Trichoderma 2025 शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये कापूस, कडधान्य पिके, तेलबिया पिके व भाजीपाला तसेच ऊस पिकावर मर, मुळकुज, खोडकुज मुळावरील गाठीचा रोग इत्यादी अनेक प्रकारचे रोग आढळून येतात.

या रोगांना कारणीभूत फ्युजारीअम, व्हर्टीसिलियम, रायझोक्टोनिया, स्क्लोरोसियम, फायटोपथोय, या विविध बुरशी आहेत. या बुरींना नियंत्रित करण्यासाठी जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्माचा उपयोग करावा.
विदर्भातील ‘या’ जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता, उर्वरित भागात कसा असेल पाऊस?
ट्रायकोडर्मा ही बुरशी पिकाला हानिकारक नसून, ती बियाण्यावरील रोग फसविणाऱ्या बुरशीची वाढ होऊ देत नाही व रोगकारक बुरशीचा नायनाट करून पिकाचे संरक्षण करते.
WhatsApp Group
Join Now

Trichoderma 2025 ट्रायकोडर्मा कार्यपद्धती!
- ट्रायकोडर्मा दि बुरशी इतर हानिकारक बुरशीच्या धाग्यांना विळखा घालून आपले साम्राज्य पसरावीते व त्यातील पोषक द्रव्य शोषून येते. परिणामी कारक बुरशींचा बंदोबस्त होतो.
- तसेच हानिकारक बुरशीना लागणारे कार्बन, नायट्रोजन, विटामिन इत्यादीची कमतरता निर्माण होऊन हानिकारक बुरशींची वाढ खुंटते.
- त्याचप्रमाणे ही बुरशी ग्लायटॉक्झिन व व्हिरीडीन नावाचे प्रतिजैविक निर्माण करते म्हणजे हानिकारक बुरशीनामारक ठरतात.
- ट्रायकोडर्मा बुरशी काही प्रमाणात सूत्र कृमींचे नियंत्रण करते असे प्रयोगांती आढळून आले आहे.
- ट्रायकोडर्मा बुरशी मातीतील सेंद्रिय पदार्थ कुजण्यास मदत करते त्यामुळे सेंद्रिय खत निर्मितीमध्ये उसाचे पाचट कुजण्याकरिता उपयोग होतो.
Trichoderma 2025 ट्रायकोडर्माचे फायदे!
- बियाण्यास ट्रायकोडर्मा या बुरशीची बीज प्रक्रिया केल्यामुळे उगवण शक्ती वाढण्यास मदत होते तसेच इतर हानिकारक रोगजन्य बुरशींचा नायनाट होतो.
- जमिनीतील सेंद्रिय पदार्थ कुजवून देण्यास मदत करते. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो.
- पिकाच्या संपूर्ण वाढीच्या अवस्थेपर्यंत पिकांचे संरक्षण करते.
- ट्रायकोडर्मा ही बुरशी नैसर्गिक घटक असल्यामुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम होत नाही व त्यामुळे मानव प्राणी व पक्षी इत्यादीच्या आरोग्यास धोका राहत नाही.
- तसेच ही बुरशी मातीतील सेंद्रिय पदार्थावर वाढत असल्यामुळे रासायनिक बुरशीपेक्षा जास्त काळ प्रभाव टिकून राहतो व पिकांचे संरक्षण अधिक चांगल्या प्रकारे होते.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |