टोमॅटो उत्पादकांना मिळतोय आता दमदार दर!! Tomato Market 2025

Tomato Market 2025 अवघ्या काही आठवड्यांपूर्वी फेकून देण्यात येणारा टोमॅटो आज मोठ्या दराने विकला जात आहे. बाजारपेठेत टोमॅटोचे दर थेट 100 रुपये किलो पर्यंत पोहोचले असून, त्यामुळे टोमॅटो उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.

Tomato Market 2025

Tomato Market 2025 दीर्घकाळ नुकसान सहन केलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आता हसू उमटले आहे. पावसामुळे उत्पादन घटले कीड रोगाचा फटका बसला आणि आवक घटल्यामुळे टोमॅटोच्या दरात झपाट्याने वाढ झाली आहे.

पावसाचे ढग पुन्हा गडगडणार; हवामान खात्याचा अलर्ट कुठे?

Tomato Market 2025 सुमारे महिनाभरापूर्वी 5 ते 6 रुपये किलोने विकला जाणारा टोमॅटो आज बाजारात 100 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. ही झपाट्याने झालेली दरवाढ सर्वसामान्य ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरत असली तरी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी मात्र दिलासा ठरली आहे.

WhatsApp Group Join Now

Tomato Market 2025 पावसामुळे आवक घटली

गेल्या काही आठवड्यांमधील सततधार पावसामुळे आणि एप्रिल-मे मधील उष्णतेच्या लाटा मुळे टमाट्याचे पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यातच कीड रोगांचा प्रादुर्भावही वाढला. यामुळे उत्पादनात घट झाली असून आवक घटल्यामुळे दरात झपाट्याने वाढ झाली आहे.

Tomato Market 2025 बाजारातील परिस्थिती

मंगरूळपीर येथील हर्रासीमध्ये विक्रीस आणलेले टोमॅटो 50-70 रुपये किलो दराने विकले जात आहेत. तर किरकोळ बाजारात मात्र दर 100 रुपये किलोवर पोहोचले आहेत.

Tomato Market 2025 शेतकऱ्यांना दिलासा

काही दिवसांपूर्वी टोमॅटो शेतातच नष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना आता प्रतिकिलो 50 ते 70 रुपये मिळत आहेत. उत्पादन खर्च निघून काहीसा नफा मिळत असल्यामुळे शेतकरी समाधानी आहेत. आडत्यांच्या मते, जर आणखी काही काळ असेच आवक कमी राहिली तर, दरात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.

WhatsApp Group Join Now

Tomato Market 2025 टोमॅटो हे साठवणूक न होणारे पीक असल्याने बाजारात साठा कमी आणि मागणी जास्त असेल तर दर झपाट्याने वाढतात. यावर्षी हवामानातील अनिश्चिततेमुळे टोमॅटोच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment