सुर्यफुल लागवड तंत्रज्ञान!! Sunflower Cultivation 2025

Sunflower Cultivation 2025 भुईमूग पिकानंतर सूर्यफूल पीक महत्त्वाचे आहे. सूर्यफुलामध्ये तेलाचे प्रमाण साधारणतः 35 ते 45 टक्के असून तेल काढणी झाल्यानंतर शिल्लक असणारी पेंड जनावरांना खाद्य म्हणून मोठ्या प्रमाणात उपयोगात आणली जाते. सूर्यफुलाच्या काडापासून हिरवळीचे खत, जळण, मुरघास तसेच भरखतसुद्धा व्यवस्थित मिळते.

Sunflower Cultivation 2025

Sunflower Cultivation 2025 लिनोलिक स्निग्ध आम्लाचे प्रमाण जास्त असल्याकारणाने सुर्यफुल तेल जास्त काळ टिकून राहते. महाराष्ट्रात या पिकाची लागवड जवळजवळ पूर्ण राज्यात खरीप, रब्बी व उन्हाळी अशा तिन्ही हंगामामध्ये केली जाते. आशिया खंडांत सूर्यफूल क्षेत्रामध्ये भारतच प्रथम क्रमांकावर आहे. राज्यात मराठवाडा विभागात सूर्यफुलाची लागवड मोठ्या प्रमाणावर करतात.

जमिनीच्या वाटणीपत्रास मिळणार आता कायदेशीर आधार, भूमीअभिलेख विभागाने घेतला हा महत्त्वपूर्ण निर्णय!!

Sunflower Cultivation 2025 मराठवाड्यातील लातूर भागात सूर्यफुलाचे उतपादन जास्त बघायला मिळते. सूर्यफूल हे अवर्षण ताण सहन करणारे पीक आहे. त्यामुळे 200 ते 700 कि.मी. इतके पर्जन्यमान असणाऱ्या, भागात सुद्धा हे पीक अतिशय छान वाढते. या पिकास मध्यम ते भारी पाण्याचा निचरा होणारी चांगली, सेंद्रिय पदार्थनाचे प्रमाण जास्त असणारी जमीन आवश्यक असते. सूर्यफूल हे पीक सूर्यप्रकाश व उष्ण तापमानास सवेंदनशील असल्यामुळे हे तिन्ही हंगामात घेता येते.

WhatsApp Group Join Now

हवामान: Sunflower Cultivation 2025

सूर्यफूल हे पीक विविध हवामानात चांगले येऊ शकते. सूर्यफूल महाराष्ट्रात खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामात घेतले जाते. रब्बी हंगाम हा खरीप व उन्हाळी हंगामापेक्षा, सूर्यफुलाच्या अधिक उत्पादनासाठी चांगला आहे. कारण रब्बी हंगामातील वातावरणामुळे सूर्यफुलाच्या वाढीसाठी भरपूर कालावधी मिळतो. वर पीक काढणीस जास्त कालावधी लागतो. याउलट खरीप उन्हाळी हंगामात अधिक तापमानामुळे पीक लवकर काढणीस तयार होते. त्यामुळे उत्पदनात फरक पडतो. 20 ते 22 डी.सें.ग्रे. तापमान सूर्यफुलाच्या अधिक उत्पादनासाठी पोषक आहे.

जमीन: Sunflower Cultivation 2025

सूर्यफुलाच्या वाढीसाठी वळीमिश्रित जमीन चांगली असते, परंतु मध्यम ते भारी पाण्याचा चांगला निचरा होणारी सेंद्रिय पदार्थाचे अधिक प्रमाण असणारी जमीनही योग्य असते. जमिनीचा सामू 6.5 ते 8.5 असावा.

बीजप्रक्रिया: Sunflower Cultivation 2025

बुरशीजन्य मर रोगापासून संरक्षण मिळण्यासाठी पेरणीपूर्वी बियाण्यास 2 ग्रॅम थायरम किंवा कार्बेनडिझम प्रति किलो बियाण्यास चोळावे, तसेच ट्रायकोडर्मा प्रति किलो 5 ग्रॅम प्रमाणे बियाण्यास लावावे. पेरणीसाठी वाणानुसार हेक्टरी 10 ते 12 किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी बियाणे 12 तास पाण्यात भिजवून नंतर सावलीत वाळवून पेरणी केल्यास बियाण्याची उगवण जोमदार आणि एकसारखी होण्यास मदत होते. तसेच बियाण्यांचे उगवण प्रमाण वाढून हेक्टरी रोपांची संख्या योग्य राखता येते.

WhatsApp Group Join Now

लागवड: Sunflower Cultivation 2025

बियाणे 5 ते 6 सेंमी पेक्षा खोल पडणार नाही याची काळजी घ्यावी. पेरणी मध्यम जमिनीत 45 बाय 20 सेंमी आणि भारी जमिनीत 60 बाय 30 सेंमी अंतरावर करावी.

या पिकाच्या मुळ्या जमिनीत 45 ते 60 सेमी खोल जात असल्यामुळे 15 ते 25 से.मी. खोल नांगरट करावी. 20 ते 25 बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत प्रति हेक्टर जमिनीत मिसळावे.

खरीप सूर्यफुलाची लागवड जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात, तर रब्बी सूर्यफुलाची लागवड ऑक्टोबरचा पहिला पंधरवडा ते नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी.

सूर्यफुलाची लागवड करीत असताना 1 एकर क्षेत्रात 20,000 ते 22,00 रोप बसेल अशा हिशेबाने लागवड करावी.

आंतरपीक:

आंतरपीक पद्धतीत सूर्यफूल + तूर (2:1 किंवा 2:2) आणि भुईमूग + सूर्यफूल (6:2 किंवा 3:1) या प्रमाणात ओळीने पेरणी केल्यास उत्पादनात चांगले वाढ होते.

रासायनिक खते:

कोरडवाहू पिकास प्रति हेक्टरी 2.5 टन शेणखत तसेच 50 किलो नत्र, 25 किलो स्फुरद आणि 25 किलो पालाश पेरणीच्या वेळेस दोन चाड्याच्या पाभरणीने पेरून घ्यावे. बागायती पिकास प्रति हेक्टरी 60 किलो नत्र + 60 किलो स्फुरद + 30 किलो पालाश यापैकी 30 किलो नत्र व संपूर्ण स्फुरद आणि पानास पेरणीच्या वेळी द्यावे. व उरलेल्या 30 किलो नत्रा ची मात्रा पेरणीनंतर एक महिन्याच्या आत द्यावी. गंधकाची कमतरता असलेल्या जमिनीसाठी प्रतिहेक्टरी 20 किलो गंधक पेरणीच्या वेळी गांडूळ खतातून द्यावे.

अंतरमशागत:

पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी दोन रोपातील अंतर 30 सेमी ठेवून विरळणी करावी. पेरणीनंतर 15 दिवसांनी एक खुरपणी करावी तसेच दोन कोळपण्या कराव्यात. पहिली कोळपणी पेरणीनंतर 20 दिवसांनी व दुसरी कोळपणी 35 ते 40 दिवसांनी करावी.

पाणी व्यवस्थापन:

सूर्यफुलाच्या पिकास संवेदनक्षम अवस्थेत पाणी देणे अत्यंत गरजेचे आहे. सूर्यफुलाच्या संवेदनक्षम अवस्था 1.रोपा अवस्था 2.फुलकळी अवस्था 3. फुलोऱ्याची अवस्था. 4.दाणे भरण्याची अवस्था व संवेदनशील अवस्थेत पाण्याचा ताण पडू देऊ नये. फुलकळी अवस्था ते दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडत पडल्यास दाणे पोकळ राहतात व उत्पादनात घट येते.

सूर्यफुलाचे दाणे भरणे:

सूर्यफुली ही वनस्पती स्वपरागसंचित नसल्यामुळे कृत्रिमरित्या परागीकरण घडवून आणल्यास उत्पादनात भरीव वाढ होते. त्यासाठी मधमाशांचे पोळे शेतात त्यांच्या घरट्यात ठेवल्यास मधमाश्या मध गोळा करीत असताना त्यांच्या पायाला व अंगाला परागकण चिटकून एका फुलावरून दुसऱ्यावर नेऊन टाकले जातात व त्यामुळे बीजधारणेस मदत होते. तसेच 7 ते 8 दिवस फुल उमल्यालनंतर सकाळी 9 ते 11 या वेळेत फुलावरून हात फिरविल्यास किंवा एक फुल दुसऱ्या फुलावर घासल्यास बाह्य परागीकरणास मदत होते. त्यामुळे दाणे चांगले भरण्यास आपोआप मदत होते व उत्पादनात 20 ते 25% वाढ होते.

पिकावरील किडी आणि रोग:

तांबेरा: प्रथम कोवळ्या पानावर बुरशीचे पुरळ दिसतात. त्यानंतर खोड, पानांचे देठ पाकळ्यांवर पसरतात. रोगप्रतिकारक वाणांची लागवड करावी. मॅन्कोझेब किंवा झायनेब या बुरशीनाशकाची 0.2 ते 0.3 टक्के द्रावणाची पिकावर 2 ते 3 वेळा फवारणी करावी रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत.

करपा: या रोगामुळे सूर्यफुलाचे उत्पादन 27 ते 80 टक्के आणि तेलाचे उत्पादन 17 ते 33 टक्के पर्यंत घटते. बियांची प्रत बिघडते खालच्या पानावर, नंतर मधल्या पानावर व अखेरीस वरच्या पानावर ठिपके दिसतात. हे ठिपके गर्द तपकिरी ते काळ्या रंगाचे व गोलाकार असतात. मॅन्कोझेब 0.3% द्रावणाची फवारणी 7 ते 10 दिवसाच्या अंतराने 3 ते 4 वेळा करावी.

तुडतुडे: रंग फिक्कट हिरवा असतो. पंखांच्या शेवटच्या भागावर प्रत्येकी एक काळा ठिपका असतो व त्यांची चाल तिरपी असते. तुडतुडे पाण्याच्या मागील भागावर शिरांवरती आढळतात व ते पानातील रस शोषण करतात. पानपेशीमध्ये त्यांचा लाळेतील विषारी रस सोडत असल्याने पानाच्या कडा पिवळ्या पडतात. जास्त प्रादुर्भाव झाला असल्यास पाने वळतात तसेच फुले व पाकळ्यांवरसुद्धा किडींचा प्रादुर्भाव होतो. तसेच झाडाची वाढ खुंटते.

तुडतुड्यांच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी नत्राची मात्रा शिफारशीप्रमाणे द्यावी. मिनेझोल 1 लिटर मध्ये 1 मीली किंवा डायमिथोएट 10 लिटर पाण्यामध्ये 15 मिली डीडीव्हीटी 10 लिटरमध्ये 10 मिली मोनोक्रोटोफॉस 10 लिटरमध्ये 10 मिली पंधरा दिवसाच्या फरकाने आलटून पालटून फवारावे.

केसाळ अळी: या किडीस बहुभक्षी अळी म्हणतात या किडीचा पतंग मध्यम आकाराचा असून गुलाबी पिवळ्या रंगाचा असतो दोन्ही पंख जोडीवर अनेक काळे ठिपके असतात. मादी पतंग पानाच्या मागील बाजूवर गोलाकार अंडी पुंजक्यात, पण समांतर ओळीमध्ये टाकते. या किडीच्या पूर्ण जीवनक्रमास साधारणपणे दीड महिन्याचा अवधी असतो.

या अळ्या पाण्याच्या खालील बाजूवर राहून त्यातील हरितद्रव्य खातात. त्यामुळे पाणी जाळीदार होतात. तीव्र प्रादुर्भावित त्या झाडाचे केवळ खोडच शिल्लक ठेवतात. अंडीपुंज व जाळीदार पाने अळ्यासहित काढून नष्ट करावीत. तसेच प्रादुर्भाव आढळून आल्यास कार्बारिल पावडर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करावी.

काढणी व मळणी: Sunflower Cultivation 2025

सूर्यफुलाची पाने पिवळी दिसू लागली व फुलांचा मागील भाग पिवळा पडू लागला म्हणजे पीक काढणीला तयार झाले असे समजावे. मळणी यंत्राच्या साह्याने मळणी व उफणणी ही दोन्ही कामे करून घ्यावीत. फुले चांगली वाळलेली असतील तर मळणी यंत्राच्या बोल्टाच्या संख्येत 3 ते 4 ने घट करावी. तसेच चांगल्या वाळलेल्या फुलावर थोडे पाणी शिंपडावे, त्यामुळे दाणे फुटण्याचे प्रमाण कमी होते.

उत्पादनवाढीसाठी महत्वाच्या टिप्स:

  • पीक फुलोऱ्यात असताना सकाळी 7 ते 11 या वेळेत हाताला तलम कापड गुंडाळून फुलाच्या तबकावरून हळुवार हात फिरवावा. कृत्रिम परागीभवन होऊन दाणे भरण्याचे प्रमाण वाढते.
  • सूर्यकुलाच्या फुल उमलण्याच्या अवस्थेत व त्यानंतर आठ दिवसांनी 2 ग्रॅम बोरॅक्स प्रति लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करावी. दाणे भरण्याचे प्रमाण व दाण्याचे वजन वाढते.
  • सूर्यफूल पिकाची फेरपालट करावी सूर्यफुलाची मुळे जमिनीत खोलवर जातात. दरवर्षी एका जमिनीत वारंवार हे पीक घेतल्यास जमिनीचा पोत बिघडतो तसेच रोग व किडीचा प्रादुर्भाव वाढतो. त्यासाठी कमीत कमी 3 वर्षे तरी त्याच जमिनीत सूर्यफुलाचे पीक घेऊ नये.
  • परागीभवन होण्यासाठी प्रती हेक्टरी 4 ते 5 मधमाशांच्या पेट्या ठेवाव्यात. पीक फुलोऱ्यात असताना कीटकनाशकांची फवारणी करू नये. त्यामध्ये मधमाशांची क्रियाशीलता कमी होते. अगदीच आवश्यक्य असेल तरच कीटकनाशकांची संध्याकाळच्या वेळेस फवारणी करावी.
  • सूर्यफुलाचे पीक थोड्या क्षेत्रावर अथवा विलग घेतल्याने पक्षांपासून जास्त नुकसान होते. सूर्यफुलाचे पीक शक्यतो मोठ्या क्षेत्रात सलग घ्यावे.
  • जागतिक पातळीवर खाद्य तेल उत्पादनामध्ये भुईमुगानंतर सूर्यफूल हे दुसऱ्या क्रमांकावर आहे.
  • सूर्यफुलांच्या बियांमध्ये 35 ते 45 टक्के तेलाचे प्रमाण असते. या तेलामध्ये असलेले 68% लिनोलिक आम्ल रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करून, उत्तम रक्ताभिसरनाकरिता उपयुक्त ठरते. त्यामुळे हृदयरोगी व्यक्तींच्या आहारात सूर्यफुलाचे तेल आवश्यक आहे.

इतर माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment