ताकारी योजनेचे उन्हाळी हंगामातील पहिले आवर्तन उद्यापासून सुरू होणार; Takari Yojana 2025

Takari Yojana 2025 देवराष्ट्रे : ताकारी योजनेचे उन्हाळी हंगामातील पहिल्या वर्तन ८ मार्चला सुरू राहणार आहे. यामुळे शेती व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी दिली.

Takari Yojana 2025

WhatsApp Group Join Now

ताकारी योजनेचे हिवाळी आवर्तन तब्बल 53 दिवस चालू होते. या माध्यमातून ताकारी योजनेच्या कार्यक्षेत्रातील सर्व शेतीला मुबलक पाणीपुरवठा करण्यात आला होता.

त्यानंतर हे आवर्तन बंद करण्यात आले होते. पहिले आवर्तन बंद होऊन 20 ते 25 दिवसाचा कालखंड होत आला आहे. शेती व शेती पिकांना उन्हाचा चटका वाढत असल्यामुळे पाण्याची कमतरता जाणवू लागली आहे.

त्यातच पाऊस काळ अधिक होऊन सुद्धा विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे योजनेचे कार्यकारी अभियंता व अधिकारी यांनी योजनेचे पाणी आवर्तन सुरू करण्याचे नियोजनबद्ध कार्यक्रम आखला आहे.

‘या’ बाजारात गव्हाला सर्वाधिक दर वाचा सविस्तर…

त्या दृष्टीने 8 मार्च रोजी पहिला टप्पा सुरू करून ताकारी योजनेचे उन्हाळी हंगामातील पहिल्या आवर्तन सुरू करण्यात येणार आहे. Takari Yojana 2025

उन्हाळी हंगामातील पहिल्या वर्तन असल्यामुळे सर्व शेती पिकांना पाणीपुरवठा होईल तोपर्यंत आवर्तन चालूच राहील.

WhatsApp Group Join Now

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment