बारमाही भाजीपाला शेतीसाठी भेंडी लागवड ठरते फायदेशीर !

बारमाही भाजीपाला शेतीसाठी भेंडी लागवड ठरते फायदेशीर !

भेंडीमध्ये आरोग्यासाठी आवश्यक विविध जीवनसत्वे, लोह, खनिजे मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने वर्षभर चांगली मागणी असते.

भेंडीच्या बियांपासून तेलही मिळू शकते.

हिरव्या भेंडीच्या तुलनेने लाल भेंडीमध्ये अँटिऑक्साइडंट, लोह, कॅल्शियमचे प्रमाण अधिक आहे.

भेंडीचा वापर कागद निर्मिती उद्योगांमध्ये केला जातो.

पंचतारांकित हॉटेल, मॉल, शहरी भागात या भेंडीला मागणी आहे.

भेंडी पिकाला उष्ण हवामान चांगले मानवते.

केवळ खरीप हंगामातच नाही तर रब्बी व उन्हाळी हंगामातही भेंडी लागवड करणे शक्य आहे.

हलक्या जमिनीपासून ते काळ्या जमिनीपर्यंत कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये पुरेसे सेंद्रिय पदार्थ असलेल्या जमिनीत या पिकाची वाढ चांगल्या प्रकारे होते.

मात्र, लागवड केलेल्या जमिनीतून पाण्याचा निचरा होणे आवश्यक असते.