मृग नक्षत्रात पेरणीची तयारी, कृषी विभाग देतोय सतर्कतेचा सल्ला! वाचा सविस्तर; Vidarbha Monsoon Update 2025

Vidarbha Monsoon Update 2025 जमीन ओल्या अवकाशात ढगांची चाहूल शेती मशालगतीची कामे अंतिम टप्प्यात आले असले तरी, खरा प्रश्न एकच, पेरणीचा योग्य मुहूर्त कधी? आधुनिक तंत्रज्ञानाचा योगातही विदर्भातील शेतकरी आजही नक्षत्रांवर अधिक विश्वास ठेवतात.

Vidarbha Monsoon Update 2025

मृग नक्षत्राच्या उदय आणि कोल्ह्याचे वाहन यामुळे यंदा भरघोस पावसाची आशा निर्माण झाले आहे असून, परंपरेच्या पायावर आधुनिक शेतीची निर्णय घेतले जात आहेत.

हळद व आले पिकाच्या उत्पादन वाढीसाठी कसे करावे लागवडीचे नियोजन? जाणून घ्या सविस्तर; 

Vidarbha Monsoon Update 2025 मान्सूनपूर्व जोरदार पावसामुळे जमिनी ओली झाले असून, शेती मशागतीचे कामे आता अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्ष पेरणीसाठी शेतकऱ्यांचे लक्ष आता आकाशाकडे लागले असून, नक्षत्रांवर आधारित परंपरागत गणितानुसार पेरणीचा योग्य मुहूर्त शोधला जात आहे.

WhatsApp Group Join Now

यावर्षी 7 जून पासून सुरू होणाऱ्या ‘मृग नक्षत्र’ पासून खरीद हंगामातील पेरणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

Vidarbha Monsoon Update 2025 परंपरा आणि अनुभवाचा मिलाफ

सध्या यांत्रिकरण आणि तंत्रज्ञानाच्या युगातही राज्यातील अनेक भागातील शेतकरी नक्षत्रांवर आधारित शेतीच्या परंपरेवर आजही विश्वास ठेवतात.

WhatsApp Group Join Now

नक्षत्र हे केवळ खगोलशास्त्रीय संकेत नसून, त्याचा थेट संबंध हवामान जमिनीतील ओलावा आणि बी बियाण्यांचा उपमानावर असल्याने अनेक वर्षाच्या अनुभवावर आधारित आहे.

मृग नक्षत्राचे वाहन ‘कोल्हा’ असल्यामुळे यंदा जोरदार पावसाची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी हे नक्षत्र पेरणीसाठी आदर्श मानले आहे.

अशाप्रकारे आहेत यावर्षीची नक्षत्र व वाहनांचे यादी

दिनांकनक्षत्र वाहन
7 जूनमृगकोल्हा
22 जूनआर्दाउंदीर
5 जुलैपुनर्वसूघोडा
19 जुलैपुश्यमोर
२ ऑगस्टआश्लेषागाढव
16 ऑगस्टमघाबेडूक
30 ऑगस्टपूर्वाम्हैस
13 सप्टेंबरउत्तराकोल्हा
27 सप्टेंबरहस्तमोर
10 ऑक्टोबरचित्राहत्ती
24 ऑक्टोबरस्वातीबेडूक

कृषी विभागाचा सल्ला

Vidarbha Monsoon Update 2025 यंदा विदर्भात मान्सून ने सुरुवात केली असली तरी पावसात खंड पडल्यामुळे जमिनीत पुरेसा ओलावा अध्याप तयार झाला नाही. त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना 10 जून नंतरच पेरणी करण्याचा सल्ला दिला आहे. पेरणीसाठी किमान 7 इंच जमिनीतील ओलावा आणि 100 मी मी इतका पाऊस झालेला असणे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

परंपरा आणि तंत्रज्ञान यांची सांगड

Vidarbha Monsoon Update 2025 शेतीमध्ये आता आधुनिक तंत्रज्ञान हवामान, ॲप्स, सेंद्रिय उपाय, यांत्रिकी साधनांचा वापर वाढत असला तरी, शेतकरी अजूनही नक्षत्रांवर आधारित पारंपारिक ज्ञानावर विश्वास ठेवतो. यावर्षीही मृग नक्षत्रात पेरणी करणार असल्याचे चित्र आहे, परंतु कृषी विभागाचा सत्रकेचा सल्लाही तितकाच महत्त्वाचा ठरतो.

मृग नक्षत्र हे यंदाच्या खरीप हंगामासाठी महत्त्वाचे ठरणार असून, त्यात भरघोस पावसाची शक्यता असल्याने परंपरेनुसार आणि आधुनिक अंदाजाचा आधारावर पेरणीचा निर्णय शेतकरी घेतील.

शेतकरी काय सांगतात

” मी कृषी विभागाच्या सूचनानुसार आणि मोबाईल ॲपवरील अंदाज वरूनच नक्की करणार आहे पेरणी करणार आहे नक्षत्र महत्त्वाचे आहेत पण अचूक हवामान माहितीसाठी तिथे आवश्यक आहे . -सारंग रिंगोले, शेतकरी, चिंचाळा

” आमच्या आजोबा पणजोबापासून आम्ही नक्षत्रावर शेती करतो यंदाही मूळ नक्षत्र राहतच पेरणी करणार आहे पाव चांगला होईल असा विश्वास आहे. -विठ्ठल महारतळे, शेतकरी, नरसाळा”

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment