Turmeric cultivation technology 2025 हळद हे देशातील मसाला पिकांत एक प्रमुख नगदी पीक आहे. दैनंदिन आहारातील आवश्यक ते घटक तसेच औषधी गुणधर्म या पिकात आहेत. आधुनिक वैद्यकीय शास्त्रात पोटाचे आजार, पित्त विषयक विकार, सर्दी पडसे, खोकला, भूक मंदावणे, यकृताचे आजार, सांधिवात अशा अनेक आजारांवर हळद उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे.
भारतीय हळदीला अनेक देशातून मागणे असून निर्यात निर्मितीची देखील चांगली संधी आहे. सुपर फूड या प्रकारात समाविष्ट होणारे हे पीक आहे. महाराष्ट्र राज्याचे एकूण हवामानाचा विचार केला असता हळद हे पीक उत्तमरित्या घेता येते.

Turmeric cultivation technology 2025 हवामान
हळद पिकास उष्ण व दमट हवामान चांगले मानवते. मध्यम पाऊस व चांगल्या स्वच्छ प्रकाशात या पिकाची वाढ उत्तम होते. पाण्याचा ताण व जास्त पाऊसमान हे पीक काही वेळ सहज सहन करू शकते, परंतु जास्त दिवस पिकात पाणी साचून राहणे हानिकारक आहे. तसेच हळद पिकाला जास्त थंडी मानवत नाही. सरासरी तापमान 25 ते 35 अंश डिग्री सेल्सियस असावे, उगवणीसाठी 30 ते 35 अंश डिग्री सेल्सिअस, फुटवे फुटण्यासाठी 25 ते 30°c, कंदवाडीसाठी 20 ते 25 तर कंद चांगले पोहोचण्यासाठी 18 ते 20 °c तापमानाची आवश्यकता असते.
मे ते जून महिन्यातील उष्ण व दमट हवामान या पिकास अनुकूल असते. पावसाळी हंगामात हळदीच्या खोडांची तसेच फुटव्यांची वाढ भरपूर होते. वार्षिक पर्जन्यमान सरासरी 500 ते 750 मिलिमीटर असणाऱ्या मिशुष्क वातावरणात हळदीचे पीक उत्पन्न येते. कोरडे व थंड हवामान हळदीच्या कंद वाढीस पूरक ठरते. जास्त तापमान भागात तापमानाची तीव्रता कमी झाल्यावरच लागवड करावी, अन्यथा कमाल तापमानामुळे उगवणीवर विपरीत परिणाम होतो.
पिक उत्पादन वाढीसाठी करा, जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन!
Turmeric cultivation technology 2025 सुयोग्य जमिनीची निवड
हळद पिकात उत्पन्नाचा स्त्रोत जमिनीत वाढणारा कंद असल्याकारणाने मध्यम प्रतीची काळी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन आवश्यक असते. नदीकाठच्या पोयट्याच्या जमिनीत हळदीचे उत्पादन भरपूर मिळते. जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 च्या दरम्यान असावा. जमिनीची खोल सर्वसाधारणपणे 20 ते 25 सेंटीमीटर असावी. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण 0.5% पेक्षा जास्त असावे.
सेंद्रिय कर्बामुळे जमिनीतील सूक्ष्मजीव कार्यरत होऊन माती जिवंत होण्यास मदत होते. जमिनीमध्ये कार्बन आणि नत्र यांचे योग्य गुंणोत्तर ठेवले जाते. जमिनीतील वेगवेगळ्या प्रकारच्या जिवाणूंना सेंद्रिय कर्बद्वारे ऊर्जा पुरवली जाते. जिवाणूंची कार्यक्षमता वाढवून अन्यद्रव्याची उपलब्धता वाढते. जमिनीचा पोत चांगला राखण्यासाठी दृष्टीने द्विदल किंवा हिरवळीची पिके जसे ताग, धेंचा गाडून जमिनीची पूर्व मशागत करावी.

भारी काळ्या चिकट व क्षारयुक्त जमिनी या पिकास मानवत नाहीत. अशा जमिनीमध्ये पिकाची पाल्याची वाढ जास्त होते. परंतु पाहिजे त्या प्रमाणात कंद पोहोचत नाही, परिणामी उत्पादन कमी मिळते. हळदीचे कंद जमिनीमध्ये साधारणता 1 फूट खोलीवर वाढतात. त्यामुळे लागवडी पूर्वी एक फूट खोलीवरील माती प्रशिक्षण करावे,
माती प्रशिक्षणामुळे खतांचे नियोजन करणे सोयीचे होते. पाण्याचा उत्तम निचरा नसल्यास हळदीस कंदकुज होण्याचा धोका वाढतो. हलक्या जमिनीत सरासरी उत्पादन मिळवण्यासाठी जमिनीची सुपीकता वाढवावी, पोत सुधारावा, जमिनीची चांगली मशागत करावी, चुनखडीयुक्त जमिनीत हळद पीक घेणे टाळावे. अशा जमिनीत पिकावर सतत पिवळसरपणा दिसून येतो व पिकाची वाढ साधारणकारक होत नाही.
सुधारित वाणांची निवड
अधिक उत्पादनासाठी नव्याने विकसित केलेल्या सुधारित वाणांची निवड करावी. सुधारित वाण हे अधिक उत्पादनक्षम अधिक उतारा देणारे तसेच रोगांस काही किडीस प्रतीकारक असतात. घरचे बियाणे असल्यास दर 5 वर्षानंतर बियाणे बदलावे. कंद उगवून आल्यानंतर शेवटपर्यंत एका झाडाला 12 हिरवीगार टवटवीत पाणी आणि 4 ते 5 फुटवे असणे गरजेचे आहे. कुरकुमीनचे प्रमाण 5 टक्के पेक्षा अधिक असावे.
1. फुले हरिद्रा
Turmeric cultivation technology 2025 महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत हळद संशोधन योजना कसबे डिग्रज येथून सेलम वाणातून उत्परिवर्तन पद्धतीने हा वाण विकसित केला आहे. सरळ उंच वाढ पानांचा रंग गर्द हिरवा पानांची संख्या 11 ते 12 असते. या वाणाचा पक्वतेचा काळ 255 दिवसांचा असून फुटव्यांची संख्या 3 प्रती झाड असते. मातृकंद मध्यम आकाराचे असून वजनाने ९० ते १०४ ग्रॅम पर्यंत असतात.
हळकुंड वजनाने 40 ते 42 ग्रॅम असतात. मुख्य हळकुंडाची लांबी 7 ते 8 सेंटीमीटर असते. हळकुंड सरळ व लांब वाढतात, चमकदार दिसतात. हळकुंडाच्या गाभ्याचा रंग गर्द पिवळसर असून कुरुमणीचे प्रमाण 5.35 टक्के इतके आहे. या वाणापासून ओल्या हळदीचे सरासरी हेक्टरी उत्पादन 400 ते 406 क्विंटल तर वाळलेल्या हळदीचे 90 ते 93 क्विंटल उत्पादन मिळते या वाणाचा उतारा 23 टक्के इतका आहे.
2. फुले स्वरूपा
मध्यम उंच वाढ पानांचा रंग हिरवा पानांची संख्या 11 ते 13 असते या वाणाचा पक्वतेचा काळ 255 दिवसाचा असून फुटव्यांची संख्या 2 ते 3 प्रती झाड असते. गड्डे लहान आकाराचे असून वजनाने 50 ते 55 ग्रॅम पर्यंत असतात.
या जातीपासून ओल्या हळदीचे सरासरी हेक्टरी उत्पादन 358.30 क्विंटल तर वाळलेल्या हळदीचे 78.82 क्विंटल उत्पादन मिळते. या वाणाचा उतारा 22 टक्के इतका आहे. या वाणांमध्ये पानांवरील करपा रोगांस तसेच कंदमाशी या किडीस प्रतिकारक गुण असल्याचे दिसून आले आहे.
3. सेलम
Turmeric cultivation technology 2025 महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये लागवडीसाठी या वाणाची शिफारस करण्यात आली आहे. पाने रुंद हिरवी असून झाडास 12 ते 15 पाने येतात, झाडास सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये जास्त आद्रता असल्यास व सततचा रिमझिम पाऊस असल्यास फुले येतात, हळकुंडे जाड व ठसठशीत असतात. हळकुंडाची साल पातळ असून गाभ्याचा रंग गर्द पिवळा असतो. चांगल्या कसदार पोताच्या जमिनीत सेलम जातीच्या झाडाची उंची 5 फुटापर्यंत वाढते, आणि 3 ते 4 फुटवे येतात.

कुरकमींणचे प्रमाण 4 ते 4.5 टक्के इतके आहे. ओल्या हळदीचे सरासरी हेक्टरी उत्पादन 350 ते 400 क्विंटल तर वाढलेल्या हळदीचे 70 ते 80 क्विंटल उत्पादन मिळते ही हळद परिपक्व होण्यास 8.5 ते 9 महिने लागतात करपा रोगास बळी पडते.
4. राजापुरी
Turmeric cultivation technology 2025 सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यामध्येही हळद प्रामुख्याने पिकवली जाते. एका झाडास 10 ते 15 पाने येतात. पाने रुंद फिकट हिरवी व सपाट असतात. झाडास फुले क्वचित येतात, हळकुंडे व उप हळकुंडे अखूड, जाड, अंगठ्यासारखे ठसठशीत असतात. हळकुंडाची साल पातळ असून गाभ्याचा रंग पिवळा ते गर्द पिवळा असतो. कुरकमींणचे प्रमाण 6.30 टक्के इतके आहे.
शिजवले नंतर वाळलेल्या हळदीचा उतारा 18 ते 20 टक्के पडतो, ओल्या हळदीचे सरासरी हेक्टरी उत्पादन 250 ते 300 क्विंटल तर वाळलेल्या हळदीचे 50 ते 60 क्विंटल उत्पादन मिळते. हळद परिपक्व होण्यास 8 ते 9 महिने लागतात. राजापुरी जातीला स्थानिक बाजारपेठेत आणि गुजरात व राजस्थान राज्यातून चांगली मागणी असल्याने भावही चांगला मिळतो. हळद वायदेबाजारातील भाव राजापुरी जातीवरून ठरला जातो. यामुळेच हा वाण कमी उत्पादन देणारा असला तरी लागवडीसाठी प्राधान्याने शेतकरी या वाणास पसंती देतात.
5. कृष्णा
हळद संशोधन योजना कसबे डिग्रस येथून कडप्पा या जातीमधून निवड पद्धतीने विकसित करण्यात आली आहे. पाने आकाराने रुंद, रंगाने हिरवट व सपाट असतात, एका झाडास 10 ते 12 पाने असतात. हळकुंडे लांब जाड व प्रमाणबद्ध असतात. हळकुंडीचा गाभा पांढरट पिवळा असतो. पेरे संख्या 8 ते 9 इतकी असते. हळकुंडाच्या दोन पेरांमधील अंतर इतर जातींच्या तुलनेत जास्त असते वाळलेली हळकुंडे थोडीशी सुकलेली दिसतात, वाळल्यानंतर मुख्य हळकुंडाची लांबी 6 ते 7 सेंटीमीटर असते.
Turmeric cultivation technology 2025 कुरकमींणचे प्रमाण 2.80% इतके आहे, वाळलेल्या हळदीचे सरासरी हेक्टरी उत्पादन 75 ते 80 क्विंटल एवढे मिळते, पानांवरील ठिपके या बुरशीजन्य रोगास अल्प प्रमाणात बळी पडतो.
6. टेकुरपेटा
Turmeric cultivation technology 2025 या वाहनांची हळकुंडे लांब जाड व प्रमाणबद्ध असतात. मात्र, हळकुंडाचा गाभा आणि पानांचा रंग फिकट पिवळा असतो कुरकमींणचे प्रमाण 1.80% इतके आहे. कच्चा हळदीचे उत्पादन 380 ते 400 क्विंटल व वाळलेल्या हळदीचे 35 ते 70 क्विंटल प्रति हेक्टर इतके आहे.
7. वायगांव
Turmeric cultivation technology 2025 तालुका समुद्रपूर जिल्हा वर्धा येथे पारंपारिक दृष्ट्या घेतली जात असून, 7 ते 7.5 महिन्यात पक्व होते. या वाणात जवळजवळ 90 टक्के झाडांना फुले येतात. पानांचा रंग गर्द हिरवा व चकाकणारा असतो. 8 ते 10 पाने येतात. पानांना तीव्र सुवास येतो हळद पावडरची चवही वेगळी येते. कुरकमींणचे प्रमाण 6-7 % इतके आहे. उतारा 20 ते 22 टक्के इतका असतो, हळकुंडे लांब व प्रमाणबद्ध असतात. गाभा गर्द पिवळा असतो कच्च्या हळदीचे उत्पादन 175 ते 200 क्विंटल व वाळलेल्या हळकुंडाचे उत्पादन 38 ते 45 क्विंटल प्रति हेक्टर इतके आहे, हा वाण करपा रोगास बळी पडतो.

8. आंबे हळद
या प्रकारच्या हळदीला कच्च्या आंब्यासारखा सुवास येतो ही हळद दिसायला इतर वनांप्रमाणेच असते परंतु आतील रंग एकदम फिकट पिवळा पांढरट असतो. ही हळद हळव्या प्रकारात मोडत असून ती 7 ते 7.5 महिन्यात काढण्यास तयार होते. या वाणाचा मुख्य वापर लोणच्यामध्ये करतात.
9. इतर जाती
भारतीय मसाला पिके संशोधन केंद्र कोझिकोड येथून सुवर्णा, सुगुना, सुदर्शना, प्रभा, आयआयएसआर प्रतिभा, आयआयएसआर केदाराम तसेच तमिळनाडू कृषी विद्यापीठ कोईबतूर येथील बीएसआर-1, बीएसआर-2, बिहार राज्यातील राजेंद्र सोनिया आणि शिलाँग मेघालय राज्यातील मेघा या विविध जाती विकसित करण्यात आल्या आहेत.
Turmeric cultivation technology 2025 माती परीक्षण
ज्या जमिनीत अन्नाशयाचे प्रमाण जास्त तिची सुपीकता जास्त असल्याने केवळ शाखीय वाढ जोमाने होते. परंतु अशा जमिनीत वाढणारे कंद कमी पोसतात त्यांचा आकार अतिशय लहान राहतो म्हणून हळद लागवडीसाठी निवडलेल्या जमिनीची माती परीक्षण करून घ्यावे, माती परीक्षण अहवालानुसार योग्य त्या प्रमाणात खते देणे सोयीचे होते. परिणामी उत्पन्नात वाढ होण्यास मदत होते.
पूर्व मशागत
हळद लागवडीपूर्वी पूर्व मशागत करणे फार महत्त्वाचे आहे. यामध्ये प्रामुख्याने नांगरट करणे, ढेकळे फोडणे, शेताच्या कडा कुदळणे, किंवा टिकावाने खणून काढणे, ही सर्व कामे पूर्ण नियोजन करून त्याप्रमाणे करून घ्यावीत. हळद हे जमिनीत वाढणारे खोड आहे. त्यामुळे जमीन जितकी भुसभुशीत तितके हळदीचे उत्पादन चांगले मिळते.
लागवडीचा हंगाम व बियाणे
हळदीची लागवड साधारणपणे एप्रिल महिन्याच्या मध्यापासून ते जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी. हळदीच्या लागवडीत उशीर झाल्यास त्याचा उत्पादनावर अनिष्ट परिणाम झाल्याचे दिसून येते. मे ते जून मध्ये लागवड केलेल्या हळदीचा कालावधी जानेवारी ते फेब्रुवारी पर्यंत जातो. त्यामुळे दुसरे भाजीपाला पीक घेता येते. हळदीच्या लागवडीच्या दृष्टीने बियाणाची निवड ही खूप महत्त्वाची आहे. एकदा घेतलेले बियाणे सर्वसाधारणपणे 5 वर्षापर्यंत वापरता येते. एक हेक्टर हळद लागवडीसाठी 25 क्विंटल जेठे गड्डे बियाणे आवश्यक असते. जास्त उत्पादन घेण्याच्या दृष्टीने आंगठे गड्डे आणि हळकुंड बियाण्यापेक्षा जेठे गड्डे वापरल्याने उत्पादन अधिक येते.
Turmeric cultivation technology 2025 बीजप्रक्रिया
कंदमाशी या किडीपासून आणि इतर बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण मिळवण्यासाठी लागवडीसाठी निवडलेले गड्डे बियाणे आंतरप्रवाही कीटकनाशक क्विनॉलफॉस 25% प्रवाही 20 मि.ली. + बुरशीनाशक कार्बेनडेझीम 50 टक्के पाण्यात मिसळणारे 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात घेऊन या द्रवणात 15 ते 20 मिनिटे बुडवावेत. बीज प्रक्रिया करताना बेणे किमान 15 मिनिटे द्रावणात बुडून राहतील याची दक्षता घ्यावी. 10 लिटरचे द्रावण 100 ते १२० किलो बियाणांसाठी वापरावे.
Turmeric cultivation technology 2025 उत्पादन
हळदीचे उत्पादन हे वापरलेली जात, निरोगी बियाणे, दिलेली खते, जमिनीचा प्रकार यावर अवलंबून असते. सर्वसाधारणपणे एक हेक्टर क्षेत्रातून ओल्या हळदीचे 350 ते 400 क्विंटल अधिक 25 ते 30 क्विंटल मातृगडे इतके उत्पन्न मिळते. या ओल्या हळदीवर प्रक्रिया (शिजवणे वाळवणे पॉलिश करणे) केली असता सर्वसाधारणपणे हेक्टरी 70 ते 75 क्विंटल वाळलेली हळद मिळते.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |