रोजगार हमी योजनेतून मिळतेय विहीर; किती अनुदान आणि कसा मिळतो लाभ ? वाचा सविस्तर; Vihir Anudan 2025

Vihir Anudan 2025 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) राज्यात सिंचन विहीर खोदल्या जात आहेत. ही योजना राज्यात ज्या ठिकाणी रोजगार हमीची कामे सुरू आहेत तिकडे लागू आहे.

Vihir Anudan 2025

पूर्वी या योजनेत शेतकऱ्यांना 4 लाखाचे अनुदान मिळत होते आता शासनाने विहिरींच्या अनुदानात एक लाखाची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता नवीन लाभार्थ्यांना पाच लाखापर्यंत अनुदान मिळणार आहे.

पिकांचे संरक्षण करण्यासाठी उपयुक्त ‘तार कुंपण योजना’ जाणून घ्या सविस्तर माहिती;

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जास्तीत जास्त जमीन ओलिताखाली आणण्यासाठी शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून विहीर खुदाईसाठी प्रोत्साहन दिले जाते.

WhatsApp Group Join Now

पात्र शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीकडे अर्ज केल्यानंतर निवड केली जाते. शासनाच्या अटीमध्ये तो पात्र ठरल्यानंतर विहिरीच्या कामाच्या टप्प्यानुसार अनुदानाचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग केले जातात.

Vihir Anudan 2025 या शेतकऱ्यांना मिळतो लाभ…

  1. अनुसूचित जाती/जमाती भटक्या जमाती व विमुक्त जाती.
  2. दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी.
  3. महिला-कर्ता असलेली कुटुंबे.
  4. विकलांग व्यक्ती कर्ता असलेली कुटुंबे
  5. जमीन सुधारणांचे लाभार्थी.
  6. इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी.
  7. सीमांत शेतकरी (2.5 एकर पर्यंत शेतजमीन)
  8. अल्पभूधारक शेतकरी (5 एकर पर्यंत शेत जमीन)

Vihir Anudan 2025 हे आहेत मंजुरीचे निकष !

  • अर्ज दाराकडे किमान एक एकर शेत जमीन सलग असावी.
  • पिण्याच्या पाण्याच्या विहिरीपासून 500 मीटर पेक्षा जास्त अंतरावर सिंचन विहीर खोदता येईल.
  • दोन महिन्यांमध्ये 150 मीटर अंतराची अट मागासवर्गीय, दारिद्र रेषेखालील कुटुंबासाठी लागू नाही.
  • लाभधारकाच्या सातबारावर याआधीच विहिरीची नोंद असू नये.
  • अर्जदार हा जॉब कार्डधारक असला पाहिजे.

अधिक माहितीसाठी संपर्कपात्र शेतकऱ्यांनी आपल्या गावच्या ग्रामपंचायत कार्यालयात या योजनेसाठी लेखी अर्ज द्यावेत.
इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment