अडीच हेक्टरवर भाजीपाला शेती, एकरवर आंबा लागवड, वर्षाला लाखोंचं उत्पन्न मिळतंय! Vegetable Farming 2025

Vegetable Farming 2025 गोंदिया : प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी शेती ही अत्यंत फायदेच क्षेत्र ठरत आहे. नियमित नवनवे प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना शेती साथ देते. पारंपारिक पद्धतीला शेती साथ देईल असे होत नाही. हीच प्रयोगशीलता तालुक्यातील किडंगीपार येथील मधुलिका पटेल या महिला शेतकऱ्याने जोपासली व भाजीपाला शेतीतून लाखोंचे उत्पन्न मिळविले.

Vegetable Farming 2025

भाजीपाला शेतीचा हा प्रयोग नगदी पिकाचा आहे. या प्रयोगातून आर्थिक सक्षम व आत्मनिर्भर झाले आहेत. किडंगीपार येथील मधुलिका पटेल शेतकरी आहे. त्यांनी कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडून रोहयो अंतर्गत फळबागा लागवड योजनेमध्ये 1 एकरवर आंबा लागवडीचा लाभ 10 ते 15 वर्षांपूर्वी मिळालेला आहे. त्यामध्ये आम्रपाली व रत्ना या वाणाची लागवड केली आहे. फळबाग लागवडीपासून दरवर्षी खर्च वजा आता 1 लाख रुपये उत्पन्न मिळत आहे.

दोन एकर मिरचीतून मिळाले साडे तीन लाख रुपयांचे उत्पन्न, युवा शेतकऱ्याची कमाल!

Vegetable Farming 2025 पंतप्रधान कृषी सिंचन योजना 2021-22, 2022-23 अंतर्गत 2.00 हेक्टरचा ठिबक सिंचनाचा लाभ त्यांना मिळालेला आहे. तसेच एकात्मिक फलोत्पादन योजना 2022-23 अंतर्गत 2 हेक्टर क्षेत्रासाठी प्लास्टिक
मल्विंगचा सुद्धा लाभ मिळाला आहे. यापूर्वी शेतात भाजीपाला पिकास पारंपारिक पद्धतीने पाणी देत होत्या. त्यामुळे वेळेवर पाणी देता येत नव्हते. पाणी सुद्धा कमी पडत होते.

WhatsApp Group Join Now

Vegetable Farming 2025 दरम्यान, कृषी विभागाकडून जेव्हापासून ठिबक संचाचा लाभ घेतला, तेव्हापासून 25 ते 30 टक्के पाण्याची बचत होऊन पाण्याची कमतरता भासत नाही. तसेच मल्विंगसाठी सुद्धा अनुदान मिळाल्यामुळे भाजीपाला लागवड करताना तण नियंत्रणाच्या खर्चामध्ये बचत झाली. मल्विंग व ठिबक संचामुळे प्रतीचा भाजीपाला घेता येत असल्याचे त्यांनी सांगितले.

Vegetable Farming 2025 एका हंगामामध्ये 2 लाख 50 हजार रुपये उत्पन्न…

  • शेतीमध्ये आधुनिक पद्धतीचा वापर केल्याने उत्पादनात लक्षणीय वाढ झालेली आहे. कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या शेतामध्ये सध्या मल्विंगवर टोमॅटो 1 हेक्टर,शिमला मिरची 1 हेक्टर व कारले अर्ध्या हेक्टर वर लागवड करीत आहे.
  • या भाजीपाला पिकापासून उत्पादन खर्च वजा जाता एका हंगामामध्ये 2 लाख 50 हजार रुपये उत्पन्न मिळत आहे.पटेल यांनी भाजीपाला शेतीतून शेतकऱ्यांसमोर आदर्श ठेवला आहे.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment