नव्या तूर बाजारात दाखल; कसा मिळतोय दर.. वाचा सविस्तर : Tur Market Update 2025

Tur Market Update 2025 तुरीचा नवीन माल (Tur Market Update 2025) बाजारात दाखल होत आहे. त्यामुळे आता येत्या काळात शासकीय खरेदी सुरू होणार असल्याने तुरीला कसा दर मिळतो याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Tur Market Update 2025

WhatsApp Group Join Now

बाजारात प्रतिक्विंटल 10 हजार रुपयांनी विक्री होणारी तुर नवीन माल आल्याने 7 हजार रुपयांवर आली आहे. शासनाचा तुरीला केवळ 7 हजार 750 रुपये हमीभाव आहे.

दुसरीकडे सोयाबीन (Soyabean) विक्री वेळी हमीभाव केंद्रात आलेला अनुभव व रखडलेल्या चुकाऱ्यामुळे तुरीच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांकडून नोंदणीकडेच पाठ फिरवल्याचे दिसत आहे.

22 फेब्रुवारी पर्यंत धाराशिव येथील खरेदी केंद्रावर केवळ दोन शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. धाराशिव जिल्ह्यात फेडरेशनने तूर खरेदीसाठी 21 केंद्रांना मंजूर दिली आहे.

हमीभावाने तुरीच्या विक्रीसाठी 24 जानेवारी ते 22 फेब्रुवारी दरम्यान ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी मुदत होती. मात्र, जनजागृतीचा अभाव आणि बाजारातील तुरीचा दर घसरल्याने शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद दिसत आहे.

शासनाने ही तुरीला अत्यल्प 7 हजार 750 रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. एक महिन्यापूर्वी बाजारात 10 हजार रुपये प्रति क्विंटलने तुरीची विक्री झाली. मात्र, नवीन तूर बाजारात येताच 7 हजार रुपयांवर भाव आले आहेत. हमीभाव कमी असल्याने शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी कडे दुर्लक्ष केले आहे.

WhatsApp Group Join Now

मुदत वाढीची गरज :

हमीभावाने तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांनी राज्य शासनाच्या अधिकृत पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. जवळच्या खरेदी केंद्रात वेळेवर तूर विक्रीसाठी अर्ज करावा लागतो. 22 फेब्रुवारीपर्यंत नोंदणीसाठी मुदत होती. मात्र, शेतकऱ्यांना माहिती नसल्याने नोंदणी झाली नाही. शासनाने नोंदणीसाठी मुदत वाढ देण्याची मागणी काही शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांतून होत आहे.

वाढत्या तापमानात भाजीपाला पिकासाठी कृषी सल्ला वाचा सविस्तर..

कशी करावी नोंदणी ?

हमीभावाने तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांनी राज्य शासनाच्या अधिकृत पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच, जवळच्या खरेदी केंद्रांमध्ये वेळेवर तुर विक्रीसाठी अर्ज सादर करावा.

तूर खरेदी केंद्रांवर हमीभावाने तूर विक्री केल्यास शेतकऱ्यांना निश्चित दर मिळू शकतो. 22 फेब्रुवारी पर्यंत नोंदणीसाठी मदत आहे. नोंदणीला कमी प्रतिसाद मिळत असल्याने मुदत वाढण्याची चिन्हे आहेत.

05 केंद्रांवर किती नोंदणी :

धाराशिव येथील खरेदी केंद्रासह इतर पाच केंद्रावर तूर विक्रीसाठी अत्यंत कमी शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केल्याचे केंद्रातील अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्याने सांगितले.

काय सांगते आकडेवारी ?
हमीभाव क्विंटल 7,550
आवक घटली 0.1 (क्विंटल मध्ये)
नोंदणी झालेले शेतकऱ्यांची संख्या 207
तूर खरेदी केंद्रांची संख्या 21

3 हजाराने घसरले दर !

तुरीची काढणी सुरू झाली असून, बाजारात नवीन माल दाखल होत आहे. अडत बाजारात कमीत कमी 6 हजार 500 ते 7 हजार 500 प्रतिक्विंटल भाव लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी विक्री बंद केली.

कडता हमाली जाऊन प्रतिक्विंटल 7 हजारांवर भाव मिळत आहे. मात्र, काही महिन्यांपूर्वी तुरीला प्रतिक्विंटल 10 हजार रुपये दर मिळत होता. नवीन तूर बाजारात येताच 3 ते 3500 रुपयांनी दर घसरल्याने शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त होत आहे.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment