भाजीपाला पिकांच्या फळधारणेतील समस्या आणि उपाय योजना!! Vegetable Crops 2025

Vegetable Crops 2025 फळे भाजीपाला वर्गातील पिकांमध्ये भाजीचे उत्पादन हे फळांच्या संख्येवर फुले व फळांची गळ होणे किंवा फळधारणा न होणे अशा विविध कारणामुळे फळांची संख्या कमी होऊ शकते.

Vegetable Crops 2025

Vegetable Crops 2025 हंगाम जमिनीची निवड, जातीची निवड, हवामान आणि हवामानातील बदल, अन्नद्रव्यांचे प्रमाण, पाण्याचा अयोग्य वापर, रोग व किडींचा उपद्रव किंवा वनस्पतींमध्ये आवश्यक त्या संजीवकाचा अभाव, परागीभवन न होणे इत्यादी अनेक कारणांमुळे भाजीपाला पिकांमध्ये फळधारणा कमी होऊ शकते.

कांदा बिजोत्पादन!! 

Vegetable Crops 2025 फळधारणा कमी होण्याची कारणे:

फळधारणा होण्यासाठी झाडांवर फुले येणे, फुलांमधील पुंकेसर आणि स्त्रीकेसर परिपक्व अवस्थेत असणे, परागीभवन होणे, परागीभवन आणि फळधारणा होण्यासाठी आवश्यकत तापमान, अन्नद्रव्य आणि पाणी यांचे आवश्यक ते प्रमाण असणे महत्त्वाचे असते यावरून फळधारणा कमी होणे किंवा फळधारणा न होण्याच्या विविध कारणांचा मागोवा घेता येतो.

WhatsApp Group Join Now

  1. पिकांना आणि पिकांमधील विशिष्ट जातींना फुले येण्यासाठी ठराविक तापमान, दिवसांची लांबी किंवा सूर्यप्रकाशाचे तास यांची आवश्यकता असते यांची पूर्तता न झाल्या झाडांना फुले येत नाहीत आणि फळधारणा होत नाही.
  2. वेलवर्गीय पिकांमध्ये नर आणि मादी फुले वेगवेगळ्या वेळी येतात, नर फुले आधी येतात आणि मादी फुले नंतर येतात. परागीकरण झाल्याशिवाय फळधारणा होत नाही. परागीकरणाचे काम मधमाशा, फुलपाखरे, वारा, इत्यादी माध्यमातून होते. त्यांचा अभाव असल्यास फळधारणा कमी होते.
  3. टोमॅटो, वांगी, या भाजीपाला पिकांमध्ये पुंकेसर आणि स्त्रीकेसर परिपक्व अवस्थेत येऊन फळधारणा होण्यासाठी ठराविक तापमान आवश्यक असते. तापमान खूप कमी अथवा खूप जास्त असल्यास फळधारणा होऊ शकत नाही आणि फुलांची गळ होते.
  4. कांद्यांचे पिकांमध्ये बीजउत्पादन पुंकेसर आणि स्त्रीकेसर एकाच वेळी तयार होत नाहीत. त्यामुळे या पिकांमध्ये परागीकरण आवश्यक असते. मधमाशांचा अभाव असल्यास आणि परपरागीकरण न झाल्यास कांद्यांमध्ये बीजधारना कमी होते.
  5. फुले व फळधारणा होताना मोठ्या प्रमाणावर अन्नद्रव्यांची आणि पाण्याची आवश्यकता असते. याची कमतरता असल्यास फुलांची, फळांची गळ होते, आणि फळधारणा होत नाही.
  6. परपरागीकरण घडवून आणणाऱ्या मधमाशांना अपायकारक ठरतील अशी कीटकनाशके पिकांवर फवारल्यास मधमाशांचे कार्यक्षमता कमी झाल्यामुळे परपरागीकरण कमी होते. अधिक तापमानात मधमाशांची कार्यक्षक्ती घटते आणि त्यांचा अनिष्ट परिणाम फळधारणेवर होतो.
  7. काही कीड व रोगांच्या उपद्रवामुळे फळधारणा होऊ शकत नाही.
  8. फुलांची संख्या जास्त असल्यास सर्वच फुलांना व फळांना पुरेल एवढे अन्नद्रव्य तयार करण्याची क्षमता झाडांमध्ये नसल्याने काही वेळा फुले व फळे गळतात आणि काही फिरांमध्ये फळधारणा होत नाही.
  9. अयोग्य रसायनांचा पिकांवर वापर केल्याने किंवा काही रसायनांचा अतिरेक किंवा त्यांचे अधिक प्रमाण वापरल्याने फुलगळ होऊन फळधारणा कमी होते.

