शेतकरी उत्पादक कंपन्यांना फळ व भाजीपाला शीत साखळीसाठी मोठ्या प्रमाणात अनुदान, जाणून घ्या सविस्तर; Vegetable Storage Scheme 2025

Vegetable Storage Scheme 2025 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय फलोत्पादन मंडळातर्फे फलोत्पादन समूह विकास कार्यक्रम 2021 पासून प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात असून सन 2025 मध्ये नवीन मार्गदर्शक सुचनांन्व्ये Multi-commodity high value clusters व Peri-urban Vegetable या दोन संकल्पनांचा समावेश नव्याने करण्यात आलेला आहे.

 Vegetable Storage Scheme 2025

प्रमुख शहरांच्या जवळ मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादनासाठी क्लस्टर्स विकसित करणे, भाजीपाला संकलन, साठवणूक आणि विपणन यांची व्याप्ती वाढविण्यासाठी शेतकरी उत्पादक संस्था, सहकारी संस्था आणि नव उद्योजक संस्था यांना प्रोत्साहन देणे, देशांतर्गत आणि निर्यात बाजारपेठेत स्पर्धात्मक वाढवण्यासाठी एकात्मिक पद्धतीने लॉजिस्टिक, मार्केटिंग आणि ब्रॅडिंग मध्ये पूर्वोत्पादन, उत्पादन, काढणीनंतरचे व्यवस्थापन आणि मूल्यवर्धन याद्वारे कृषी मूल्य साखळीच्या अडचणी दूर करणे हे उत्पादनाच्या कापणी नंतर हाताळणी, मूल्यवर्धन आणि बाजार जोडणी या करिता पायाभूत सुविधांचा विकास विस्तार सुधारणा करणे हे या योजनेचे उद्देश आहेत.

‘मांजरा’तील पाणी उन्हाळी पिकांना वरदान! ‘इतक्या’ हेक्टर क्षेत्रावर झाले सिंचन वाचा सविस्तर;

Vegetable Storage Scheme 2025 पात्र लाभार्थी

  • शेतकरी उत्पादक संघटना (FPOs/FPCs) आणि त्यांच्या फेडरेशन
  • सहकारी संस्था सोसायट्या
  • भागीदारी संस्था
  • कंपन्या किंवा त्यांचे संयोजन यांचा समावेश असलेल्या कायदेशीर संस्था या सदर योजनेअंतर्गत अंमलबजावणी संस्था (IA) म्हणून पात्र असतील.

WhatsApp Group Join Now

A) Multi-commodity high value clusters

Multi-commodity high value clusters अंतर्गत अंमलबजावणीचे खालील प्रमाणे तीन व्हर्टीकल आहेत.

  1. पूर्व उत्पादन आणि उत्पादन शेतकऱ्यांची क्षमता बांधणी, पिकाचे लागवड साहित्य, पीक निगा पद्धती, सूक्ष्म सिंचन आणि पीक कापणीपर्यंत शेतीचे यांत्रिकीकरणाचा समावेश. सदर व्हर्टीकल मध्ये FPC/FPO आणि अंमलबजावणी यंत्रणा यांनी राबवण्याच्या घटकांचा समावेश आहे.
  2. काढणीनंतरचे व्यवस्थापन आणि मूल्यवर्धन – पीक कापणी नंतर हाताळणी, स्टोअरेज, मूल्यवर्धन आणि पॅकेजिंग.
  3. लॉजिस्टिक, मार्केटिंग आणि ब्रॅण्डिंग क्लस्टर आणि देशांतर्गत आणि निर्यातीसाठी एकात्मिक लॉजिस्टिक.

Vegetable Storage Scheme 2025 समाविष्ट पिके

  • क्लस्टरमध्ये प्रमुख फलोत्पादन पीक असणे आवश्यक.
  • या प्रमुख पिका व्यतिरिक्त, क्लस्टर मध्ये कृषी विविधता आणि उत्पादकता वाढविण्यासाठी अतिरिक्त फलोउत्पादन पिके देखील समाविष्ट केली जाऊ शकतात.

निवडीचे निकष

  1. क्लस्टरचा समावेश असलेली जमीन ही शक्य तितक्या प्रमाणात सलग असावी.
  2. जर जमीन क्षेत्र सलग्न नसेल तर कमाल दोन ठिकाणांमध्ये डोंगराळ भागात असल्यास 50 किमी आणि सर्वसाधारण भागात असल्यास 80 किमी पेक्षा जास्त नसावे.
  3. किमान वार्षिक Farm gate Value = 100.00 कोटी

Vegetable Storage Scheme 2025 अर्थसहाय्याचे स्वरूप

WhatsApp Group Join Now

घटकांतर्गत प्रकल्पातील मुख्य पिकाच्या Farm Gate Value 25% एवढे अर्थसहाय्य देय आहे.

B) Peri-urban Vegetable clusters

Peri-urban Vegetable clusters अंतर्गत अंमलबजावणीचे दोन व्हर्टीकल आहेत.

1. पेरी-अर्बन उत्पादन

A) FPC/FPO यांनी राबविण्याचे घटक पिकाचे लागवड साहित्य, शेतीचे यांत्रिकीकरण, सूक्ष्म सिंचन, एकात्मिक अन्नद्रव्य/कीड व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञान इ.

B) अंमलबजावणी यंत्रणा यांनी राबविण्याचे घटक – FPO ची स्थापना व प्रोत्साहन, शेतकऱ्यांची/FPO यांची क्षमता बांधणी, सुधारित कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब आणि प्रसार, शेतीचे यांत्रिकीकरण, सूक्ष्म सिंचन इ.

2. काढणी पश्चात व्यवस्थापन आणि वितरण

संकलन व वितरण केंद्र, एकात्मिक पॅक हाऊस, रायपनींग चेंबर, पूर्व शीतकरण गृह, शीतखोली, शीत वाहन, प्रक्रिया केंद्र यांची निर्मिती व विस्तारीकरण, शीतगृह उभारणी, मूल्यवर्धन आणि पॅकेजिंग इत्यादी. सदर घटक हे अंमलबजावणी यंत्रणे राबवायचे आहेत.

अनिवार्य पिके

टोमॅटो, कांदा आणि बटाटा या व्यतिरिक्त कोबी, फ्लॉवर, भेंडी, वांगी, शिमला, मिरची, काकडी दुधीभोपळा, कोथिंबीर, लिंबू, आले, हिरवी मिरची, लसूण इत्यादी.

निवडीचे निकष

क्लस्टर आणि त्यामध्ये विकसित करायच्या सर्व प्रस्तावित पायाभूत सुविधा उपभोग केंद्र/शहरापासून 50 ते 100 कि.मी (50 कि.मी. – 10 लाख लोकसंख्येसाठी, 80 कि.मी. 10 ते 15 लाख लोकसंख्येसाठी आणि 100 कि.मी. – 15 लाखाहून अधिक लोकसंख्येसाठी) असले पाहिजेत.

अधिक माहितीसाठी सदर योजनेच्या सविस्तर मार्गदर्शक सूचनायेथे क्लिक करा
इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment