Tarbuj Bajarbhav 2025 आज आपण कलिंगड, साखर, पपई, सोयाबीन आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत…

उन्हाचा चटका वाढत असल्याने कलिंगडलाही मागणी वाढली आहे. सध्या कलिंगडला प्रति क्विंटल सरासरी 700 ते 900 रुपये भाव मिळत आहे. देशातील साखर उत्पादनात घट झाली आहे. सध्या बाजारात साखर 4 हजार ते 4 हजार 300 रुपयाने विकली जात आहे. राज्यातील पपईला सध्या चांगली मागणी आहे. त्यामुळे पपईला सध्या 1700 ते 2 हजार रुपयांचा भाव मिळत आहे.
दुष्काळी पारंपारिक पिकांना फाटा देत मसाला शेतीतून विदर्भातील शेतकऱ्याने घडवली क्रांती;
Tarbuj Bajarbhav 2025 देशातील बाजारात सोयाबीन वरील दबाव कायम आहे. सोयाबीनची बाजारातील आवक कमी झाली. मात्र पुरवठा चांगला असल्याने दरावरील दबाव कायम आहे. बाजार समितीमध्ये दरात 50 रुपयांपर्यंत चढ-उतार दिसत आहेत. देशातील प्रक्रिया प्लांट्सनी सोयाबीन खरेदीचे भाव 4 हजार 200 ते 4 हजार 350 रुपयांच्या दरम्यान काढले होते.

मात्र सोयाबीनला बाजारात सरासरी 4 हजारांच्या दरम्यान भाव मिळाला. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरावरील दबाव कायम आहे. कापूस दर सातत्याने 65 सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान दिसत आहेत.
Tarbuj Bajarbhav 2025 या पातळीपेक्षा दर कमी किंवा जास्त झाले तरी पुन्हा ही पातळी गाठत आहे. त्यामुळे दरावरील दबाव कायम आहे. देशातील बाजारात कापसाची आवक कमी होत आहे. त्यामुळे दरही टिकून आहेत.
आजही बाजारात कापसाला सरासरी प्रतिक्विंटल 7 हजार 100 ते 7 हजार 400 रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |