू पिकास पेरणीनंतर दोन पाणी देणे शक्य असल्यास, पहिले पाणी 18 ते 21 व दुसरे पाणी 60 ते 65 दिवसांनी द्यावे. तीन पाणी देणे शक्य असल्यास, पहिले पाणी 18 ते 21, दुसरे पाणी 40 ते 45 व तिसरे पाणी 60 ते 65 दिवसांनी द्यावे.
पाण्याच्या उपलब्धतेनुसार पेरणीसाठी पाण्याचा ताण सहन करणाऱ्या पंचवटी आणि नेत्रावती जातींची पेरणी करावी. तुषार सिंचनाच्या माध्यमातून पाणी दिल्यास 25 टक्के पाण्याची बचत होते. मात्र पीक चिकट आल्यानंतरचे पाणी प्रवाही पद्धतीने द्यावे.

पीक संरक्षण:
तांबेरा प्रतिबंधक उपाय म्हणून गव्हाची पेरणी वेळेवर करावी पिकावर तांबेरा दिसू लागतच मॅन्कोझेब हे बुरशीनाशक 1.5 किलो 500 लिटर पाण्यातून फवारावे. गरज भासल्यास दुसरी फवारणी पहिल्या फवारणी नंतर 15 दिवसांनी करावी. गव्हावर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. करपा रोगाचे नियंत्रण करण्यासाठी रोगाचे लक्षणे दिसू लागताच कॉपर ऑक्सिक्लोराईड 0.2% अधिक मॅन्कोझेब 0.2% या बुरशीनाशकांच्या मिश्रणाच्या दोन फवारण्या 15 दिवसांच्या अंतराने कराव्यात.
मावा व तुडतुडे या किडींच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट 30 इसी, 500 मिली किंवा थायोमिथोक्झाम 25 डब्ल्यू.जी 50 ग्रॅम असिटामाप्रिड 20 एस.पी. 250 ग्रॅम 500 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. गहू पिकावरील मावा किडीच्या जैविक नियंत्रणासाठी मेटॅ-हायझियम ऍनिसोपली किंवा व्हर्टिसीलियम लेकॅनी 1.15 टक्के डब्लू पी 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात, किडींचा प्रादुर्भाव दिसून येताच पहिली फवारणी आणि त्यानंतर 15 दिवसांनी दुसरी फवारणी करावी.
कापणी व मळणी:
पीक तयार होतात वेळेवर कापणी करावी कापणीस उशीर झाल्यास एन आय 5439 व एन आय डब्ल्यू 3001 त्र्यंबक या पडू शकतात म्हणून पीक पक्व होण्याच्या दोन ते तीन दिवस आधी कापणी करावी कापणीच्या वेळी दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण 15% असावे गव्हाची मळणी यंत्राच्या साह्याने करावी किंवा घनाचे कापणी व मळणी कम्बाईन हार्वेस्टर मशीन ने करावी.
उत्पादन: Wheat Cultivation Technology 2025
गव्हाचे भरघोस उत्पादन मिळवण्यासाठी पेरणीच्या वेळेनुसार योग्य वाणांचा वापर, योग्य रीतीने पेरणी बियाण्याचे प्रमाण, खतांचा समतोल वापर पाण्याच्या योग्य वेळी पाळ्या, अंतर मशागत व पीक संरक्षण या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. वरील प्रमाणे गव्हाची बागायती वेळेवर लागवड केल्यास हेक्टरी 45 ते 50 क्विंटल, बागायती उशिरा लागवड केल्यास 35 ते 40 क्विंटल व जिरायत लागवड केल्यास 12 ते 14 क्विंटल उत्पादन मिळते.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |