उन्हाळी हंगामात अखंडित सिंचनासाठी वीज पुरवठा सुरळीत ठेवा;

उन्हाळी हंगामासाठी प्रकल्पनिहाय सिंचनासाठी पाणीवापर व सिंचन आवर्तनाचे नियोजन करावे, असेनिर्देशही त्यांनी यावेळी दिले.

शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामात अखंडित सिंचन सुविधा मिळावी यासाठी वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यावर भर द्यावा.

यासाठी आवश्यक त्या उपाययोजना  तातडीने राबवाव्यात आणि संभाव्य  तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन अतिरिक्त रोहित्रे तयार ठेवावीत.

विधानभवनात सन २०२४-२०२५  उन्हाळी हंगामासाठी सांगली पाटबंधारे कालवा सल्लागार समितीची बैठक.

(टेंभू उ.सिं.यो., कृष्णा कोयना सिंचन प्रकल्पांतर्गत ताकारी व म्हैसाळ, आरफळ कालवा व  कृष्णा कालवा).  

धोमकण्हेर, उरमोडी व तारळी प्रकल्पांचे सन २०२४-२०२५ उन्हाळी  हंगामासाठी कालवा सल्लागार  समितीची बैठक झाली.

त्यावेळी जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील बोलत होते.

उपसा सिंचन योजना सुरळीत ठेवण्यासाठी कंत्राटी एजन्सी नेमण्यात  याव्यात, जेणेकरून शेतकऱ्यांना सुलभ  पद्धतीने सिंचन आवर्तन देता येईल.

तसेच उन्हाळी हंगामासाठी प्रकल्पनिहाय सिंचनासाठी पाणीवापर व सिंचन आवर्तनाचे नियोजन करावे, असेनिर्देशही त्यांनी यावेळी दिले.

पाटबंधारे प्रकल्प मंडळ येथील धोम, उरमोडी, कण्हेर व तारळी  प्रकल्पांचा आढावा घेऊन उपलब्ध पाणीसाठा, पाणीवाटपाबाबत चर्चा झाली.अधिक माहितीसाठी