Tur Crop 2025 तुर हे काही भागांमध्ये एक प्रमुख कडधान्य पीक आहे. विदर्भ, मराठवाडा, तसेच खानदेश परिसरात आंतरपीक व सलग पीक म्हणून याची लागवड होते. महाराष्ट्रमध्ये दरवर्षी साधारणपणे तुर पिकाखाली 13.85 लाख हेक्टर क्षेत्र असते.

Tur Crop 2025 त्याची उत्पादकता 803 किलो/ हेक्टर तर देश पातळीवर 697 किलो/ हेक्टर इतकी आहे. या पिकाखालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु उत्पादन मात्र त्या प्रमाणात मिळत नाही. त्यांचे महत्त्व कारण म्हणजे पिकांवर पडणारे बुरशीजन्य आणि विषाणूजन्य रोग व त्यांच्या नियंत्रणाकडे होत असलेले दुर्लक्ष, महाराष्ट्र राज्यामध्ये तूर पिकावर प्रामुख्याने खालील रोग आढळून येतात.
कांदा पीक नियोजन!!
जमीन: मध्यम ते भारी , पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन तूर पिका करिता योग्य असते.
वाण : आय.सी.पी.एल 87, ए.के.टी – 8811, बी.एस.एम.आर. 853, बी.एस.आर.-736, विपुला.

पेरणीची वेळ : जुनच्या दुसऱ्या पंधरवड्यात पेरणी करावी.
बीजप्रक्रिया : पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 2 ग्रॅम थायरम + 2 ग्रॅम सि.बी.झेड. -50 यांची बीजप्रक्रिया करावी.
खतव्यवस्थापन : पेरणीचे वेळी तुर पिकास खालीलप्रमाणे प्रति एकरी खताचा डोस द्यावा.
डि.ए.पी. 50 किलो + एस.आर.पी.-9 9 किलो + मॅक्सवेल-एस 5 किलो मॅग्नेशियम सल्फेट 10 किलो + ह्युमिफोर-जी 10 किलो.
Tur Crop 2025 फवारणी व्यवस्थापन:
पेरणीनंतर 30-35 दिवसांनी बुरशीजन्य रोग व रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी तसेच चांगल्या वाढीसाठी खालीलप्रमाणे फवारणी घ्यावी.
पाणी 10 ली. + हंस 20 मिली + एस.आर.पी. 20 ग्रॅम + सि.बी.झेड. – 50 10 ग्रॅम + स्लोगन 4 ग्रॅम.
तुरीमध्ये फुलकळीचे प्रमाण वाढण्यासाठी तसेच सुक्ष्म अन्नद्रव्यांच्या पुरवठ्यासाठी खालीलप्रमाणे फवारणी घ्यावी.
पाणी 10 ली. + आयकॉन शाईन 10 मिली + सुपरस्टार-9 15 मिली + क्लोरो 50% 15 मिली + सी.बी.झेड-50 – 15 ग्रॅम.

शेंगामध्ये दाणे भरताना खालीलप्रमाणे फवारणी घ्यावी.
पाणी 10 ली. + हंस 25 मिली किंवा ॲमिनोलाईट 25 मिली + समरुप 00:52:34 30 ग्रॅम + स्ट्रॉबेरी / स्प्रेवेल 10 ग्रॅम + किटनाशक + हिन्ट 15 मिली.
| इतर महतीसाठी | येथे क्लिक करा |