राज्यभरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

दूध उत्पादक शेतकऱ्यांच पाच रुपय थकीत दूध अनुदान सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती पुढे आली आहे

राज्य सरकारकडून 339 कोटी दुग्धविकास विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले आहे.  तर अनुदानासाठी 759 कोटी रुपयांना ही मंजुरी देण्यात आली आहे.

यापूर्वीच पाच रुपये अनुदान योजनेचे 538 कोटींचं अनुदान वाटप झाले असून राज्यभरातील 11 लाख 906 शेतकरी यामधून लाभार्थी ठरले आहे.

दरम्यान, दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत अनुदानासाठी 759 कोटी रुपयांना मंजुरी दिल्याने  दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी ठरली आहे.