अवकाळी पावसामुळे उजनी प्लस मध्ये; धरणात किती पाणीसाठा? Ujani Dam Water Level 2025

Ujani Dam Water Level 2025 टेंभुर्णी : इंदापूर, दौंड तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले उजनी पहिल्यांदाच मे महिन्यात मृत साठ्यात गेले. मंगळवारी मृत साठ्यातून बाहेर येऊन प्लस कडे वाटचाल केली आहे.

Ujani Dam Water Level 2025

उजनी धरणाचे पाणलोट क्षेत्र असलेल्या भीमा खोऱ्यात व उजनी पाणलोट क्षेत्रात त मोठ्या प्रमाणात पडत असल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणाचे पाणी पातळी दहा दिवसात 23 टक्क्यांनी वाढली आहे.

रेड अलर्ट ऑन! कोकण, पुणे, विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा! वाचा सविस्तर;

रविवारी दौंड येथून 10 हजार क्युसेक विसर्ग झाला होता. त्यात सोमवारी सकाळी वाढ होऊन 18 हजार 51 विसर्ग सुरू होता तर दुपारी 12 वाजता 22 हजार क्युसेक होता.

WhatsApp Group Join Now

Ujani Dam Water Level 2025 सोमवारी सायंकाळी 6 वाजता 19 हजार 328 क्युसेक विसर्ग सुरू होता. असाच विसर्ग कायम राहिला असून, मंगळवारी उजनी मृत साठ्यातून बाहेर आले.

दि. 21 एप्रिल रोजी उजनी धरण मृत साठ्यात गेले होते. तर 14 मे पर्यंत उजनी धरणाची पाणी पातळी वजा 22.96 टक्क्यांपर्यंत खाली गेली होती. 18 मे पर्यंत पाणी पातळी स्थिर राहिली होती. 18 मे पासून गेल्या आठ दिवसात 10 टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे.

सोलापूर, अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यात उजनी पसरलेले असल्याने या स्थानिक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने, उजनी धरणाची पाणी पातळी वाढण्यास मोठी मदत झाली आहे.

WhatsApp Group Join Now

Ujani Dam Water Level 2025 उजनी धरण परिसरात गेल्या दहा दिवसात 178 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी देखील दिवसभरात 24 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

14 मे रोजी उजनी धरणात टीएमसी पाणी साठा होता. सायंकाळी सहा वाजता 61.12 टीएमसी पाणीसाठा झाला होता. वजा 4.72 टक्के पाणी पातळी होती.

उजनी मुख्य कालवा बंद करण्यात आला असून, भीमा-सीना जोड कालव्यातून विसर्ग सुरू आहे. गतवर्षी उजनी 26 जुलै रोजी मृत साठ्यातून बाहेर आले आहे.

यंदा उजनी धरणाचा इतिहासातच प्रथमच उन्हाळ्यात 18 एप्रिल रोजी मृत साठ्यात जाऊन 27 मे रोजी मृत साठ्यातून बाहेर आले आहे. गतवर्षीचा तुलनेत दोन महिन्या अगोदर उजनी मृत साठ्यातून बाहेर आले आहे.

Ujani Dam Water Level 2025 गेल्या पाच वर्षात यावेळेस आले मृत साठ्यातून बाहेर….

18 जुलै2020
22 जुलै2021
12 जुलै2022
1 ऑगस्ट2023
27 जुलै2024
27 मे2025

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment