राज्यात पावसाबरोबरच गारपिटीचा इशारा, काय आहे IMD रिपोर्ट वाचा सविस्तर

राज्यात फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाच्या झळा सुरू झाल्या होत्या परंतु मागील दोन-तीन दिवसांपासून हवामानात अनेक बदल होताना दिसत आहेत.

त्यामुळे चक्रीवादळासारखे स्थिती निर्माण झाली असून हवामानात वेगाने बदल होताना दिसत आहेत.

कधी जास्त उष्णता तर कधी अचानक गारपीट अशी स्थिती सध्या देशभरात आहे. 

दक्षिण भारतातही काही राज्यांमध्ये गारपीट आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

IMD (आयएमडी) ने दिलेल्या माहितीनुसार दक्षिणेकडून पश्चिम बंगालच्या खाडीतून आणि गुजरातच्या दिशेने असे तीन सायक्लोनिक सर्क्युलेशन एकाच वेळी तयार झाली आहेत.

तर उत्तरेकडे उष्णतेची लाट आणि पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तर येथील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट आणि राज्यातील इतर काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई आणि कोकण पट्ट्यात उष्णता वाढवताना वाढताना दिसत आहे.

विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, वादळी वारे आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.