कापूस पिकाचे सुधारित लागवड तंत्रज्ञान!! Technology of Cotton Crop 2025

Technology of Cotton Crop 2025 कपाशी हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नगदी पीक असून विदर्भातील व मराठवाड्यातील एकमेव व्यक्ती पीक आहे. भारतातील सहा कोटी लोकांना कापूस शेती व कापसावर आधारित उद्योगांमध्ये रोजगार मिळतो. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या सामाजिक आर्थिक व राजकीय जीवनात कापूस पिकाला महत्त्वाचे स्थान आहे. देशातील एकूण कृषी उत्पन्नाच्या 28.8% वाटा कापसाचा आहे.

Technology of Cotton Crop 2025

परंतु, सरासरी उत्पादकता तुलनात्मकरीत्या कमी आहे. अधिक उत्पादनकरिता शिफारशीत जाती आणि सुधारित लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास कापूस उत्पादकतेत निश्चितच भर पडून हेक्‍टरी अधिक नफा मिळेल.

सोयाबीन पिकाची सुधारित पेरणी व लागवड पद्धती!! 

Technology of Cotton Crop 2025 महाराष्ट्रातील कोरडवाहू, लागवड पावसाची अनियमितता, रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव, पाने लाल होणे, ही राज्याची उत्पादकता कमी असण्याची प्रमुख कारणे आहेत. त्याचबरोबर अयोग्य जातींची निवड योग्य लागवड तंत्राचा अभाव व अयोग्य पीक संरक्षण ही व्यवस्थापनाशी संबंधित प्रमुख कारणे आहेत. या बाबींचा शास्त्रीय पद्धतीने अवलंब केल्यास कापूस उत्पादनात सातत्य पूर्वक वाढ होईल व फायदेशीर उत्पन्न मिळेल.

WhatsApp Group Join Now

Technology of Cotton Crop 2025 हवामान

कापूस पिकाच्या योग्य वाढीसाठी वार्षिक सरासरी तापमान 16 अंश डिग्री सेल्सियस पेक्षा अधिक आवश्यक असते बोंडे लागणे व फुटव्यांच्या अवस्थेत प्रखर सूर्यप्रकाश व पिकाच्या वाढीच्या कालावधीत धुके विहिरीत हवामान आवश्यक असते. पिकाच्या योग्य वाढीसाठी 21अंश सेल्सिअस तापमान मानवते. बोंडे लागणे व पक्व होण्यासाठी दिवसाचे तापमान 27 अंश सेल्सिअस ते 33अंश सेल्सिअस रात्रीचे थंडच हवामान आवश्यक असते. कोरडवाहू लागवडीसाठी सरासरी पाऊस 500 मि.मी. पेक्षा जास्त लागतो.

जमिनीची निवड

कपाशीचा कालावधी अधिक असल्यामुळे कापसाची मुळे खोलपर्यंत जात असल्यामुळे कापूस पिकाची लागवड मध्यम ते भारी जमिनीत करावी. जमिनीमध्ये पाणी साचून राहिल्यास त्याचा पिकाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. त्याकरिता पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन असावी, जमिनीचा सामू 5.5 ते 8.5 असावा.

Technology of Cotton Crop 2025 पूर्व मशागत

बागायती कपाशी पिकाकरिता दरवर्षी नांगरणी करावी यानंतर दोन आठवड्यांच्या अंतराने 2 ते 3 वखरणी कराव्यात जमिनीच्या मशागती बाबत संवर्धित मशागत व किमान मशागत या दोन पद्धतींचा अवलंब अलीकडे करण्यात येतो. संवर्धित मशागत पद्धतीमध्ये पिकांचे अवशेष, पाला ,पाचोळा इत्यादी पदार्थ जमिनीवरच राहिल्यामुळे पावसाचे पाणी मातीमध्ये मुरण्याचे प्रमाण वाढते. त्याचबरोबर मातीच्या पृष्ठभागावरून होणारे बाष्पीभवन कमी होते.

WhatsApp Group Join Now

वाणांची निवड

सद्यस्थितीत विद्यापीठाचे तसेच बाजारात अनेक कपाशीचे पान उपलब्ध आहेत. यापैकी कोणता मान निवडावा याबाबत संभ्रम होतात. कापसाची वाढ निवडताना कोरडवाहू किंवा बागायती लागवडीचा प्रकार व वाहनाचे गुणधर्म यांचा विचार करावा.

रस शोषण करणाऱ्या किडीचा सहनशील/ प्रतिकारक्षम संकरित वाण असावा जसे की फुले सुमन, फुले श्वेतांबरी, फुले अस्मिता इत्यादी.

पाण्याचा ताण सहन करणारा वाण निवडावा उदाहरणार्थ फुले 688, रोगांना बळी न पडणारा वाण निवडण्यात यावा.

बोंडांचा आकार मोठा व चांगला फुटणारा वाणा असावा उदाहरणार्थ. फुले तरंग

धाग्याची प्रत चांगली असणारा वाण निवडा ज्यामुळे कपाशीला बाजार भाव चांगला मिळू शकेल त्यामध्ये फुले चेतना, फुले माही, फुले धारा, फुले प्रभा हे वाण वापरावेत.

Technology of Cotton Crop 2025 पेरणीची वेळ

ओलिताखालील कापूस पिकाची लागवड 1 जून ते 30 जून दरम्यान करावे कोरडवाहू कापूस पिकाची पेरणी मान्सूनचा 4 इंच (100 मि.मी) पाऊस पडल्यानंतर करावी. पेरणी वेळेत करणे आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये 30 जून नंतर पेरणी करू नये यानंतर पेरणी केल्यास उत्पादनात घट होते.

बियाणाचे प्रमाण

पीटी कापसाचे प्रतिहेक्टरी 2.5 किलोग्रॅम बियाणे लागते. सरळ वाहनांसाठी बियाणे जास्त प्रमाणात लागते. साधारणता 5 ते 6 किलोग्रॅम प्रति हेक्टर वापरावे.

Technology of Cotton Crop 2025 बीज प्रक्रिया

कापसामध्ये किडी रोग व अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी बीज प्रक्रिया करावी. बाजारात उपलब्ध असलेल्या बियाणास इमिडायक्लोप्रिड या कीटकनाशकाची प्रक्रिया सामान्यता केलेली असते नसल्यास इमिडायक्लोप्रिड या कीटकनाशकाची 7.5 ग्रॅम प्रति किलोग्रॅम बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. यामुळे रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.

Technology of Cotton Crop 2025 अन्नद्रव्य व्यवस्थापन

अधिक उत्पादनाच्या प्रमाणात पिकाची अन्नद्रव्यांची गरज देखील पूर्ण करणे आवश्यक आहे शिवाय बीटी कपाशीमध्ये अन्नद्रव्य शोषणाचे प्रमाण विना बी.टी कपाशीपेक्षा अधिक असल्याचे आढळत आहे. बिना बी.टी कापूस पिकापेक्षा बी.टी कापूस खतांच्या वाढीव मात्रेच फायदेशीर प्रतिसाद देत असल्याचे निष्कर्ष मिळाले आहेत. कोरडवाहू व बागायती बी.टी कापूस विकास खतांच्या मात्रा देण्याचे प्रमाण पुढील प्रमाणे आहे.

कोरडवाहू

मराठवाड्यात कोरडवाहू लागवडीमध्ये बीटी कापूस पिकास 120:60:60: किलोग्रॅम नत्र, स्फुरद, पालाश प्रती हेक्टरी देण्यात यावे. कोरडवाहू लागवडीमध्ये 50 टक्के नत्र पेरणीच्या वेळी व उर्वरित 50 टक्के नत्र एक महिन्यानंतर विभागून देण्यात यावे संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळीच द्यावे.

Technology of Cotton Crop 2025 बागायती

बागायती लागवडीमध्ये बीटी कापसासाठी 150:75:75: नत्र, स्फुरद, पालाश प्रति हेक्टरी दिल्याने अधिक फायदेशीर उत्पन्न मिळाले आहे. यापैकी पेरणीच्या वेळी 20 टक्के नत्र संपूर्ण स्फुरद व पालाश ची मात्रा द्यावी. उर्वरित मुत्रा पैकी 40 टक्के नत्र एका महिन्यानंतर व 40 टक्के नत्राचे मात्रा दोन महिन्यानंतर द्यावी.

सूक्ष्म मूलद्रवे

बीटी कापसास रासायनिक खतांच्या मात्रेबरोबरच काही सूक्ष्म मूलद्रव्यांची आवश्यकता असते. याकरिता मातीमध्ये मॅग्नेशियम, झिंक, बोरॉन यापैकी एखाद्या मूलद्रव्याची कमतरता असल्यास मॅग्नेशियम सल्फेट 15 ते 20 किलोग्रॅम/हेक्टर झिंक सल्फेट 15 ते 20 किलोग्रॅम /हेक्‍टर बोरॉन 5 किलो ग्रॅम/हेक्‍टर आवश्यकतेनुसार जमिनीतून द्यावेत. सूक्ष्म मूलद्रव्य शेणखतामध्ये मिसळून पेरणीपूर्वी किंवा पेरणीनंतर एक महिन्यातच द्यावेत रासायनिक खतासोबत सूक्ष्म मूलद्रव्य देऊ नयेत.

महत्त्वाच्या शिफारसी

Technology of Cotton Crop 2025 माती परीक्षण करून रासायनिक खते द्यावीत.

कापसावरील नाल्याचा प्रादुर्भाव कमी होण्याच्या दृष्टीने शिफारशीत खतमात्रा पेरणीच्या वेळी शेणखत 5 टन अधिक 30:30:30: नत्र स्फुरद पालाश किलो प्रती हेक्टर आणि 30 किलो नत्र 30 दिवसांनी द्यावे त्यानंतर पीक फुलोरा अवस्थेत असताना 2 % युरिया आणि बोंडे परिपक्व होण्याच्या अवस्थेत 1 टक्के युरिया अधिक 1 टक्के मॅग्नेशियम सल्फेट ची फवारणी करावी.

बोंडे भरण्याच्या अवस्थेत 2 टक्के डी.ए.पी ची फवारणी केल्यास उत्पादनात 10 ते 15 टक्के वाढ होते.

कापसाच्या सभोवती मका, चवळी, झेंडू व एरंडी या मित्र सापळा पिकांची लागवड करावी.

पिक उगवल्यानंतर 105 दिवसांनी 5 टक्के निंबोळी अर्काचा फवारणी करावी.

किडींना आर्थिक नुकसान संकेत पातळी गाळल्यानंतर शिफारसी प्रमाणे रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा.

आळ्या व कीडग्रस्त भागांचा न्यायनाट करावा.

कापसामधील लाल्या विकृतीची कारणे व व्यवस्थापन

Technology of Cotton Crop 2025 कापसाची पाने लाल होणे मागील दहा ते पंधरा वर्षापासून मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. कापसामधील पाने लाल होणे हा बुरशी जिवाणू किंवा विषाणू मुळे होणारा रोग नसून ही वनस्पतीची विकृती आहे. यामुळे पानाच्या कडा लाल होण्यास सुरुवात होते पाने हळूहळू तांबूस होतात व लाल झालेले पाने वाळतात गळून पडतात या विकृतीचा प्रादुर्भाव अमेरिकन संकरित बी टी वाणावर जास्त दिसून येतो.

कापसावर ही विकृती संकरित वाण जमीन खतांच्या मात्रा आणि हवामान यांच्या विविध परिस्थितीमुळे आढळून येते नत्राच्या कमतरतेमुळे हरित ग्रंथीचे विघटन होऊन त्या प्रथम पिवळा पडतात नंतर लाल होतात पाण्याचा ताण पडणे किंवा पाणी साचून राहणे पानात नत्राचे प्रमाण 1 टक्के पेक्षा कमी होणे व रस शोषणा त शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव इत्यादी पाने लाल होण्याची कारणे आहेत.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment