ड्रोन खरेदीसाठी शेतकऱ्यांना मिळणार 4 लाख रुपये अनुदान, असा करा अर्ज

ड्रोन खरेदीसाठी शेतकऱ्यांना मिळणार 4 लाख रुपये अनुदान, असा करा अर्ज

कृषी क्षेत्रात ड्रोनच्या (मानव विरहित वायू यान) या वापरास पुरेशा संधी आहेत.

ड्रोन वापरामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात, वेळेत व श्रमात बचत होऊन रोजगार निर्मिती होऊ शकते.

विविध पिकांच्या वाढीच्या अवस्थेत कीटकनाशके, सूक्ष्म मूलद्रव्य, विद्राव्य खते फवारणी या बाबी व्यतिरिक्त कृषी क्षेत्राशी निगडित इतर कामासाठी देखील वापर करता येऊ शकतो.

 हे अशा जगात उत्पादन खर्च कमी करते जेथे श्रमांची किंमत सतत वाढत आहे.

शेतीतील कामाचा वेग वाढतो.

भारतीय शेतीत वापरात येणारी पारंपारिक ऊर्जा संसाधने यांचा दर वाढत असून, तो शेतक-यास परवडणारा नसून ऊर्जा किंवा शक्ती वापर दर हा फारच कमी आहे.

त्यामुळेच सध्य परिस्थतीत भारतीय शेतीत मोठया प्रमाणात योग्य आधुनिक शेती औजारे व यंत्रे वापरणे गरजेचे आहे.

शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी सहकारी संस्था आदींना 40 टक्के अनुदान रक्कम 4 लाख, कृषी व पदवीधर 50 टक्के अनुदान रक्कम 5 लाख अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, लहान व सीमांतिक/महिला शेतकरी यांना 50 टक्के अनुदान रक्कम 5 लाख, सर्वसाधारण शेतकरी 40 टक्के अनुदान रक्कम 4 लाख मिळू शकेल.