Tomato Tibak Sinchan 2025 उन्हाळी टोमॅटो पिकासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला असता. 45 टक्क्यांपर्यंत पाणी बचत व 15 ते 25 टक्के उत्पादनात वाढ मिळते.

टोमॅटो पिकासाठी ठिबक सिंचन संच वापरावयाचा असल्यास, पिकाच्या लागवड पद्धतीमध्ये थोडासा बदल करणे आवश्यक आहे.
कांद्यावरील निर्यात शुल्क हटवलं! सध्या कांद्याला किती मिळतोय दर? जाणून घ्या सविस्तर माहिती;
Tomato Tibak Sinchan 2025 उन्हाळी टोमॅटो ठिबक सिंचन
- सर्वसाधारणपणे सलग लागवड करण्यापेक्षा जोड ओळ पद्धतीचा वापर केला असता. आंतरमशागत तोडणी, फवारणी इत्यादी कामे सुलभतेने करता येतात. महत्त्वाचे म्हणजे ठिबक सिंचन संचाच्या 30 टक्के बचत होते.
- हंगामानुसार जमिनीची पूर्व मशागत झाल्यानंतर टोमॅटोसाठी ठिबक सिंचनासाठी शेताचे सर्वेक्षण करून आराखडा तयार करावा.

WhatsApp Group
Join Now
- त्यानंतर आराखड्यानुसार ठिबक सिंचन संचाची मांडणी करावी. उच्चत्तम गुणवत्तेच्या संचाची निवड करावी.
- संकरित टोमॅटो सारख्या जवळच्या अंतराच्या पिकासाठी इनलाईन ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा.
- इनलाईन उपनळ्या (लॅटरल) 12 मिमी, 16 मिमी. व्यासामध्ये उपलब्ध आहेत.
- Tomato Tibak Sinchan 2025 टोमॅटोसाठी दोन इनलाईन नळ्यांमधील अंतर 180 ते 225 सें.मी. ठेवावे.
- त्यासाठी शक्यतो जमिनीच्या प्रकारानुसार 60-100 सें.मी. किंवा सें.टी. जोड ओळ (टोमॅटोच्या दोन ओळींमध्ये 60 सें.मी. / 75 सें.मी. अंतर व दोन जोड ओळींमध्ये 120/ 150 सें.मी. चा पट्टा) पद्धतीने लागवड करावी.
- ड्रीपरचा प्रवाह 4 लिटर प्रति तास ड्रीपर्समध्ये अंतर जमिनीच्या प्रकारानुसार 30 ते 40 सें.मी. असलेल्या इनलाईन नळीची निवड करावी.
- ग्रामीण कृषि मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |