उन्हाळ्यात जमिनीच्या मगदूराप्रमाणे पिकांना पाणी कसे द्याल? जाणून घ्या सविस्तर;

उन्हाळ्यात जमिनीच्या मगदूराप्रमाणे पिकांना पाणी कसे द्याल? जाणून घ्या सविस्तर;

उन्हाळी पिक उत्पादनात पाणी हा अतिशय महत्त्वाचा घटक ठरतो.

पिकास पाणी देण्याच्या पद्धती ठराविक दिवसाच्या अंतराने पिकास पाणी देणे .

बाष्पीभवन पात्रातून पाण्याचे होणारे विशिष्ट प्रमाणातील बाष्पीभवन लक्षात घेऊन पिकास पाणी देणे .

उन्हाळी पिकांसाठी संवेदनक्षम अवस्था नुसार पाणी दिल्यास दोन पाण्यातील अंतर जास्त राहते.

पिकाच्या संवेदनक्षम अवस्थेत पिकास पाणी देणे याचा समावेश होतो.

उन्हाळी हंगामात वातावरणाची पाण्याची गरज खूपच जास्त असल्याने जास्त अंतराने दिलेल्या पाण्याने पिकाची गरज भागत नाही.

पर्यायाने पीक उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.

उन्हाळी हंगामात घेतलेल्या पिकांना जमिनीच्या प्रकारानुसार ठराविक दिवसाच्या अंतराने पाणी देणे गरजेचे असते.

एकंदरीत उन्हाळी हंगामात घेतलेल्या पिकांना जमिनीच्या मगदूराप्रमाणे 8 ते 10 दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे.