राज्यातील ‘या’ शहरांना उष्णतेच्या लाटेचा इशारा; वाचा काय सांगत आहेत हवामान तज्ञ..Summer Weather News 2025

Summer Weather News 2025 मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात 9, 10, आणि 11 मार्च रोजी उष्णतेची लाट येईल, अशी माहिती माजी हवामान अधिकारी कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.

Summer Weather News 2025

WhatsApp Group Join Now

मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटा, तर दक्षिण कोकणातील काही भागात उष्णतेच्या लाटा येतील, असेही त्यांनी सांगितले.

मुंबईचे कमाल तापमान शुक्रवारी 35.8 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून, बुधवार पर्यंत यात आणखी वाढ होणार आहे. तर हवामान अभ्यासात आश्रेया शेट्टी यांनी सांगितले की, पूर्वेकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे तापमानत वाढ होत आहे.

12 मार्चपर्यंत मुंबई महानगर प्रदेशात उष्णतेचे लाटेची शक्यता आहे. पालघर, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण मध्ये ४० अंश तापमान नोंदविले जाईल. रविवार ते मंगळवार दरम्यान उन्हाचा तडाखा तीव्र असू शकतो.

Summer Weather News 2025 उष्णतेची लाट म्हणजे काय ?

कोकणात उष्णतेची लाट म्हणजे दिवसाचे कमाल तापमान 34 अंशापेक्षा अधिक नोंदविले जाईल. ते त्या दिवसाच्या सरासरी तापमानापेक्षा 4 अंशानी जास्त असेल.

शासकीय योजनांच्या लाभासाठी शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य

WhatsApp Group Join Now

Summer Weather News 2025 कुठे किती पारा ?

अलिबाग36.6
छत्रपती संभाजी नगर36.2
बीड36
जळगाव36.3
कोल्हापूर36.6
मुंबई35.8
पालघर36.3
रत्नागिरी37.3
सांगली37.2

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment