उसाच्या एफआरपीमध्ये वाढ; राज्यातील शेतकऱ्यांना मागील हंगामापेक्षा 15 हजार कोटी रुपये जादा मिळणार! Us FRP 2025

Us FRP 2025 केंद्र सरकारने आगामी 2025-26 या हंगामात गाळप होणाऱ्या उसाच्या एफआरपी मध्ये प्रतिटन 150 रुपयांची वाढ केली आहे. वाढीव दरानुसार ऊस तोडणी व ओढणी वजा जाता राज्यातील शेतकऱ्यांना सरासरी 3000 तर कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरासरी 3,400रुपये एफआरपी मिळू शकते. राज्यातील शेतकऱ्यांना मागील हंगामापेक्षा 15000 कोटी रुपये ज्यादा मिळणार आहेत.

Us FRP 2025

उसाचा उत्पादन खर्च वाढल्याने एफआरपी मध्ये वाढ करण्याची मागणी शेतकरी संघटनांची होती. त्यानुसार केंद्र सरकारने वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत टनाला दीडशे रुपयांची वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

फार्मर आयडी नसल्यास ‘या’ योजनांचा मिळणार नाही लाभ!

उसाची एफआरपी वाढवल्याबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन, अडचणीतील शेतकऱ्यांना चार पैसे जास्त मिळण्यास मदत होईल; पण गेली अनेक वर्षे साखरेच्या किमान हमीभावातील मागणीकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. 2019 पासून साखरेचा हमीभाव प्रतिक्विंटल 3,100 रुपयावर स्थिर आहे. कर्जे काढून एफआरपी द्यावी लागते, साखरेचा हमीभाव व इथेनॉलचे दर वाढायला हवे. – पी. जी. मेढे, अभ्यासाक साखर उद्योग. “

WhatsApp Group Join Now

Us FRP 2025 यंदा अशी मिळू शकते एफआरपी

साखर उतारा (टक्के)11.0011.5012.0012.5013.00
10.25 बेस35503550355035503550
पुढील 1 टक्क्याला259.50432.50605.50778.50151.50
एकूण एफआरपी38103983405643294502
तोडणी/ वाहतूक925925925925925
देय एफआरपी28853058323134043577

एफआरपी मध्ये दीडशे रुपये तोटपुंजी वाढ केली. साखरेला सध्या 4000 ते 4400 रुपये भाव आहे. वाढीव एफआरपी ऊस तोडणी वाहतुकीत खर्च होणार असल्याने शेतकऱ्यांना त्याचा थेट फायदा नाही. खते, बियाणे व मजुरीचे वाढलेले दर पाहता प्रति टन 3,800 रुपये दर मिळणे गरजेचे आहे. – राजू शेट्टी, नेते स्वाभिमानी शेतकरी संघटना. “

Us FRP 2025 अशी वाढली एफआरपी

हंगामउतारारक्कम
2019-2010%2,750
202-2110%2,850
2021-2210%2,900
2022-2310.25%3,050
2023-2410.25%3,150
2024-2510.25%3,400
2025-2610.25%3,550

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment