Ujani Dam Water 2025 पळसदेव : उजनी धरणात उन्हाळ्यात नदीपात्रात पाणी सोडण्याची तरतूद नसताना देखील दरवर्षी राजकीय दबावापोटी उजनी धरणातून बेकायदेशीरित्या नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे मात्र धरणग्रस्त शेतकऱ्यांना हक्काच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.

यावर्षी देखील कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत सुमारे 11 टीएमसी पाणी बेकायदेशीर रित्या सोडण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जो धरणग्रस्तांना रस्त्यावर आणणारा आल्यात मत उजनी धरणग्रस्त इंदापूर तालुका बचाव कृती समितीचे अध्यक्ष अरविंद जगताप यांनी व्यक्त केले.
साठवणुकीत कांद्याला मोड येऊ नये म्हणून करा हा सोपा उपाय; वाचा सविस्तर;
कालवा सल्लागार समितीच्या झालेल्या निर्णयानुसार भीमा नदीतून पहिल आवर्तन 6 एप्रिल ते 20 एप्रिल यादरम्यान 6.50 टीएमसी व 26 मे ते 7 जून पर्यंत 4.50 टीएमसी पाणी सोडण्याचा बेकायदेशीर निर्णय झाला आहे.

मूळ सीनचा आराखड्यात उन्हाळ्यात नदीपात्रात पाणी सोडण्याची तरतूद नसताना हा प्रताप करण्यात आला आहे. उलट धरणग्रस्तांच्या हक्काच्या राखीव पाण्याची तरतूद करण्यात आली नाही, त्यामुळे सरकारने पुन्हा या वर्षी धरणग्रस्त शेतकऱ्यांवर अनन्या अन्याय केला असल्याचा आरोप अरविंद जगताप सह धरणग्रस्त शेतकरी करीत आहेत.
Ujani Dam Water 2025….50 गावातील नागरिकांना फटका
विशेष बाब म्हणजे इंदापूरचे आमदार व विद्यमान क्रीडा मंत्री यांच्या काळात लवादाचा हा निर्णय झाला होता. त्यानंतर भरणे यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद असतानाच्या काळात देखील इंदापूरच्या आमदारांची तालुक्यातील जनतेचा उजनीच्या राखीव पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पाईपलाईन पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले नाहीत, असा आरोप अरविंद जगताप यांनी केला. त्यामुळे सध्या इंदापूर तालुक्यातील धरणग्रस्त 27 गाव व उजनीच्या पाण्यावर अवलंबून असणारे 20 ते 25 अशी सुमारे 40 ते 50 गावातील नागरिकांना याचा फटका बसला आहे.
पाण्यासाठी शेतकऱ्यांना जीवाचं रान करून उजनीतील गाळात पाईप व केबल वाढवण्याची वेळ आली आहे. धरणग्रस्त शेतकरी मामा आम्हाला विकास नको, आमच्या शेतीला पाणी द्या, अशी विनवणी करत आहे. तरी उजनीच्या हक्काच्या पाण्याबाबत काठावरील शेतकरी संघटित नसल्याने राज्यकर्ते केवळ पाण्यावर राजकारण करून वेळ मारून नेत आहेत व दरवर्षी शेतकऱ्याला मात्र हक्काच्या जमिनी देऊन पाण्यासाठी रडत बसण्याची वेळ आली आहे.
Ujani Dam Water 2025 धरणात पाणीच शिल्लक राहणार नाही!
- सध्या उजनी धरणात केवळ 18.64 टीएमसी पाणी शिल्लक आहे दररोज सुमारे 4200 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
- बोगदा 333, कॅनॉल 2850 क्युसेक, दहेगाव योजना 120 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. याच प्रमाणे विसर्ग सुरू राहिल्यास 7 जून पर्यंत सोडण्यासाठी धरणात पाणीच शिल्लक राहणार नाही.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |