Uajni Dam Water Level 2025 टेंभुर्णी: उजनी पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसाने विश्रांती घेतल्याने दौड येथील निसर्गात घट झाले असून, दौंड येथून 14,000 क्युसिक विसर्ग उजनी धरणात मिसळत आहे.

Uajni Dam Water Level 2025 दौंड येथील निसर्गात घट झाली असली तरी ‘उजनी’ची पाणीपातळी सायंकाळी 6 वाजता 57.50% झाली असून गुरुवारी सायंकाळी पर्यंत ६० टक्क्यांपर्यंत पोहोचणार आहे.
पुढील पाच दिवस पावसाची अशीच बॅटिंग सुरू राहणार; कुठे कोणता अलर्ट?
गेल्या दोन दिवसात पुणे जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे दौंड येथील विसर्ग 20 हजार क्युसेक पर्यंत गेला होता. मात्र, सध्या पावसाने विश्रांती घेतल्यामुळे दौंड येथील विसर्ग घटत गेला आहे.

गेल्या आठ दिवसात उजनी धरणात 20 टक्के पाणीपातळी वाढली आहे. गेल्या गुरुवारी उजनीची पाणी पातळी 37% होती. सध्या उजनी धरणात एकूण 94.46 टीएमसी पाणीसाठा असून, 30.80 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.
गेल्या तीन दिवसाच्या 4 टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. 1 जून पासून 37 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी 19 जूनला उजनी धरणाची पाणी पातळी वजा 46.71 टक्के होती. गतवर्षीच्या तुलनेत सध्या 104% अधिक पाणीसाठा आहे.
Uajni Dam Water Level 2025 गतवर्षी 153 टीएमसी पाणी भिमित सोडले
गतवर्षी 153 टीएमसी अतिरिक्त झालेले पाणी उजनी धरणातून भीमा नदीत सोडून द्यावे लागले होते. भीमा खोऱ्यातील घोडा व विसापूर धरणे 80 टक्क्यांपेक्षा जास्त भरले आहेत. खडकवासला धरण 50 टक्के पर्यंत भरले आहे.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |