Thibk Sinchan Yojana 2025 प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत राज्यातील अल्प व अत्यल्प भू-धारक शेतकऱ्यांना 55% आणि इतर शेतकऱ्यांना मर्यादित ( 5 हेक्टरच्या मर्यादेत) 45% अनुदान देण्यात येते.

सदर अनुदेय अनुदानाशिवाय मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 25% आणि इतर शेतकऱ्यांना 30% पूरक अनुदान देऊन सूक्ष्म सिंचनासाठी अनुक्रमे 80 % व 75% एकूण अनुदान देण्यात येते.
Thibk Sinchan Yojana 2025 त्याचप्रमाणे दिनांक 29 जून, 2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेत वैयक्तिक शेततळे या बाबीचा समावेश करण्यात आलेला आहे.
‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाचा फटका; तीन इंचापेक्षा मोठ्या आकारांच्या गारा पडल्या;
Thibk Sinchan Yojana 2025 मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेस 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता रु. 500.00 कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद उपलब्ध करून दिलेली आहे.

सन 2025-26 मध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबविण्यासाठी रु. 500.00 कोटी (रुपये पाचशे कोटी फक्त) निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता दिली आहे.
Thibk Sinchan Yojana 2025 मंजूर कार्यक्रमाचा घटकनिहाय तपशील पुढीलप्रमाणे
अ. क्र | बाब | मंजूर कार्यक्रम |
1 | सूक्ष्म सिंचन केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत प्रति थेंब अधिक पीक (सूक्ष्म सिंचन) घटकांतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानास पुरक अनुदान 1. ठिबक सिंचन 2. तुषार सिंचन | 400.00 कोटी |
2 | वैयक्तिक शेततळे | 100.00 कोटी |
3 | एकूण | 500.00 कोटी |
या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही महा-डीबीटी प्रणालीद्वारे करावी आणि लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर अनुदानाची रक्कम सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली जमा करण्यात येणार आहे.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |