Ujani Dam Water Storage 2025 जर या पाण्याच्या पृष्ठभागावर फ्लोटिंग सोलरची प्रस्तावित योजना लवकर लागू केल्यास मोठ्या प्रमाणात शेतीला पाणी देता येणे शक्य होणार आहे.

एप्रिल महिन्यात सूर्य आग ओकू लागल्याने उजनी धरणाला याचा मोठा फटका बसतोय. दररोज तब्बल 12 लाख 50 हजार लिटर पाणी वाफ होऊन जात असल्याने पाणी पातळी झपाट्याने कमी होऊ लागली आहे. केवळ मार्च महिन्यापासून दोन टीएमसी पेक्षा जास्त पाण्याचे बाष्पीभवन झाल्याने आता ‘फ्लोटिंग सोलर’ची योजना तातडीने अमलात आणण्याची गरज पडू लागली आहे.
अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा असा होणार फायदा वाचा सविस्तर;
उजनी धरणात जवळपास वर्षभरात 13 टीएमसी एवढ्या पाण्याचे बाष्पीभवन होते. शेतीला लागणारे तब्बल 65 हजार हेक्टर जमिनीला लागणाऱ्या पाण्याचे बाष्पीभवन होते. दरम्यान, 17 एप्रिल रोजी उजनी धरणात केवळ 1.97 टक्के पाणीसाठा राहिलाय. जर या पाण्याच्या पृष्ठभागावर फ्लोटिंग सोलरची प्रस्तावित योजना लवकर लागू केल्यास मोठ्या प्रमाणात शेतीला पाणी देता येणे शक्य होणार आहे.

Ujani Dam Water Storage 2025 फ्लोटिंग सोलार राबवण्याची मागण
सध्या जिल्ह्यातील पावणेदोन लाख हेक्टर जमिनीला उजनीचे पाणी पोहोचते. दुसरीकडे बाष्पीभवन आणि बॅक वॉटरवरील कृषीपंप आणि धरणावरील 42 पाणीपुरवठ्याच्या योजनांसाठी पाणी उपसा सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळी दररोज एक टीएमसीने खालावत आहे. काही दिवसापूर्वी जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी धरणातील पाण्याचे बाष्पीभवन रोखण्यासाठी फ्लोटिंग सोलरची योजना आणली होती.
त्यासाठी केंद्रीय यंत्रणांना निविदा प्रसारित केल्या जाणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे उजनी धरणाच्या जलाशयात हे फ्लोटिंग सोलर बसविले जाणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले होते. यासाठी एनटीपीसी आणि इतर केंद्रीय एजन्सी ना टेंडर घेण्याचा विचार असल्याचेही त्यांनी बोलून दाखवले होते. यामुळे पाण्याच्या बाष्पीभवनावर मर्यादा येऊन सोलर ऊर्जेतून जलसंधारण विभागाला मोठ्या प्रमाणात निधीही मिळू शकेल अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली होती.
Ujani Dam Water Storage 2025 फ्लोटिंग सोलार योजना राबवल्यास काय होणार?
- सध्या सोलर एनर्जीतून मिळणाऱ्या निधीपेक्षा जवळपास 65 हजार हेक्टर ज्यादा क्षेत्राला पाणी मिळणे हे महत्त्वाचे असल्याने तातडीने फ्लोटिंग सोलर योजना राबविल्यास पाण्याचे बाष्पीभवन कमी प्रमाणात होऊ शकणार आहे.
- उजनी धरणाचा जलाशय जवळपास 200 चौरस किलोमीटरवर पसरल्याने या इथे जागेची कोणती अडचण नसून ही योजना शेतीसाठी वरदायिनी ठरू शकणार आहे.
- Ujani Dam Water Storage 2025 सध्या धरणे बांधण्यास मर्यादा असल्या तरी धरणातील थेंब थेंब पाण्याचा वापर योग्य रीतीने झाल्यास राज्यातील खूप मोठ्या प्रमाणात कोरडवाहू क्षेत्राला पाणी मिळू शकणार आहे.
- एका बाजूला आता भविष्यात पाईपलाईनने पाणी देण्याची योजना शासन आणत असून त्याच वेळेला निसर्गाच्या बाष्पीभवनामुळे जे पाणी वाया जाते त्या पाण्यावर देखील फ्लोटिंग सोलरने मर्यादा येऊ शकणार आहेत.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |