तेलबिया युनिटसाठी लाखोंचे अनुदान, शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची नवी योजना! वाचा सविस्तर; Telbiya Anudan 2025

Telbiya Anudan 2025 शेतकऱ्यांना शेतीमालाच्या मूल्यवर्धनासाठी केंद्र शासनाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रीय खाद्यतेल अभियान (गळतीधान्य) 2025-26 अंतर्गत शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

Telbiya Anudan 2025

शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था तसेच खासगी आणि शासकीय उद्योगांसाठी तेलबिया प्रक्रिया युनिट आणि गोदाम उभारणीसाठी लाखो रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

आता सातबारावर येणार शेतकऱ्यांच्या पत्नीचे नाव, काय आहे योजना? जाणून घ्या सविस्तर;

Telbiya Anudan 2025 तेल काढणी युनिटसाठी 9.90 लाख रुपयांपर्यंत अनुदान

  • सोयाबीन, सूर्यफूल आणि इतर तेलबिया पिकांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा सुवर्णसंधीचा लाभ ठरणार आहे.

WhatsApp Group Join Now

  • या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तेल काढणी युनिट उभारणीसाठी प्रकल्प खर्चाच्या 33 टक्के अनुदान मिळणार आहे.
  • या मर्यादित 9.90 लाख रुपये अनुदान मंजूर केले जाईल.

Telbiya Anudan 2025 यांना ही सवलत लागू

  • शासकीय व खाजगी उद्योग
  • शेतकरी उत्पादक कंपन्या
  • सहकारी संस्था

250 मॅट्रिक टन क्षमतेच्या गोदामासाठी 12.50 लाख अनुदान

  • शेतकऱ्यांच्या उत्पादन साठवणुकीच्या अडचणी सोडवण्यासाठी योजनेत गोदाम उभारणीसाठी ही प्रावधान आहे. शेतकरी उत्पादक कंपन्या, वखार महामंडळ किंवा नाबार्ड मान्य प्रकल्पानुसार अर्ज सादर करू शकतात.
  • या अंतर्गत 50 टक्के किंवा लाख रुपये (जे कमी असेल तेवढे) अनुदान देण्यात येणार आहे.
  • बँकेकडून कर्ज मंजुरी झाल्यानंतरच अनुदानासाठी पात्रता प्राप्त होईल.

25 जुलै पर्यंत करा अर्ज!

WhatsApp Group Join Now

सर्व अर्जदारांनी आपले प्रकल्प प्रस्ताव 25 जुलै 2025 पूर्वी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे.

अर्ज कर्त्यांची संख्या जास्त झाल्यास जिल्हास्तरीय समितीच्या मान्यतेनुसार सोडत पद्धतीने निवड केली जाईल.

Telbiya Anudan 2025 आवश्यक कागदपत्रे…

  • शेत जमिनीचे सातबारा / 8 अ
  • शेतकरी उत्पादक संस्थेची नोंदणी
  • बँक कर्ज प्रस्ताव व मंजुरी
  • प्रकल्प अहवाल

कृषी विभागाचे आवाहन!

ही योजना केवळ पायाभूत सुविधा देणारे नाही, तर शेतीमालाचे मूल्यवर्धन करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणारी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी उत्पादक कंपनीने याचा लाभ घ्यावा. – मनोजकुमार ढगे, जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी”

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment