Ujani Dam Water Level 2025 टेंभुर्णी : सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरलेले उजनी 18 ते 20 एप्रिल पर्यंत मृत साठ्यात जाणार असून, यानंतर कालवा वगळता शेतीसाठी सोडण्यात येणारे पाणी बंद होणार आहे.

यामुळे पुढील दोन महिने अडचणीचे ठरणार आहेत. उजनी बॅक वॉटर क्षेत्रात पाणी खाली चालल्याने केबल व पाईपलाईन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू झालेली आहे.
शेतात काम नक्की करा कष्टाचे; मात्र आरोग्य देखील अबाधित राखा शेतकरी दादांनो आपआपले;
सोलापूर व नदीकाठच्या गावाला भीमा नदीतून पाणी सोडल्याने दररोज एक टीएमसी पाणी घटत आहे. नदीतून सोडण्यात आलेले पाणी 17 एप्रिल पर्यंत चालणार आहे.

सध्या धरणात केवळ सहा टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. सध्या उजनी धरणाची पाणी पातळी 11.80 टक्के राहिली असून गतवर्षी वजा 38.88 टक्के पाणी पातळी खालवली होती.
साधारणपणे एप्रिल अखेर ते मे पहिल्या आठवड्यात उजनी मृत साठ्यात जात असते. गतवर्षी दुष्काळी स्थिती असल्याने उजनी 21 जानेवारी 24 रोजी मृत्यू साठ्यात गेले होते.
सध्या भीमा नदीत सोडण्यात आलेले पाणी 20 एप्रिल पर्यंत चालणार असून, त्यानंतर मुख्य कालवा वगळता इतर पाणी योजना बंद होणार आहेत. तर मुख्य कालवा 15 ते 20 मे पर्यंत चालणार असल्याची माहिती उजनी धरण व्यवस्थापक अभियंता प्रशांत माने यांनी दिली.
Ujani Dam Water Level 2025 गेल्या पाच वर्षातील 13 एप्रिल रोजीची स्थिती
- 13 एप्रिल 2021 रोजी 30 टक्के
- 13 एप्रिल 2022 रोजी 50.30 टक्के
- 13 एप्रिल 2023 रोजी 18.28 टक्के
- 13 एप्रिल 2024 रोजी 38.88 टक्के
- 13 एप्रिल 2025 रोजी 11 टक्के पाणी पातळी आहे.
गतवर्षीचा तुलनेत 50.68 टक्के पाण्याचा अधिक वापर झाला आहे. गतवर्षी दुष्काळी स्थिती असल्याने उन्हाळी पाळी देण्यात आली नव्हती.
Ujani Dam Water Level 2025 तीन पाळ्यात धरणातून भीमा नदीत पाणी
- भीमा नदीद्वारे सोडण्यात आलेल्या तीन पाळ्यात 18 ते 20 टीएमसी पाण्याचा वापर होतो.
- डिसेंबर, फेब्रुवारी व त्यानंतर 8 एप्रिल असे तीन पाळ्यात धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यात आलेले आहे.
- त्यानंतर आषाढी वारीला उजनीतून भीमा नदीत पाणी सोडले जाऊ शकते.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |