Turmeric Fertilizer 2025 महाराष्ट्रामध्ये हळदी प्रमुख मसाल्याच्या पिकाची लागवड केली जाते. या पिकाच्या दरामध्ये असलेले चढउतार पाहता येणाऱ्या हंगामामध्ये हे पीक चांगले उत्पादन देऊ शकते. त्यामुळे त्यांच्या उत्पादन वाढीच्या दृष्टीने खतांचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.

Turmeric Fertilizer 2025 या पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार आणि जमिनीच्या प्रकारानुसार अन्नद्रव्यांची मात्रा कमी जास्त होऊ शकते. त्यामुळे खतांचे नियोजन करीत असताना माती परीक्षण करून घेणे खूप महत्त्वाचे आहे.
कापसावरील गुलाबी बोंडअळीचे एकात्मिक कीड व्यवस्थापन!!
साधारणतः पिकाच्या अन्नद्रव्यांच्या व्यवस्थापनाचा अभ्यास केला असता असे दिसून आले आहे की 1 टन हळद तयार होण्यासाठी जमिनीतून हे पीक 16.5 की. नत्र 3.1 स्फुरद आणि 44.5 पालाश जमिनीतून घेते. या पिकांसाठी इतर पिकांप्रमाणेच विविध मूलद्रव्यांची गरज भासते. यामध्ये प्रामुख्याने नत्र, स्फुरद, पालाश या मुख्य अन्नद्रव्या बरोबरच कॅल्शियम, मॅग्नेशियम, आणि सल्फर या दुय्यम अन्नद्रव्यांची गरज भासते. तर लोह, जस्त, मॅंगनीज, बोरॉन, कॉपर, आणि क्लोरीन यासारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची ही गरज असते.

Turmeric Fertilizer 2025 कोबाल्ट, सोडियम, सिलिकॉन यांसारखी मूलद्रव्य ही काही प्रमाणात उत्पादन वाढीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरतात. या पिकासाठी रासायनिक खतांचा विशेषतः सुरुवातीला वापर केल्यास त्याचा अनिष्ट परिणाम होतो. असा काही शेतकऱ्यांचा समज आहे. परंतु हळदीच्या वाढीच्या अवस्थांचा अभ्यास केला असता खतांचे योग्य व्यवस्थापन करणे सोयीचे होते.
हळदीच्या पिकाच्या वाढीच्या प्रामुख्याने चार अवस्था आहेत. यामध्ये 0 ते 45 दिवसांमध्ये उगवण्याची अवस्था पूर्ण होते. हळदीचे एक किंवा दोन पाने येतात. 46 ते 150 दिवसांमध्ये हळदीची शाकीय वाढ होते. या अवस्थेमध्ये हळदीला फुटवे येतात. हळदीला एकूण येणाऱ्या पानांची संख्या या अवस्थेमध्ये निश्चित होते. 151 ते 210 दिवसांमध्ये फुटव्यांपासून हळकुंडे फुटण्यास सुरुवात होते.
210 ते 270 दिवसांमध्ये हळकुंडाची जाडी आणि वजन प्रामुख्याने या अवस्थेमध्ये वाढते. या अवस्थेनुसार नत्र, स्फुरद आणि पालाश मात्रा कमी अधिक प्रमाणात लागते. या पिकास ज्याप्रमाणे रासायनिक व सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज असते, त्याचप्रमाणे सेंद्रिय खतांची गरज असते. सेंद्रिय खतांमध्ये प्रामुख्याने प्रकार पडतात.
भर खते : Turmeric Fertilizer 2025 यामध्ये पोषणद्रव्यांचे प्रमाण कमी असल्याने भर खते रासायनिक खतांपेक्षा जास्त वापरावी लागतात. या खतातील पोषणद्रव्य पिकास हळुवारपणे उपलब्ध होतात. ही खते वापरल्याने जमिनीचे प्राकृतिक गुणधर्मावर चांगला परिणाम होतो. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो. हळदीसाठी प्रामुख्याने एकरी 10 ते 12 टन चांगल्या कुजलेल्या शेणखताचा वापर करावा. शेणखत पुरेसे उपलब्ध नसल्यास गांडूळ खत, प्रेस मड, कंपोस्ट, यासारख्या सेंद्रिय खतांचा वापर जमीन तयार करतेवेळी करावा.
जोर खते : यामध्ये पोषणद्रव्यांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे ही खते आम्ल प्रमाणात घ्यावी लागतात. उदा. सर्व प्रकारच्या पेंडी, हाडाचा चुरा, मासळी खत, इत्यादी. हळदीसाठी प्रामुख्याने एकरी 800 किलो लिंबोळी पेंड 49 जमीन तयार करतेवेळी आणि 400 किलो भरणीच्या वेळी द्यावी.

Turmeric Fertilizer 2025 रासायनिक खतांचे नियोजन करताना हळदीच्या वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थेनुसार आणि माती परीक्षण अहवाल विचारात घ्यावा. माती परीक्षणाचा नमुना साधारणतः 30 सेमी खोलीवरचा द्यावा. कारण हळदीचे कंद प्रामुख्याने 30 सेमी खोलीवर वाढतात. त्यामुळे पिकास आवश्यक अन्नघटक योग्य प्रमाणात देता येतात. सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खते देताना ती शेणखतामध्ये मुरवून दिल्यास त्यांची उपलब्धता वाढते.
खताचे नाव | प्रति 40 आर | खत देण्याची वेळ |
सिंगल सुपर फॉस्फेट म्युरेट ऑफ पोटॅश | 250 कि. 75 कि. | जमीन तयार करतेवेळी लागवड करण्यापूर्वी |
युरिया | 75 कि. | लागवडीनंतर दीड महिन्यासाठी |
फेरस सल्फेट | 4 कि. | लागवडीनंतर दीड महिन्यासाठी |
युरिया | 75 कि. | भरणीच्यावेळी |
फेरस सल्फेट | 4 कि. | भरणीच्यावेळी |
फर्टिगेशन : हळदीचे जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्याच्या दृष्टीने ठिबक सिंचनाच्या माध्यमातून विद्राव्य खतांचा वापर केल्यास पिकाच्या गरजेनुसार खते देता येतात. त्यासाठी जमिनीचे माती परीक्षण करूनच विद्राव्य खतांचा वापर करावा. एखाद्या अन्नघटक जास्त झाला अथवा कमी पडला तरी त्याचा परिणाम लगेचच पिकाच्या वाढीवर झालेला दिसून येतो.
हळदीला नत्र घटक जास्त झाल्यास हळदीची शासकीय वाढ खूप होते आणि हळद काडावर्ती जाते. अशावेळी हळदीच्या कंदाची वाढ थांबते. फर्टिगेशन करताना प्रामुख्याने युरिया, फॉस्फरिक ऍसिड, आणि पांढऱ्या पोटॅशचा वापर करावा. किंवा बाजार मध्ये उपलब्ध असलेल्या 19:19:19, 12:61:0, 0:52:34 आणि 0:0:50 या पाण्यात विरघळणाऱ्या विद्राव्य खतांचा वापर पीक वाढीच्या अवस्थेनुसार करावा हळदीमध्ये फर्टिगेशनची सुरुवात हळद लागवडीनंतर 15 दिवसांनी करावी.
Turmeric Fertilizer 2025 अन्नद्रव्यांची हळदीतील कमतरतेची लक्षणे:
नत्र : हळदीच्या रोपांची वाढ खुंटते खालची जुळत पाणी पिवळी पडतात व गळतात.
स्फुरद : या अन्नद्रव्याचा मुख्यता हळदीच्या मुळी निर्मितीमध्ये मोलाचा मोठा वाटा आहे. यांच्या कमतरतेमुळे मुळ्यांची वाढ थांबते. जुनी पाने खालील बाजूला जांभळी छटा दर्शवतात.
पालाश : या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पानाच्या कडा करपतात तसेच पानाची टोके सुकतात.
कॅल्शियम : प्रामुख्याने शेंड्याकडील पाने पिवळी पडतात सुरळी वेडीवाकडी होते.
मॅग्नेशियम : पानांच्या शिरांमधील जागा पिवळी पडून पानांच्या शिरा गडद हिरव्या रंगाच्या होतात.

गंधक : यामध्ये पिकाची नवीन पाने पिवळी पडतात मुळांची लांबी वाढते खोडाची जाडी कमी राहते.
लोह : नवीन पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो कमतरता अधिक झाल्यास संपूर्ण रोप पिवळे पडते.
जस्त : हळदीची पाने जाड व ठिसूळ बनतात. पानांवर सर्वत्र तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात. पानांची झुंबक्यामध्ये वाढ होते.
तांबे : पाण्याकडे पिवळी पडण्यास सुरुवात होते. पानांची टोके वाळतात. पाने मलूल होऊन वाळून गळतात.
बोरॉन : रोपाच्या शेंड्यांची वाढ थांबते. पाने चबकासारखी लांब राहून सुरळी आकडते.
मॉलिब्डेनम : हळदीची जुनी पाने पिवळे पडतात. पानांवर सर्वत्र तपकिरी ठिपके दिसतात. पानांच्या खालच्या बाजूला डिंकासारखा स्त्राव येताना दिसतो.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |