Ujani Dam Minus 2025 टेंभुर्णी राज्यातील सर्वाधिक मृत साठ्यात असलेले उजनी धरणाची दि. 18 रोजी सकाळी 6 वाजता उपयुक्त पाणी पातळी संपली आहे. धरणात 63 टीएमसी मृत साठा शिल्लक राहिला आहे. सीना-माढा उपसा सिंचन योजना बंद करण्यात आली असून, भीमा-सीना जोड कालवा, मुख्य कालवा व भीमा नदीतून विसर्ग सोडण्यात येत असून पुढील दोन दिवसात मुख्य कालवा वगळता उजनी धरणावर सर्व योजना बंद करण्यात येणार आहेत.

उजनी मुख्य कालवा 15 ते 20 मे पर्यंत चालू राहणार आहे. चार महिन्यात 54 टीएमसी पाणीसाठा संपला आहे. 29 डिसेंबर 24 रोजी उजनी धरणाची पाणी पातळी 100 टक्के होती. 123 टीएमसी क्षमता असलेल्या उजनी सर्वाधिक मत साठ्यातील धरण म्हणून ओळखले जाते. गतवर्षी दुष्काळामुळे उजनी केवळ 60 टक्के भरले होते, तर जानेवारी महिन्यात मृत साठ्यात गेले होते.
मागील वर्षीच्या तुलनेत उजनीच्या पाणी साठ्यात मोठी घट, धरण लवकरच मायनसमध्ये;
चालू हंगामात उजनी पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे एप्रिल अखेरपर्यंत शेतीसाठी उन्हाळी हंगामात पाणी मिळू शकेल. गतवर्षी उजनी वजा 40 टक्के पाणी पातळी होती, तर गत दोन वर्षांपूर्वी 19 एप्रिल 2023 रोजी 13.36 टक्के अधिक पाणी पातळी होती. सध्या उजनी धरणातून मुख्य कालवा 2 हजार 150 दिवसे क्युसेक, भीमा सीमा जोड कालवा 610 क्युसेक, भीमा नदीत 6 हजार क्युसेक, तर दहिगाव 60 क्युसेक असा एकूण 9 हजार 620 क्युसेक विसर्ग उजनीतून सोडण्यात येत आहे.

Ujani Dam Minus 2025 पुढील दोन दिवसात मुख्य कालवा वगळता इतर योजनातून पाणी बंद होणार असून पुढील दोन महिने शेतीसाठी चिंतेचे असणार आहेत, तर मान्सून कधी दाखल होतो यावर शेतीसह पिण्याचा पाण्याचा प्रश्न अवलंबून असणार आहे.
Ujani Dam Minus 2025 बंधारे भरून घेतल्याने दोन महिने चिंता मिटणार
- सोलापूर व उजनी नदीकाठचा गावांना सोडण्यात आलेले पाणी टाकळी व चिंचपूर बंधारा भरून घेतल्यास दोन महिन्यांची चिंता मिटणार आहे.
- यानंतर आषाढी वारी दरम्यान उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडले जाऊ शकते.
Ujani Dam Minus 2025 अतिरिक्त पाणी सोडण्याची वेळ आली नसती
- सोलापूर शहराला समांतर जलवाहिनी वेळेत पूर्ण झाली असती तर आणखी उजनीतून भीमा नदीतील पाणी सोडण्याची वेळ आली नसती.
- भीमा नदीत साधारण 20 टीएमसी पाणी सोडावे लागते. साधारण आणखी 10 टीएमसी पाणीसाठा उजनी धरणात शिल्लक राहिला असता.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |