उजनी धरणातून 1 हजार 600 क्युसेकने पाण्याचा विसर्ग; धरणात उरला किती पाणीसाठा? Ujani Dhran 2025

Ujani Dhran 2025 टेंभुर्णी : सोलापूर शहराला पिण्यासाठी भीमा नदीत पाणी सोडण्यात आले आहे. मुख्य कालवा तसेच डावा व उजवा कालवा यामधून यापुढे पाणी सुरू राहणार असून, सकाळी 9 वाजता वीज निर्मिती केंद्रातून १ हजार ६०० क्युसेकने पाणी भीमा नदीत सोडण्यात आले आहे.

Ujani Dhran 2025

सोलापूर शहरासाठी पाणीपुरवठा होत असलेल्या टाकळी व चिंचपूर या दोन्ही बंधाऱ्यातील पाणीपातळी कमी होऊ लागली आहे. शेतीसाठी कालवा, बोगदा व सिंचन योजनेद्वारे उन्हाळी आवर्तन सुरूच राहणार आहे.

उजनी धरणाचा पाणीसाठा झपाट्याने होतोय कमी, उपयुक्त शिल्लक पाण्यासाठी किती?

20 एप्रिलपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा या ठिकाणी उपलब्ध असल्यामुळे सोलापूर महानगरपालिका आयुक्तांच्या मागणी पत्रानुसार पाटबंधारे खात्याकडून 8 एप्रिल रोजी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

WhatsApp Group Join Now

Ujani Dhran 2025 टप्प्याटप्प्याने त्यात वाढ करून 6 हजार क्यूसेक विसर्ग करण्यात येणार आहे. सायंकाळी 6 वाजता 4 हजार 600 क्यूसेक विसर्ग करण्यात आला आहे.

उजनी धरण ते टाकळी व चिंचपूर बंधारा हे 232 किलोमीटर अंतर नदीतील पाण्यास पार करून जाण्यास आठ ते नऊ दिवस कालावधी लागतो. यासाठी 6 हजार क्युसेक पाणी भीमा नदीत सोडण्यात येणार असल्याचे धरण नियंत्रण विभागाकडून कळविण्यात आले आहे.

Ujani Dhran 2025 धरणात 10 टीएमसी उपयुक्त पाण्यासाठी!

  • सध्या उजनी धरणात 10 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून, 20 एप्रिल नंतर उजनी मृत साठ्यात जाऊ शकते. तर पाणी पातळी 19 टक्के सायंकाळी 6 वाजता होती.
  • उजनी धरणाच्या मुख्य कालव्यातून 2 हजार 950 क्युसेक विसर्ग, भीमा-सीना जोड कालवा (बोगदा) मधून 810 क्युसेक, सीना माढा सिंचन योजनेला 233 क्युसेक व दहिगाव 120 क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment