Vegetable Market 2025 एकीकडे पावसाचे आगमन झाल्याने खरीप हंगामाची चाहूल लागली असतानाच दुसरीकडे भाजीपाल्याच्या बाजारात दर कडाडले आहेत. पालेभाज्या व फळभाज्यांचे भाव सामान्य नागरिकांच्या वाक्य बाहेर गेले असले तरी शेतकऱ्यांच्या पदरात मात्र नुकसान पडत आहे.

पावसामुळे शेतातच भाजी सडत असून, बाजारात पुरवठा कमी झाल्याने भाव वाढले आहेत. पण शेतकरी मात्र चिखल, पीक आणि खराब पीक आणि खर्चाच्या ओझ्याखाली भरडला जात आहे. त्यामुळे भाव वाढले, पण नफा नाही ही शेतकऱ्यांची वेदना अधिक तीव्र होत आहे.
शेतकऱ्यांनी पेमेंट करून ‘ही’ सोलर इन्स्टॉलेशन नाही, सोलर योजनेत चाललंय काय?
मागील 22 दिवसांपासून छत्रपती संभाजी नगर आणि परिसरात सतत बदलत्या हवामानामुळे कधी ढगाळ वातावरण, तर कधी मुसळधार पावसाचा सामना नागरिक करत आहेत.

काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली असून, त्यामुळे खरीप पूर्व कामे थांबली आहेत. दुसरीकडे, भाजी मंडईत फळभाज्या व पालेभाज्यांचे दर चढे असले तरी शेतकऱ्यांना त्याचा फारसा फायदा होत नाहीये. पावसामुळे शेतातच भाजीपाला खराब होत असल्याने बळीराजा आर्थिक दृष्ट आर्थिक अडचणी अधिक अडचणीत सापडला आहे.
Vegetable Market 2025 पालेभाज्यांमध्ये किंचित दरवाढ, परंतु नफा नाही
पालेभाज्यांमध्ये 5 रुपये प्रति जुडी किंचीत एवढी दरवाढ दिसून आली आहे. मेथी 15रुपयांवरून 20 रुपयांना, पालक, शेपू, चुका, तांदूळजा, करडई यांसारख्या भाज्या 10-12 रुपयांवरून 15 रुपयापर्यंत पोहोचल्या आहेत.
पावसामुळे या भाज्यांचे उत्पादन कमी झाले आणि शेतकरी शेतात भाजी काढण्यासाठी जाऊ शकत नाहीत. परिणामी बाजारातील पुरवठा घटल्याने किमतीत वाढ झाली असली तरी शेतात सडणाऱ्या उत्पादनामुळे शेतकऱ्यांना तोटाच होत आहे.
फळभाज्यांचे दर गगनाला भिडले
टोमॅटो, भेंडी, चवळी, शिमला, मिरची, पत्ताकोबी यांसारख्या फळभाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. 20 रुपयांना मिळणारे टोमॅटो 50 रुपयांवर गेले आहेत. पत्ताकोबी 40 वरून 60 रुपये, भेंडी 80 रुपये, शिमला मिरची व शेवग्याच्या शेंगा सुद्धा 80 रुपये प्रति किलोने विकली जात आहेत. अद्रकचा 20 रुपयेवरून थेट 60 रुपयांवर पोहोचला आहे.
Vegetable Market 2025 बिन्सचे भाव मात्र घसरले
मार्च एप्रिल मध्ये 200 ते 250 रुपये किलोने विकले जाणारे बिन्स, मागील 15 दिवसात आवक वाढल्याने केवळ 80 रुपये किलोवर आले आहेत. 120 रुपयांवरून 60 ते 80 रुपयांपर्यंत खाली आला आहे. गवारचे दरही 40 रुपयांनी घसरून 80 रुपये किलो झाली आहे.
शेतकऱ्यांवर ताण
पावसामुळे जमिनीत चिखला झाला असून, शेतात जाणे अवघड झाले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी भाजीपाला शेतातच सडत आहे. बाजारात दर वाढले असले, तरी विक्रीसाठी माल आणता न आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
” पावसामुळे भाजीपाला शेतातच खराब होतोय. आम्ही त्याला बाजारात आणू शकत नाही. दर वाढले असले तरी उत्पादन सडल्याने आमचा खिसा रिकामाच राहतो आहे. – अविनाश दांडगे, शेतकरी.”
पालेभाज्यांचे भाव (जुडी दरात)
| प्रकार | दर (प्रति जुडी) |
| मेथी | 20 |
| पालक | 15 |
| शेपू | 15 |
| तांदुळजा | 15 |
| करडई | 15 |
| चुका | 15 |
फळभाज्यांचे भाव (प्रति किलो)
| प्रकार | दर (प्रति किलो) |
| टोमॅटो | 50 |
| पत्ताकोबी | 60 |
| भेंडी | 80 |
| चवळी | 80 |
| वांगी | 40 |
| शिमला मिरची | 80 |
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |