सोलापूर जिल्ह्यात ‘या’ गावाने 400 एकरावर ठिबक सिंचनाद्वारे घेतले तुरीचे विक्रमी उत्पादन! Thibak Sinchan 2025

Thibak Sinchan 2025 सोलापूर: पाणी फाउंडेशन श्रमदानाच्या चळवळीत एकत्र आलेल्या शेतकऱ्यांनी फार्मर कपसाठीही तशीच एकी ठेवली.

Thibak Sinchan 2025

गावाच्या शिवारात सुमारे 400 एकरावर तुरीचे उत्पादन ठिबक सिंचनाद्वारे घेतल्याने एक नव्हे तर दोन नव्हे तर अनेक शेतकऱ्यांना चांगली पैसे मिळत आहेत.

शेतकऱ्यांचा बियाणे खरेदीला उस्फूर्त प्रतिसाद खत विक्री वेगात, वाचा सविस्तर!

अतिशय कमी खर्चात अधिक तूर उत्पादनाचा ‘सुर्डी’ पॅटर्न राज्यासाठी आदर्श ठरत आहे. इथले तूर बियाणे 200 रुपये किलो प्रमाणे विक्री होत आहे.

WhatsApp Group Join Now

Thibak Sinchan 2025 एकरी 12 हजार रुपयांपर्यंत तुर पीक घेण्यासाठी खर्च होतो. कमीत कमी 12 तर सर्वाधिक 18 क्विंटल उतारा पडतो.

पाच-साडेपाच महिन्यात निघणाऱ्या तुरीचा खर्चवजा जाता कमीत कमी 65 ते 70 हजार रुपये शिल्लक राहतात असे येथील शेतकऱ्यांनी सांगितले.

मागील चार-पाच वर्षापासून शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळे सुर्डी गाव राज्यभरात चर्चेत आहे. आज बाजारात खरीप हंगामात विविध बियाणांच्या विक्रीसाठी जाहिरात करावी लागत आहे.

मात्र, सुर्डी येथील विजेता शेतकरी गटातील शेतकऱ्यांचे तुरीचे बियाणे विविध गावचे शेतकरी गावात येऊन घेऊन जातात.

WhatsApp Group Join Now

Thibak Sinchan 2025 एकवेळ कंपनीच्या बियाण्यांवर शेतकरी अविश्वास दाखवतील मात्र, सुर्डी येथील बियाणे विश्वासाने घेऊन जातात, असे धनाजी शेळके यांनी सांगितले.

Thibak Sinchan 2025 कीटकनाशक म्हणून निंबोळीचा अर्क….

  • मागील वर्षी 35 क्विंटल तूर, तर यावर्षी 26 क्विंटल तूर बियाणे विक्री झाल्याचे धनाजी शेळके यांनी सांगितले.
  • दोनशे रुपये किलो दराने तूर बियाणे विक्री होते. एका क्विंटलचे 20,000 रुपये होतात आणि गावातच बियाणे विक्री होत असल्याने कसलाही खर्च नाही.
  • गावात पुरुष व महिला शेतकरी गट आहेत. पेरणीस तयार केलेला जमिनीवर गटाचे शेतकरी एकत्रित येत 7 फूट अंतरावर ठिबक पाईप आंतरतात.
  • सव्वा फूट अंतरावर ड्रीपरच्या उजव्या व डाव्या बाजूला बियाणे टोकन केले जाते. चांगली उगवण झाले की एक चांगले रोप ठेवून एक रोप काढले जाते.
  • ठिबक पाईप अंतरने, बियाणे टोकन, 40 ते 45 दिवसांनी शेंडा खुडणी व काढणे ही कामे गटातील सर्व शेतकरी दररोज सकाळी करतात.
  • दशपर्णी अर्क निंबोळी अर्क (गरज पडली तर कीटकनाशक) च्या महिन्यातून तीन फवारण्या किडीचा प्रादुर्भाव असो किंवा नसो केल्या जातात.
  • शिवारात कुठेही कडुलिंबाची झाडे असतात. अशा निंबोळ्या गोळा करून वाळवून ठेवल्या तर घरीच निंबोळी अर्क तयार करता येतो.
  • हा अर्क कीड नाशकासाठी प्रभावी ठरतो यामुळे बाजारातून अर्कसाठी खर्च करायचे आवश्यकता नाही. शेतकऱ्यांचे यामुळेही पैसे वाचतात. सुर्डीचे बहुतेक शेतकरी हेच करतात.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment