साठवणुकीत कांद्याला मोड येऊ नये म्हणून करा हा सोपा उपाय; वाचा सविस्तर;

देशाचे 25 टक्के उत्पादन एकट्या महाराष्ट्रात आहे.

यासाठी साठवणूक हा चांगला पर्याय ठरू शकतो.

मात्र, या महत्त्वाच्या पिकात बाजारभावातील सततच्या चढउतारामुळे कायमस्वरूपी अस्थिरता आढळते.

 कांदा सावलीत वाळवला तर या काळामध्ये कांद्यामध्ये साठवलेली उष्णता हळूहळू बाहेर पडून कांद्याच्या बाहेरील सालीमधील पाणी पूर्णपणे आटून त्यांचे पापुदऱ्यात रूपांतर होते व त्याला आपण कांद्याला पत्ती सुटणे असे म्हणतो.

हे पापुद्रे किंवा पत्ती साठवणुकीत कवच कुंडलाचे काम करून कांद्याला सर्व प्रकारच्या नुकसानीपासून संरक्षण देतात.

 अतिरिक्त उष्णता व पाणी निघून गेल्यामुळे असा कांदा सडत नाही.

कांद्याभोवती पापुदऱ्याचे आवरण तयार झाल्यामुळे वातावरणातील आद्रता व रोगकिडीपासून त्यांचा बचाव होतो.

साठवणुकीत बाष्पीभवन रोखल्यामुळे वजनातील घट रोखली जाते.

कांदा पिकवणाऱ्या राज्यात क्षेत्र आणि उत्पादन या दोन्ही दृष्टीने महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात व आंध्र प्रदेश ही राज्ये आघाडीवर आहेत.