शेतकऱ्यांनो स्वस्तात ट्रॅक्टर खरेदी करण्याची योग्य वेळ आली; असा घ्या फायदा!! Tractor Kharedi 2025

Tractor Kharedi 2025 केंद्र शासनाने ट्रॅक्टर खरेदीसाठी दिलेले 50% पेक्षा जास्त अनुदान, जीएसटी करात झालेली कपात, अण्णासाहेब पाटील अर्थसाह्य यामुळे दसऱ्याच्या मुहूर्तावर ट्रॅक्टर विक्री सुसाट धावेल, अशी अपेक्षा ट्रॅक्टर विक्री डीलर्सना आहे.

Tractor Kharedi 2025

Tractor Kharedi 2025 जीएसटी कमी झाल्याने ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी शोरूमला भेटी देऊन अनेकांनी ट्रॅक्टर बुकिंग केली आहेत. वर्ष 2022 ते 2024 या तीन वर्षात ट्रॅक्टर विक्रीचा आकडा काहीसा मंदावला होता.

हरभरा लागवड तंत्रज्ञान व सुधारित वाणांची ओळख!!

Tractor Kharedi 2025 वर्ष 2020 ते 21 मध्ये 300 पेक्षा जास्त विक्री झाली होती. यंदा मात्र शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसत आहे. पॉवर टिलर, लहान ट्रॅक्टर 45, 50, 55 एचपीचे मोठे ट्रॅक्टर यांना मागणी आहे.

WhatsApp Group Join Now

कृषी विभागाच्या अनुदान योजनेत ट्रॅक्टर, ट्रेलर, औजारे खरेदीसाठी शेतकऱ्यांना 25 लाखांवर 10 लाख, 10 लाखांना 4 लाख आणि 10 लाखाच्या आत 1 लाख 25 हजार, तसेच पॉवर टिलर 85 हजार पर्यंत अनुदान दिले जात आहे. याशिवाय केंद्र शासनाने ट्रॅक्टर वरील जीएसटी 5 टक्क्यांवर आणल्याने यावर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर विक्री वाढण्याची शक्यता आहे.

ट्रॅक्टरला अनुदान: Tractor Kharedi 2025

25 लाखांना 10 लाख, 10 लाखांना 4 लाख, 10 लाखाच्या आत 1.25 लाख, तसेच पॉवर टिलरला 85 हजार.

खरेदी करणे का परवडणार?

  • ट्रॅक्टर खरेदीसाठी 1 लाख 25 हजार अनुदानाची सोय.
  • जीएसटी दरात कपात 12 वरून फक्त 5 टक्के.
  • अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून अर्थसहाय्य उपलब्ध.

ट्रॅक्टर खरेदीला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद आहे. गेल्या दोन वर्षापेक्षा यंदा ट्रॅक्टर विक्री जोरदार होईल. शासनाच्या अनुदानामुळे, कमी झालेला जीएसटी सुलभ अर्थसहाय्य यामुळे ट्रॅक्टर खरेदीला शेतकरीवर्गाने पसंती मिळेल. -संजय चव्हाण, विक्रेते”

WhatsApp Group Join Now

पॉवर टिलर आणि ट्रॅक्टरला 50 टक्के अनुदान, जीएसटी सात टक्क्यांनी कपात यामुळे शेतकऱ्यांना 2 लाखांचा टॅक्टर 1 लाखाला मिळणार आहे. त्यामुळे यंदा 300 पेक्षा जास्त लहान मोठे ट्रॅक्टर विक्री होण्याची अपेक्षा आहे. -सागर पाडळकर ट्रॅक्टर विक्रेते”

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment