Summer Crop 2025 रब्बी हंगामातील पिके आता काढणीला आली आहेत. त्यामुळे येत्या काळात आता शेतकऱ्यांचा कल उन्हाळी पिक (Summer Crop 2025) घेण्याकडे वाढवताना दिसत आहे. आता उन्हाळी हंगामातील पिकांच्या कामात शेतकरी गुंताना दिसत आहेत.

हिंगोली जिल्ह्यात खरीप रब्बी हंगामा सह उन्हाळी पिक घेणार शेतकऱ्यांची संख्या ही मोठी आहे. आत्तापर्यंत 11 हजार 426 हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे.
यात भुईमूग, ज्वारी, तीळ पिकाला (Groundnut, Sorghum, Sesame) जास्त पसंती असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे ही पिके शेतकऱ्यांना मालामाल करणार का ? याकडे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामात 3 लाख 82 हजार 902 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. तर रब्बी हंगामात 1 लाख 44 हजार हेक्टर क्षेत्रापेक्षा जास्त पेरणी झाली होती. खरीप हंगामात अतिवृष्टी झाल्याने रब्बी हंगामावर शेतकऱ्यांची आशा होती. रब्बी हंगामाने शेतकऱ्यांना चांगली साथ दिली.
हरभरा, गहू पिकाची काढणी सुरू आहे. आता एका वर्षात तीन पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे सिंचनाची सुविधा उपलब्ध असलेले शेतकरी उन्हाळी पेरणीच्या कामात गुंतले आहेत.
‘किसान सन्मान’ योजनेमधून आता वर्षाला 15 हजार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
आत्तापर्यंत तब्बल 11 हजार 426 हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी पिकाचा पेरा झाला आहे. यात उन्हाळी ज्वारीसह, भुईमूग, तीळ पिकाला सर्वाधिक पसंती असल्याचे दिसून येत आहे.
उन्हाच्या झळा आणि चारा उपलब्ध नसल्याचा परिणाम थेट जनावरांच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे उन्हाळी पिकांबरोबर चारा पिकांची ही व्यवस्था या उद्देशाने शेतकरी आता उन्हाळी पिकांकडे लागवड करताना दिसत आहे.
मूग, उडीद आणि सोयाबीन Summer Crop 2025
यंदा उन्हाळी हंगामात मूग, उडीद आणि सोयाबीन पिकालाही पसंती दिली आहे. आगामी हंगामात पेरणीसाठी बियाणे उपलब्ध होईल, या उद्देशाने ही पेरणी केल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे या पिकाला किती क्विंटलचा उतारा येतो याकडे लक्ष लागले आहे.
जनावरांच्या चाऱ्याची चिंता मिटणार
खरीप व रब्बी तसेच उन्हाळी हंगामातही ज्वारीची पेरणी केली जात आहे. मका पीक ही तिन्ही हंगामात घेण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. त्यामुळे यातून चारा उपलब्ध होणार आहे.
यंदाच्या उन्हाळी हंगामात ही आत्तापर्यंत ज्वारी 1 हजार 406 हेक्टर, मका पिकाची 159 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

7 हजार 459 हेक्टरवर भुईमूग पीक
बाजारात शेंगदाण्याचा भाव 120 ते 150 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी 7 हजार 459 हेक्टर क्षेत्रावर भुईमूग पीक घेतले आहे. यातून जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
बाजारात भुईमुगाचा भाव असाच राहिला तर हे पीक शेतकऱ्यांना मालामाल करू शकते.
Summer Crop 2025 उन्हाळी हंगामातील पेरणी
पिक | हेक्टर |
मका | 159 |
ज्वारी | 1,406 |
मूग | 483 |
उडीद | 07 |
भुईमूग | 7,449 |
सूर्यफूल | 65 |
तीळ | 1,232 |
सोयाबीन | 96 |
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |