पंतप्रधान किसान सन्मान योजना चा लाभ देताना ओळख क्रमांक बंधनकारक केले आहे.
यासाठी राज्यभरातील तलाठी शेतकऱ्यांची नोंदणी करून त्यांना ओळख क्रमांक देत आहेत.
या जोडीला आता सामायिक सुविधा केंद्रामधूनही शेतकरी ओळख क्रमांक करून घेत आहेत.
भूमी अभिलेख विभागाने या पुढील टप्प्यात आता थेट शेतकऱ्यांना स्वतःच नोंदणी करण्याची सोय उपलब्ध करून देण्याचे ठरविले आहे.
शेतकऱ्यांकडे असलेली जमीन आधार क्रमांकाशी जोडून त्यांना स्वतंत्र ओळख क्रमांक देण्यासाठी राज्यात ॲग्री स्टॅक ही योजना राबविण्यात येत आहे.
त्यानुसार ॲग्री स्टॅकच्या पोर्टलवरून शेतकऱ्यांना स्वतः नोंदणी करता येणार आहे.
राज्यात या योजनेत आतापर्यंत 21 लाख 70 हजार 418 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.
त्यापैकी 21 लाख 68 हजार 632 शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी