हळद पिकातील कीड व रोगांचे नियंत्रण!! Turmeric Crops 2025

Turmeric Crops 2025 सध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. निर्यातक्षम व गुणवत्तापूर्ण हळदीच्या उत्पन्नासाठी पूर्वमशागती पासून ते हळद प्रक्रियेपर्यंत हळद पिकाचे व्यवस्थापन काळजीपूर्वक करणे गरजेचे असते.

Turmeric Crops 2025

Turmeric Crops 2025 आता हळद पिकाची शाकीय वाढ होण्याच कालावधी सुरू आहे. या अवस्थेमध्ये हळदीला फुटवे येतात. पावसाळी हंगामात हळदीच्या खोडांची तसेच फुटव्यांची वाढ भरपूर होते. तसेच हळदीचे गड्डे तयार होण्याची ही योग्य वेळ आहे.

कपाशीवरील एकात्मिक रोग व्यवस्थापन!!

जर तापमान फारच कमी झाले तर हळद पिकांवर विविध किडी रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. परिणामी गड्ड्यांची संख्या आणि आकार यावर रोगांचा परिणाम होत असतो. योग्य व्यवस्थापनासाठी कीड व रोगाचे वेळीच नियंत्रण करणे गरजेचे असते.

WhatsApp Group Join Now

Turmeric Crops 2025 किडी नियंत्रण:

कंदमाशी:

कंदमाशी हळदीवरील प्रमुख नुकसान करणारे कीड म्हणून ओळखले जाते. पण आकाराने मोठी व काळसर रंगाचे असते. माशीचे पाय शरीरापेक्षा लांब असतात. पायाची पुढील टोके पांढऱ्या रंगाचे असतात. पायाची पुढील टोके पांढऱ्या रंगाची असतात. दोन्ही पंख पातळ व पारदर्शक असून त्यांच्यावर राखाडी रंगाचे दोन ठिपके असतात.

अळी पिवळसर असून तिला पाय नसतात. कंदमाशी खोडाच्या बुंध्यांजवळ अथवा उघड्यावर पडलेल्या कंदांवर अंडी घालते. पाच ते सात दिवसात अंड्यातून लालसर रंगाच्या नवजात अळ्या बाहेर पडतात व उपजीविकेसाठी कंदामध्ये शिरतात. अळ्यांचा शिरकाव कंदामध्ये झाल्याने तेथे रोगकारक बुरशी तसेच सूत्रकृमींचा प्रादुर्भाव सुरु होऊन कंद मऊ होतात.

त्यांना पाणी सुटून ते कुजू लागतात. लांबलेला पावसाळा कंदमाशीसाठी अधिक प्रमाणात अनुकूल असतो. या किडीमुळे हळद पिकामध्ये 45 ते 50 टक्के नुकसान होते. हि कीड ऑक्टोबर पासून ते पिकाच्या काढणीपर्येंत नुकसान करते.

नियंत्रण:

  1. कंदमाशीचा प्रादुर्भाव दिसतात फोरेट 10 टक्के दाणेदार एकरी 8 किलो या प्रमाणात वापरावे.
  2. जुलै ते सप्टेंबर दरम्यान क्विनॉलफॉस 25% प्रवाही 2 मिली किंवा डायमेथोएट 1 मिली प्रति लिटर या प्रमाणात घेऊन जुलै ते सप्टेंबर दरम्यान महिन्यात 15 दिवसांच्या अंतराने गरजेनुसार फवारावे.
  3. उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत वेळेवर हळदीची भरणी करावी.
  4. हळद काढल्यानंतर शेतात राहिलेल्या पिकांचे अवशेष सडके गंधक नष्ट करतात.
  5. हेक्टरी 6 पसरट भांडी वापरून प्रत्येकी भांड्यात भरडलेले एरंडीचे बी 200 ग्रॅम मिळून त्यात 1.5 मीटर पाणी घ्यावे. 8 ते 10 दिवसांनी या मिश्रणातून विशिष्ट असा वास बाहेर निघू लागल्यावर कंदमाशी आकर्षित होऊन उपाययोजना अत्यंत प्रभावी कमी खर्चिक व सहजरीत्या करण्यासाठी असल्याने सेंद्रिय हळद उत्पादनामध्ये ती महत्त्वाची भूमिका निभावणारे आहे.

WhatsApp Group Join Now

Turmeric Crops 2025 खोडकिडा:

खोडकिडा हळद पिकावरील एक नुकसानकारक कीड असून या किडीचा पतंग आकाराने लहान व नारंगी रंगाचा असतो. दोन्ही पंखांवर काळ्या रंगाचे ठिपके असतात. अळी लालसर रंगाची असून अंगभर काळे टिपले असतात. अळी खोड व हळदीचे कंद पोखरते, व आतील भाग खाऊन टाकते. पानांवर एका ओळीत छिद्र पडलेले दिसणे हे या किडीच्या प्रादुर्भावाचे प्रथम लक्षण होय.

नियंत्रण:

  1. प्रादुर्भाव झाडे नष्ट करावेत.
  2. निंबोळी तेल 5 मिली प्रति लिटर पाण्यातून फवारावे गरजेनुसार 15 दिवसांनी दुसरी फवारणी करावी.
  3. प्रकाश सापळ्यांचा वापर करावा प्रति एकर सापळा रात्री 7 ते 10 या वेळेत चालू ठेवावा. यामध्ये या किडीचे प्रौढ आकर्षित होतात. त्यांना नष्ट करावे.

पाने गुंडाळणारी अळी:

या किडीचा प्रादुर्भाव सर्वसाधारणपणे ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होतो. वन नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्या पर्यंत दिसून येतो. पतंग काळसर व पांढऱ्या रंगाचा असतो. हिरव्या रंगाच्या अळ्या पाने गुंडाळून त्यात लपतात व आत राहूनच पाने खातात. पूर्ण वाढ झालेली अळी पानांच्या गुंडाळीतच किशावस्थेत जाते.

नियंत्रण:

  1. गुंडाळलेली पाने अळी व कोष वेचून नष्ट करावीत .
  2. डायमेथोएट 1 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

Turmeric Crops 2025 सुत्रकृमी:

सूत्रकृमी हा हळद पिकाच्या सर्वात मोठा शत्रू आहेकीड अतिशय सूक्ष्म असून डोळ्यांना दिसत नाही हि कीड हळदीच्या मुळांवर गाठी तयार करते व जमिनीत पिकांच्या मुळा भोवती राहून सुईसारख्या अवयवाने मुळातील रस शोषून घेते त्यामुळे पिकांची वाढ खुंटते प्रथम पिकाचा शेंडा मालून होऊन पिके पिवळी पडून झाड मरते. कालांतराने ही कीड हळदीच्या कंदामध्ये प्रवेश करून कंद खराब करण्याचे काम करते.

नियंत्रण:

  1. सूत्रकृमीच्या व्यवस्थापनाकरिता जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा + पावडर 2 किलो प्रति एकरी 250 किलो शेणखतामध्ये मिसळून वापरावी.
  2. फोरेट 8 किलो प्रति एकर या प्रमाणात जमिनीत वापरावे.
  3. भरणी करताना निंबोळी पेंड 8 क्विंटल प्रति एकर या प्रमाणात वापर करावा.
  4. हळद पिकात झेंडू सूत्रकृमींसाठी सापळा पीक म्हणून लावावे.

Turmeric Crops 2025 हुमणी:

या किडीची आळी नुकसानकारक असते मादी भुंगेरे रोज एक याप्रमाणे अंडी घालतात व त्यातून 15 ते 20 दिवसात अळी बाहेर पडते अंड्यातून बाहेर पडलेल्या आळ्या काही दिवस सेंद्रिय पदार्थांवर उपजीविका करतात नंतर मुळे कुरतडतात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास भागात कंदही कुरतडतात मुळे कुर्तडल्यामुळे हळदीचे पीक पिवळे पडते. रोपे वाळू लागतात व उमटल्यास सहज उपटून येतात.

नियंत्रण:

  1. किडीच्या नियंत्रणासाठी एकत्रित मोहीम राबवून एकात्मिक कीड व्यवस्थापन केल्यास नियंत्रण सुलभ होते. संध्याकाळच्या वेळेला या किडीचे भुंगेरे बाहेर पडतात. ते गोळा करून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून नष्ट करावेत. हळद लागवडीनंतर या किडीचा प्रादुर्भाव आढळल्यास 4 मिली क्लोरोपायरीफॉस प्रति लिटर पाण्यात घेऊन त्याची आवळणी द्यावी.
  2. आवळणी करणे शक्य नसल्यास फोरेट 10 हे कीटकनाशक 20 किलोग्रॅम प्रति हेक्टर मातीत मिसळावे जैविक नियंत्रणासाठी मेटेरायझिम ही परोपजीवी बुरशी हेक्टरी 5 किलो या प्रमाणात शेणखतात मिसळून वापरावी.

Turmeric Crops 2025 रोग नियंत्रण:

कंदकूज:

कंदकुज म्हणजेच रायझोम रॉट तर या बुरशीजन्य रोगामुळे हळद पिकाचे 30 ते 35 टक्के नुकसान होते. रोगाची लक्षणे कंदाच्या कोवळ्या फुटव्यांवर लगेच दिसून येतात. नवीन आलेल्या फुटव्यांची पाने पिवळसर तपकिरी रंगाची होतात. खोडाचा रंग तपकिरी काळपट होतो. प्रादुर्भावग्रस्त फुटवा ओढल्यास सहज हातामध्ये येतो. जमिनीतील कंद बाहेर काढल्यास मऊ लागतो त्यातून दुर्गंधीयुक्त पाणी बाहेर पडत असते. भरपूर पाऊस, भारी काळी कसदार व कमी निचरा होणारी जमिन या रोगास पोषक असते. ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो.

नियंत्रण:

  1. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा प्लस प्रति एकरी 2 ते 2.5 किलो पावडर 250 ते 300 किलो शेणखतांमध्ये मिसळून जमिनीत पसरवून द्यावी.
  2. रोगाची तीव्रता जास्त असल्यास कॉपर ऑक्झीक्लोराईड पाच ग्रॅम प्रति लिटर पाण्यात घेऊन हळदीच्या बुध्यानभोवती आवळणी करावे.
  3. कार्बेनडिझम 1 ग्रॅम किंवा 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी घेऊन आवश्यकतेनुसार फवारणी करावी.
  4. पावसाळ्यात शेतामध्ये चर घेऊन पाण्याचा निचरा करावा पाणी साठू देऊ नये.

पानांवरील ठिपके (करपा लीफ स्पॉट):

करपा हा बुरशीजन्य रोग असून वातावरणात सकाळी पडणारे धुके व दव असताना या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये रोगाची तीव्रता जास्त असते कोलेटोट्रिकम कॅप्सिसी मुळे अंडाकृती लंबगोलाकार तपकिरी रंगाचे ठिपके पानावर पडतात. व पान सूर्याकडे धरून पाहिल्यास ठिपक्यांमध्ये अनेक वर्तुळे दिसतात. रोगाची तीव्रता वाढल्यास संपूर्ण पान करपते वाळून गळून पडते.

नियंत्रण:

मॅन्कोझेब 2 ते 2.5 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड 2.5 ते 3 ग्रॅम प्रति लिटर पाणी घेऊन फवारावे जास्त दिवस धुके राहिल्यास 15 दिवसांच्या अंतराने पीक सात महिन्याचे होईपर्यंत औषध अलटून पालटून फवारणी करावी. एकच औषध फवारणीसाठी सतत वापरू नये.

पानांवरील ठिपके(लीफ ब्लॉच):

या रोगाचा प्रादुर्भाव वातावरणातील आद्रता वाढल्यामुळे दिसू लागतो टॅफ्रिना मॅक्युलन्स या बुरशीमुळे होणाऱ्या या रोगामध्ये पानांवर असंख्य लहान तांबूस रंगाचे गोलाकार ठिपके तयार होतात. पुढे ते वाढत जाऊन संपूर्ण पान करपते पानाच्या खालील भागावर मुख्य शिरेच्या बाजूस लालसर करड्या रंगाचे 1 ते 2 सेमी व्यासाचे ठिपके दिसतात. त्यामुळे पाने वाळतात. रोगाची सुरुवात जमिनीलगतच्या पानांवर होऊन नंतर रोग वरील पानांवर पसरतो हळदीची पाने शेंड्यांकडून पिवळी दिसायला लागतात.

नियंत्रण:

रोगाच्या व्यवस्थापनाकरिता कार्बेनडिझम किंवा मॅन्कोझेब हे बुरशीनाशक अनुक्रमे 1 व 2.5 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड 2.5 प्रतिलिटर पाणी या प्रमाणात घेऊन प्रादुर्भाव लक्षात घेऊन 10 दिवसाच्या अंतराने औषधांची अलटून पालटून फवारणी करावी. रोगग्रस्त पाने वेचून नष्ट करावे. शेतात स्वच्छता ठेवावी.

Turmeric Crops 2025 इतर बाबी

  • हळद पिकात पाणी साचू देऊ नये, वेळोवेळी चर काढून साचलेल्या पाण्याचा निचरा करावा.
  • लागवडीसाठी निरोगी बियाणे वापरावे.
  • हळद पिकास लागवडीपासून 6 ते 7 महिन्यांनी जातीनुसार थोड्याफार प्रमाणात फुले येतात, ही फुले दांड्यांसहित काढावीत, फुले काढल्यामुळे पूर्ण अन्नपुरवठा कंदाला मिळतो. त्यामुळे कंद पोसण्यास मदत होते.
  • शिफारसीत वेळेत हळदीची भरणी करावी त्यामुळे रोग किडींपासून हळद पिकाचा बचाव होतो.
  • हळदी नंतर परत हळद किंवा आले यासारखे पिके सलग त्याच क्षेत्रामध्ये घेऊ नयेत. पिकांचा फेरपालट करावा.
  • कंदमाशीचा प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी शक्यतो सर्व शेतकऱ्यांनी मिळून कमीत कमी 2 ते 3 वर्ष सामुदायिकपणे कंदमाशीचे नियंत्रण करावे.
  • शिफारस केलेले हळद जातींची लागवडीसाठी निवड करावी. वेळेवर हळद लागवड करावी.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment