Vegetables Cultivation 2025 पावसाळ्यात घेण्यात येणाऱ्या वेलवर्गीय भाज्यांचे लागवड तंत्रज्ञान

काकडी: Vegetables Cultivation 2025
सुधारित वाण : हिमागी, फुले शुभांगी
पेरणीची वेळ : खरीप जून-जुलै, उन्हाळी जानेवारी-फेब्रुवारी
बियाणांचे प्रमाण : 1 ते 1.5 किलो/हेक्टर
लागवडीचे अंतर : 1.0 0.5 मि.
खतांची मात्रा : शेणखत, 100 50: 50: किलो नत्र, स्फुरद व पालाश प्रति हेक्टरी द्यावे. लागवडीपूर्वी अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश मात्रा द्यावी. अर्ध्या नत्राची मात्रा लागवडीनंतर 1 महिन्याने दोन समान हप्त्यात विभागून द्यावी.
उत्पादन : 15 ते 20 टन प्रती हेक्टर
डाळिंब बागेतील मृग बहार व्यवस्थापन!!

दुधी भोपळा: Vegetables Cultivation 2025
सुधारित जात : सम्राट
पेरणीची वेळ : खरीप जून-जुलै, उन्हाळी जानेवारी ते फेब्रुवारी
बियाणांचे प्रमाण : 2 ते 2.5 किलो/हेक्टर
लागवडीचे अंतर : 3.0*1.0 मि. (मंडप पद्धत), 5.0*1.0 मि. ( जमिनीवर)

खतांची मात्रा : लागवडीपूर्वी 100 50: 50: किलो नत्र, स्फुरद व पालाश प्रति हेक्टरी द्यावे. लागवडीपूर्वी अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश मात्रा द्यावी. अर्ध्या नत्राची मात्रा लागवडीनंतर 1 महिन्याने दोन समान हप्त्यात विभागून द्यावी.
उत्पादन : 40 ते 50 टन प्रती हेक्टर
कारली: Vegetables Cultivation 2025
सुधारित वाण : फुले ग्रीन, गोल्ड हिरकणी
पेरणीची वेळ : खरीप जून-जुलै चा पहिला आठवडा, उन्हाळी जानेवारी ते फेब्रुवारी.
बियाणांचे प्रमाण : 2 ते 2.5 किलो/हेक्टर
लागवडीचे अंतर : 1.5 1.0 मि.
खतांची मात्रा : 20 टन शेणखत, 100:50:50 किलो या प्रमाणात नत्र, स्फुरद व पालाश प्रति हेक्टरी द्यावे.
उत्पादन : 15 ते 20 टन प्रती हेक्टर

दोडका: Vegetables Cultivation 2025
सुधारित जात : फुले नसदार, कोकण हरित, फुले सुचेता.
पेरणीची वेळ : खरीप जून-जुलै, उन्हाळी जानेवारी ते फेब्रुवारी.
लागवडीचे अंतर : 1.5 1.0 मि. (तारी पद्धत)
खतांची मात्रा : लागवडीपूर्वी 50:50:50 किलो या प्रमाणात नत्र, स्फुरद व पालाश प्रति हेक्टरी द्यावे. लागवडीनंतर एक महिन्याने 50 किलो प्रति हेक्टर नत्र खतांची मात्रा द्यावी व भर लावावे.
उत्पादन : 15 ते 20 टन प्रती हेक्टर

इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |