मर रोग: Tomato Crop 2025
रोप उगवून येण्यापूर्वी: हा रोग प्रामुख्याने रोपवाटिकेत होतो. टोमॅटोच्या बियाण्यापासून येणार अंकुरच कुजविला जातो. त्यामुळे रोप सलग उगवत नाही. बऱ्याचवेळा हा बियाण्याचा दोष आहे. असे समजले जाते.

रोप उगवून आल्यानंतर: रोप उगवून जमिनीवर वाढत असताना जमिनीलगत या रोगाचे बीजाणू रोपाच्या आत शिरतात त्यामुळे खोड व मूळ सडते. रोगाचे प्रमाण वाढल्यास रोपे कोलमडतात.
लिंबूचे दर घसरले चार वर्षातील सर्वात कमी भाव सध्या काय भाव मिळतोय?
उपाय योजना: Tomato Crop 2025
जमीन मध्यम प्रतीची व उत्तम निचरा असणारी असावी.
रोपवाटिकेत बियाण्याची पेरणी जास्त दाट करू नये.
रोपांना कमी प्रमाणात व नियमित पाणी द्यावे.

बीजप्रक्रिया: बाविस्टीन किंवा कॅप्टन 2.5 ग्रॅम एक किलो बियाण्यास तसेच ट्रॅकोडर्मा 20 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
मर रोगाची लक्षणे दिसताच कॉपर ऑक्सिक्लोराईड 25 ग्रॅम प्रति 10 ली पाण्यात मिसळून रोपांच्या मुळा जवळ जिरवण करावी.
लागवडीनंतर मर रोग आढळ्यास कॉपर ऑक्सिक्लोराईड 30 ग्रॅम किंवा कार्बेनडीझम 10 ग्रॅम प्रति 10 ली पाण्यात मिसळून 50 ते 100 मिली प्रत्येक झाडाच्या बुडाशी जिरवण करावी.
करपा: Tomato Crop 2025
लवकर येणारा करपा: हा रोग Iternaria solani नावाच्या बुरशीमुळे होतो. सुरुवातीला जमिनीलगतच्या पानांवर लहान आकाराचे गोलाकार ते आकारहीन तपकिरी ते काळपट रंगाचे वलयांकित ठिपके दिसून येतात. रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यास हे ठिपके एकमेकात मिसळतात आणि मोठ्या आकाराचे तपकिरी चट्टे पानांवर तयार होतात. पानांप्रमाणे खोडावर देखील गर्द तपकिरी डाग पडतात. त्यामुळे फांद्या कमकुवत होऊन मोडतात. हिरव्या व पिकलेल्या फळांवर तपकिरी ते काळपट रंगाचे वलयांकित आढळून येतात.
लवकर येणाऱ्या करपाची फळावरील खोडावरील व पानांवरील लक्षणे:
उशिरा येणारा करपा: हा रोग Phythophothaora infestance नावाच्या बुरशीमुळे होतो. रोगाचा प्रादुर्भाव पाने, खोड, फांद्या आणि हिरव्या व लाल फळावर आढळून येतो. सुरुवातीला पानावर पाणथळ ते फिक्कट रंगाचे गोलाकार तसेच आद्र हवामानात पानाच्या पृष्ठभागावर आणि ठिपक्यांच्या कडेवर पांढरी बुरशीची वाढ झालेली दिसून येते. रोगाचा प्रादुर्भाव झालेली फळे हिरवट तपकिरी होतात आणि मलूल होऊन सडतात. दोन्ही करपा रोग बियाणे व जमिनीतील बुरशीमुळे होतात तसेच झाडाचे रोगग्रस्त अवशेष यामार्फत रोगाचा प्रसार होतो. म्हणून विविध नियंत्रण केल्यास पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
उशिरा येणारा करपा लक्षणे: मॅन्कोझेब 25 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 25 ग्रॅम किंवा ऑक्सिक्लोस्ट्रॉबीन 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून दोन ते तीन फवारण्या अलटून पालटून कराव्यात.
फळ सड: Tomato Crop 2025
हा रोग Phythophthora nicotiana parasitica आणि Phythophthora capsici या बुरशीमुळे होतो. हा रोग खरीप हंगामात आढळून येतो. पावसाळ्यात सतत येणारा पाऊस, हवेतील आद्रतेचे जास्त प्रमाणात आणि फळे व फांद्या जमिनीवर टेकून पाण्याच्या संपर्कात जास्त वेळ आल्यास अशा वातावरणात या रोगाचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो.
फळसड लक्षणे: टोमॅटोच्या हिरव्या फळांवर टोकाच्या बाजूस बदकाच्या डोळ्याच्या आकाराचे फिक्कट तपकिरी रंगाचे डाग एकमेकांत वलये असल्यासारखे दिसतात. प्रथम डाग लहान आकाराचे दिसतात नंतर पूर्ण फळांवर पसरून फळांचा रंगहीन होतो. रोगग्रस्त फळांची साल कातड्या सारखी होते आणि जुनी फळे सडतात.
उपाययोजना: मॅन्कोझेब 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून 10 दिवसांच्या दोन ते तीन फवारण्या कराव्यात.
भुरी: Tomato Crop 2025
हा रोग Leveillula taurica नावाच्या बुरशीमुळे होतो टोमॅटोच्या फळांवर तसेच पानांच्या पृष्ठभागावर आणि खालच्या बाजूस पिठाप्रमाणे पांढऱ्या बुरशीची वाढ झालेली दिसते रोगाची तीव्रता वाढवण्यास पाने पिवळी पडून वाळतात आणि गळून पडतात.
उपाययोजना: पाण्यात विरघळणारे गंधक 2.5 ग्रॅम लिटर किंवा हेक्झाकोनॅझोल एक मिलि यांची 8 ते 10 दिवसाच्या अंतराने फवारणी करावी.
विषाणूजन्य रोग: Tomato Crop 2025
लहान पाने होणे: या रोगाचा प्रसार पांढरी माशी या किडीमुळे होतो. रोगट झाडाला झुडपासारखा लहान पानांचा गुच्छ आल्यासारखा दिसतो. झाडाची वाढ खुंटते व रोग झालेल्या झाडास कमी प्रमाणात फळे लागतात. रोगट झाडांची पाने आकाराने लहान होतात व ती खालच्या बाजूने वाळलेली असतात.
टोमॅटो मोझॅक:
हा रोग Tobacco mozaic virus या विषाणूमुळे होतो. पाने कमी अधिक पिवळेपणा किंवा फिक्कट व गडद हिरव्या रंगाचे भाग दर्शवतात पाने आकसतात, खालील बाजूस मुडपतात व जाड होतात.
उपाययोजना: रोगट झाडे नष्ट करावीत. टोमॅटोच्या शेतातील पालापाचोळा व तणे नष्ठ करावीत. कीटकांद्वारे या रोगाचा प्रसार होतो त्यासाठी दर आठवड्याच्या अंतराने थायोमिथोक्झाम 8 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
फळाच्या टोकाची कूज:
कॅल्शिअमची कमतरता असणाऱ्या जमिनीत हि विकृती दिसून येते. हिरव्या टोमॅटो फळाच्या टोकाला मोठा काळपट डाग पडतो. नंतर डागांच्या ठिकाणी पांढरट पापुद्रा तयार होतो. अशी फळे लवकर पिकतात.
उपाययोजना: पिकास पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी कॅल्शिअम क्लोराईड किंवा कॅल्शिअम नायट्रेट प्रत्येकी 50 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून तीन ते चार दिवसाच्या अंतराने चार वेळा फवारावे.
फळावरील पांढरे चट्टे: प्रखर उन्हामुळे फळावर पांढरे चट्टे पडतात. त्यामुळे जास्त पाने असणाऱ्या वाणाची लागवड करावी.
फळांना तडे पडणे: फळांची काढणी हिरवा रंग बदलून लालसर होत असताना करावी. पिकाला पाण्याचा ताण पडू देऊ नये.
| इतर माहितीसाठी | येथे क्लीक करा |