Varga Don Jamini 2025 मुंबई : राज्यातील भोगवटादार वर्ग-2 म्हणून जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांना बँकांकडून कर्ज मिळविण्यात येणाऱ्या अडचणी दूर करून, आता भोगावटादार वर्ग दोनच्या जमिनीवर तारणकर्ज देता येणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली.

शेतकऱ्यांच्या हितासाठी जिल्हा बँका शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करतात. मात्र, एखाद्या शेतकरी कर्ज परतफेड करू शकला नाही तर बँक अडचणीत येते.
अतिवृष्टी नुकसान भरपाई आली! पण हे काम न केल्यास शेतकरी अनुदानापासून राहणार वंचित;
अशावेळी बँकेने त्यांच्याकडून तारण घेतलेली जमीन भोगवटा वर्ग-2 असेल, तरी त्यावर बोजा चढविता येत नाही असे बँकांचे म्हणणे होते. त्यामुळे भोगवटादार वर्ग-2 च्या जमिनी बँकांकडून बँकेकडून तारण ठेवल्या जात नव्हत्या.

तसेच शेतकऱ्यांना कर्जही मिळत नव्हते. आता जिल्हा बँकांबरोबरच राष्ट्रीयकृत बँकांनाही या जमिनी तारण म्हणून घेता येणार आहेत.
Varga Don Jamini 2025 जिवंत सातबारा देण्याची मोहीम 1 एप्रिल पासून
- मृत खातेदारांच्या वारसांना शेतजमिनीशी संबंधित अधिकार सहज आणि वेगाने मिळावेत यासाठी ‘जिवंत सातबारा’ मोहीम राज्यभर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- यामध्ये मृत खातेदारांची नावे कमी होऊन वारसांच्या नावे सातबारा करण्याची मोहीम राबविण्यात येईल.
- महसूल विभागाकडून स्वतःहून वारसांची नोंद करण्यात येईल.
- अर्जदाराने अर्ज न करता महसूल यंत्रणा पुढाकार घेणे घेईल.
- मृत व्यक्तींची नावे सातबाऱ्यावरून कमी करून वारसांची नोंद केली जाईल. ही संपूर्ण प्रक्रिया फक्त दीड महिन्याच्या कालावधीत पूर्ण केली जाणार आहे.
Varga Don Jamini 2025 शासकीय दाखल्यांसाठी अभियान
राज्यात महसूल विभागाशी संबंधित सर्वसामान्य नागरिक शेतकरी, विद्यार्थी, आणि महिलांच्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर महाअभियान हाती घेण्यात आले आहे.
हे अभियान सर्वसामान्यांसाठी वरदान ठरणार असल्याचा विश्वास महसूल मंत्री बावनकुळे यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात व्यक्त केला. बावनकुळे म्हणाले, प्रत्येक महसूल मंडळात वर्षातून चार वेळा हे शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. प्रत्येक शिबिरासाठी 25 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार असून, वर्षाला किमान 1,600 शिबिरे घेतली जातील.
रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, जातीय प्रमाणपत्र, रेशन कार्ड वाटप अधि महसूल विभागाशी संबंधित सर्व तक्रारी आणि अर्ज एका ठिकाणी हाताळले जाणार आहेत.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |