Vihir Anudan Yojana 2025 शेतकऱ्यांना नवीन विहिरीसाठी 4 लाख रुपये पर्यंतचा अनुदान मिळणार आहे, विहीर अनुदान कशा पद्धतीने मिळणार ? ही प्रक्रिया काय आहे आपण आज जाणून घेणार आहोत. राज्य सरकारने शेतकऱ्यांना विहीर देण्यासाठी मोठे अनुदान देण्याचे सुरुवात केलेली आहे आता हे अनुदान कसे मिळवायचे ? आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

विहीर खोदण्यासाठी 4 लाख रुपये अनुदान मिळतं यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत मनरेगा माध्यमातून ही सिंचन विहीर करण्यासाठी 4 लाख एवढा अनुदान मिळते. याबाबतचा जीआर 4 नोव्हेंबर 2022 रोजी प्रकाशित करण्यात आला.
सोलर कुंपण योजनेत 100 टक्के अनुदान मिळणार, जाणून घ्या सविस्तर;
महाराष्ट्रात अजून 3 लाख 87 हजार 500 विहिरी खोदणे शक्य असल्याचा भूजल संरक्षण विकासाने सांगितले. विहिरीसाठी अनुदान किती मिळत? असेल तर यासाठी काय पात्रता आहे तर पाहूया. योजनेअंतर्गत खालील प्रवर्गातील अर्जदारांनी प्राधान्य क्रमांकाने विहीर मंजूर करून मिळते.

Vihir Anudan Yojana 2025 विहिरी योजना पात्रता
- या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाच घेता येईल.
- अर्जदार व्यक्ती हा शेतकरी असला पाहिजे आणि त्याच्याजवळ शेती करण्यासाठी योग्य जमीन असायला हवी.
- सरकारी विहीर योजनेसाठी अर्ज करताना आधीपासून शेतामध्ये विहीर नसावी.
- अर्जदाराचे राष्ट्रीय बँकेमध्ये खाते असणे आवश्यक आहे. तसेच बँक खाते हे आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.
- अर्जदार शेतकऱ्याकडे कमीत कमी 0.40 हेक्टर म्हणजे (1 एकर ) इतकी जमीन असणे आवश्यक आहे.
- शेतामध्ये ज्या ठिकाणी विहिरीचे खोदकाम करायचे आहे त्या ठिकाणापासून 500 मीटर पर्यंत दुसरी या योजनेतून घेतलेली विहीर नसावी.
- अर्जदार शेतकऱ्याची जमीन ही विहीर खोदण्यासाठी तांत्रिक दृष्टीने पात्र असणे आवश्यक असणार आहे. ( यासाठी शाखा अभियंता किंवा उप अभियंता यांनी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे अधिकारी यांच्यासोबत जागेची पाहणी करून त्याचा अहवाल घेण्यात येईल त्याला आपण Geo-tagging देखील म्हणतो.
- अर्जदार व्यक्तीच्या 7/12 उताऱ्यावर यापूर्वी विहिरींची नोंद नसली पाहिजे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार व्यक्तीकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे.
- समजा अर्जदार शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये सह हिस्सेदार असतील तर अशा वेळी अर्जदाराला अर्जासोबत त्या हिस्सेदारांचे ना हरकत प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
Vihir Anudan Yojana 2025 आवश्यक कागदपत्रे
- मनरेगा जॉबकार्ड
- सातबारा
- आठ -अ
- जमिनीचा गट क्रमांक
- प्रस्तावित मजुरांचा जॉब कार्डक्रमांक
योजनेचे नाव | मनरेगा योजना |
उद्दिष्टे | ग्रामीण क्षेत्रातील तरुण तरुणींना रोजगार देणे. |
अनुदान | नवीन विहिरीसाठी पाच लाख रुपये देणे. |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन व ऑफलाईन |
अर्जासाठी एप्लीकेशन | mahaEGS |
क्षेत्र | अर्जदाराच्या नावावर 1 एकर जमीन असणे आवश्यक आहे |
येथे GR पहा | येथे क्लिक करा |
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |