उन्हाळ्यात तापमान नियंत्रणासाठी कसे कराल जनावरांच्या गोठ्याचे नियोजन?

उन्हाळ्यात तापमान नियंत्रणासाठी कसे कराल जनावरांच्या गोठ्याचे नियोजन?

उन्हाळ्यात टंचाई परिस्थितीमध्ये जनावरांचे व्यवस्थापन करताना आहार, निवारा, आरोग्य व स्वच्छ पाण्याचा मुबलक पुरवठा या बाबींवर लक्ष देणे आवश्यक आहे.

रोजच्या दुधाचे प्रमाण व दुधाची प्रत टिकून राहील.

अशावेळी जनावरांना गोठ्यात सुसह्य वाटावे यासाठी पशुपालन शेतकऱ्यांनी काय उपाययोजना कराव्यात.

सध्या उन्हाळी हंगाम असून काही ठिकाणी उष्मा खूप वाढला आहे

गोठ्याची उंची भरपूर असावी जेणेकरून गोठ्यात मोकळी हवा राहील.

उन्हाळ्यात जनावरांना हवेशीर गोठ्यात किंवा झाडाच्या दाट सावलीखाली बांधावे.

गोठ्याच्या छतासाठी सिमेंटचे पत्रे असणे केव्हाही चांगलेच, स्टीलचे पत्र असतील तर त्यावर गवत अंथरावे.

गोठ्याचा रंग पांढरा असावा.

गोठ्याभोवती दाट सावली देणारी झाडे लावावीत, त्यामुळे उन्हाळ्यातील गरम वाऱ्यापासून जनावरांचे संरक्षण होईल.