फळधारणा वाढविण्यासाठी उपाययोजना:

Vegetable Crops 2025 भाजीपाला पिकांची लागवड योग्य हंगामात आणि योग्य वेळी करणे तसेच, जातीची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे फळधारणा होण्यासाठी आवश्यक ते तापमान मिळते. या तापमानात किंवा विशिष्ट हंगामात ज्या जातींची शिफारस करण्यात आली आहे अशाच जातींचा वापर करावा. उदा. टोमॅटोच्या उन्हाळी हंगामासाठी ‘रूपाली’ तर हिवाळी हंगामासाठी ‘शितल’ या जातींची लागवड करावी.

टोमॅटो, घेवडा, वाटाणा या पिकांमध्ये वेगवेगळ्या तापमान आणि सूर्यप्रकाशाच्या उपलब्धतेनुसार जातींची निवड करावी काही वाण ठराविक तापमानासाठी उपलब्ध असल्याने त्यांचा वापर करणे उपयुक्त ठरेल तर काही वाण अनेक प्रकारच्या हवामानात फळधारणा घडू शकणारे असल्याने अशा वाणांना प्राधान्य द्यावे.

वेलवर्गीय पिकांमध्ये मादी फुलांचे प्रमाण वाढवून फळधारणा वाढवण्यासाठी शिफारस केलेल्या संजीवकाचा वापर करावा. तसेच कृत्रिम परागसिंचन करून फळधारणा वाढवता येते. काकडी पिकांमध्ये 10 पीपीएम जिब्रेलिक ऍसिड किंवा 10 पीपीएम मॅलिक हायड्रझाईड किंवा 50 पीपीएम इथ्रेल यापैकी कोणत्याही एका संजीवकाची फवारणी रोपे 2 ते 4 पानांवर असताना केल्यास मादी फुले लवकर येतात. त्यांची संख्या वाढते आणि पर्यायाने आधी फळधारणा होऊन उत्पादन वाढण्यास मदत होते. संजीवकाचा वापर योग्य प्रमाणात करावा.

Vegetable Crops 2025 फुले येण्यापूर्वी पिकाला खतांचा वापर करावा आणि फुले येताना आणि फळधारणा होताना पाण्याचा ताण पडू देऊ नये.

WhatsApp Group Join Now

फळांची गळ थांबवण्यासाठी मिरची, वांगी, यांसारख्या पिकांमध्ये सुरुवातीला नेफथिलीक असेटिक ऍसिड यासारख्या संजीवकांचा वापर करावा.

रोग व किडींचा योग्य वेळी नियंत्रण करावे पीक फुलोऱ्यात आल्यानंतर तसेच फुले येण्याच्या वेळी आणि फळधारणा होताना परपरागीकरण होणाऱ्या पिकांमध्ये मधमाशा अपायकारक असणारे कीटकनाशके वापरू नयेत भूकटी स्वरूपातील कीटकनाशकांचा वापर टाळावा.

झाडांवर फळांची संख्या जास्त असल्यास पुढील फुलांमध्ये फळधारणा होत नाही म्हणून वेळेवर तोडणी करून पिकाला नियमित अन्नपूरवठा आणि पाणीपुरवठा करणे आणि फळांची विरळणी करून घेणे आवश्यक आहे.

कांदा पिकात बीजधारणा वाढवण्यासाठी बीजोत्पादन घेण्यामध्ये मधमाशांच्या पेट्या ठेवल्यास परागीभवन वाढवून बीजधारण वाढण्यास मदत होते.

अशाप्रकारे योग्य काळजी घेतल्यास फळधारणा वाढण्यास आणि उत्पादन वाढीस मदत होते.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment