या शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदानावर मिळते जमीन, ‘ही’ योजना नक्की काय आहे? Swabhiman Yojana 2025

Swabhiman Yojana 2025 नाशिक : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत शासनास आपले शेत जमीन विक्रीसाठी इच्छुक असलेल्या शेतजमीन मालकांनी विहित नमुन्यात अर्ज सादर करण्याचे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त देविदास नांदगावकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्व्ये केले आहे.

Swabhiman Yojana 2025

शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून राज्यातील दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील कुटुंबाचे उत्पन्न उत्पन्नाचे स्त्रोत वाढावे राहणीमानात सुधारणा व्हावी तसेच मजुरीवर असलेले त्यांचे अवलंबित्व कमी व्हावे या उद्देशाने कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना पासून राबविण्यात येत आहे.

अवकाळी पावसाने उन्हाळी पिकांवर संक्रांत, शेतकऱ्यांच्या पदरी नुकसानच नुकसान! वाचा सविस्तर; 

Swabhiman Yojana 2025 जमिनीच्या दरातील वाढ लक्षात घेता, या योजनेचा लाभ अधिकाधिक लाभार्थ्यांना देण्यासाठी प्रति एकर रुपये 5 लाख तर बागायती जमिनी करिता प्रति एकर रुपये 8 लाख इतक्या कमाल मर्यादेपर्यंत खरेदी करण्याबाबत 14 ऑगस्ट 2014 च्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार निर्देशित केले आहे.

WhatsApp Group Join Now

या योजनेअंतर्गत उपलब्ध होणारी जमीन लाभार्थ्यांना 100 टक्के अनुदान तत्त्वावर 4 एकर कोरडवाहू (जिरायती) जमीन किंवा 2 एकर ओलिताखालील (बागायती) जमीन उपलब्ध करून दिली जाते. या योजनेअंतर्गत खरेदी करावयाची जमीन कसण्यास योग्य असावी, जमीन डोंगर उताराची खडकाळ व नदीपात्रा जवळच्या क्षारयुक्त व क्षारपाड नसावी.

Swabhiman Yojana 2025 इथे अर्ज करा सादर….

विक्रीसाठी इच्छुक जमीन मालक आणि विहित नमुन्यातील अर्ज सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, सामाजिक न्याय भवन, बी विंग, 2 रा मजला, नासर्डी पूल नाशिक कार्यालयात सुटीचे दिवस वगळून उपलब्ध करून घेता येतील.

या अर्जासोबत 7/12 उतारा, 8 अ उतारा व दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयाकडे मूल्यांकन पत्र इत्यादी कागदपत्र जोडणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी वरील पत्त्यावर असेही प्रसिद्धी पत्रकार नमूद केले आहे.

WhatsApp Group Join Now

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment