ऊस बेणेमळा व्यवस्थापन!! Sugarcane Weed Management 2025

Sugarcane Weed Management 2025 महाराष्ट्रातील ऊसाची उत्पादकता बरेच वर्षापसून वाढत नाही त्यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत परंतु ऊसाच्या बियाण्याकडे शेतकऱ्यांचे होणारे दुर्लक्ष हा एक महत्वाचा घटक आहे.

Sugarcane Weed Management 2025

Sugarcane Weed Management 2025 अनेक वेळा कारखान्याला गळितास पाठविण्याच्या ऊसामधूनच ऊस बेणे निवडले जाते. हे बेणे उपलब्ध होण्यासाठी शेतकऱ्यांनी त्रिस्तरीय बेणेमळ्यातीलच बेणे वापरायला हवे आणि ते किमान 3 ते 4 वर्षातून एकदा बदलणे आवश्यक आहे. शुद्ध निरोगी व 9 ते 11 महिने वयाचे बेणे वापरल्यास ऊस उत्पदनामध्ये 10 ते 15 टक्के वाढ होते.

राज्याच्या हवामानात बदल होणार; रजेवर गेलेला पाऊस दिवाळीत ‘या’ भागात हजेरी लावणार!!

Sugarcane Weed Management 2025 महाराष्ट्रात बहुतांश साखर कारखान्यांकडे काही प्रमाणात स्वतःचा बेणेमळा आहे. त्यामधून शेतकऱ्यांना शुद्ध व निरोगी ऊस बेणे पुरवठा करणे शक्य आहे. यामुळे ऊस व साखर उत्पादनात वाढ होण्यास निश्चितच मदत होईल 5000 मे. टन गाळप क्षमतेच्या साखर कारखान्यास साधरणपणे 10,000 हेक्टर क्षेत्र ऊसासाठी असणे गरजेचे आहे.

WhatsApp Group Join Now

यापैकी साधारणपणे 40 टक्के क्षेत्र 4000 हेक्टर खोडव्याखाली असणे गरजेचे आहे. म्हणजेच दरवर्षी 6000 हेक्टर क्षेत्र व नवीन लागण होते. यापैकी 33% क्षेत्रावरील बेणे प्रत्येक वर्षी बदलावयाचे झाल्यास 2000 क्षेत्रावरील ऊस बेणे बदलावे लागेल. बेणेवाढीचे प्रमाण सर्वसाधारणपणे 1:10 ते 1:12 असे धरल्यास 2000 हेक्टर लागणीच्या क्षेत्राकरिता साखर कारखान्याकडे 200 हेक्टर क्षेत्रावर प्रमाणित ऊस बेणेमळा असणे गरजेचे आहे.

प्रमाणित ऊस बेणेमळा करणेसाठी कृषी विद्यापीठ व संशोधन केंद्र यांच्याकडून मूलभूत ऊस बेणे आणावे व त्यापासून पायाभूत बेणे तयार करावे. त्यानंतर पायाभूत बेण्यापासून आवश्यक त्याप्रमाणात प्रमाणित ऊस बेणेमळा करावा व हे बेणे लागणीसाठी वापरावे. ऊस बेणेमळ्यातील बेणे न वापरल्यास अप्रसारित जातीचे, कीड व रोग व ग्रस्त किंवा भेसळीच्या बियाणाची लागण होते व त्याचा परिणाम उसाच्या उत्पादनावर व पर्यायाने साखर उतार व उत्पादनावर होतो.

ऊस बेणे मळयासाठी जमीन व पूर्व मशागत:

ऊस बेणे मळ्यासाठी मध्यम ते भारी व चांगल्या निचऱ्याची जमीन निवडावी. यासाठी उभी आडवी खोल नांगरट करून ढेकळे फोडून, धसकटे, तणे इत्यादी वेचून घ्यावे व कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भूसभुशीत करावी. दुसऱ्या नांगरटीपूर्वी हेक्टरी 100 बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे. कुळवणी नंतर मैंद चालवून जमीन सपाट करावी व नंतर रिजरच्या साहाय्याने मध्यम जमिनीत 100 सेंटीमीटर तर भारी जमिनीत 120 सेंटीमीटर अंतरावर सऱ्या काढाव्यात व त्यानंतर रान बांधणी करावी.

WhatsApp Group Join Now

बेणे निवड: Sugarcane Weed Management 2025

बेणे मळ्यासाठी सुधारित जातीचे शुद्ध व भेसळविहिरीत पायाभूत बेणे असावे. बेणे जाड रसरशीत लांब कांड्याचे व निरोगी असावे. बेणे 3 ते 4 वर्षातून एकदा शासकीय किंवा कृषी विद्यापीठाच्या संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर वाढविलेल्या रोपमाळ्यातून पायाभूत बेणे घ्यावी. बेण्याची अनुवंशिकीय शुद्धता 100% असावी तर भौतिक शुद्धता 98% असावी. बेणे कीड व रोगमुक्त असावे. बेणे 9 ते 11 महिने वयाचे असावे. खोडवा ऊस बेण्यासाठी वापरू नये. बेणे तोडल्यापासून शक्यतो 24 तासाच्या आत त्यांची लागण करावी.

बेणे मळा लागण: Sugarcane Weed Management 2025

ऊस बेणे मळ्याची लागण अशावेळी करावी जेणेकरून पुढील वर्षी लागवडीच्या वेळी बेणेचे वय 9 ते 11 महिने असेल. बेणेमळा लागवडीसाठी हेक्टरी 25,000 दोन डोळ्यांचे टिपरी वापरावीत. लागण करतेवेळी उसावरील पाचट हाताने साळवे, वाढे तोडावेत व डोळ्याच्या वर टिपरीचा 1 ते 3 व डोळ्याच्या खाली 2 ते 3 ठेवून धारदार कोयत्याने बेणे तोडावे. दोन टिपरीमधील अंतर 15 ते 20 से.मी. ठेवावे व दोन्ही डोळे बाजूला येतील याची काळजी घ्यावी. एक हेक्टर क्षेत्रावर तयार होणारे ऊस बेणे साधारणपणे 10 ते 12 हेक्टर ऊस लागवडीस पुरेसे होते. यावरून शेतकऱ्यांनी आपल्या बेणे मळ्याचे क्षेत्र ठरवावे.

बेणे प्रक्रिया: Sugarcane Weed Management 2025

ऊस बेणे मळ्यामध्ये रोग व किडींचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मेलाथॉन 50 टक्के प्रवाही 300 मि.ली. + बाविस्टीन 100 ग्रॅम प्रती हेक्टरी 100 लिटर पाण्यातून मिसळवून या द्रावणात ऊस बेणे 10 मिनिटे बुडवावे.

बुरशीनाशकाची प्रक्रिया केलेले बेणे अर्धा तास सुकल्यानंतर 100 लिटर पाण्यामध्ये ऍसेटोबॅक्टर 10 किलो आणि स्फुरद विरघळवणारे जिवाणू सव्वा किलो विरघळावे. अशा द्रावणामध्ये हे बेणे 30 मिनिटे बुडवावे. त्यामुळे ऍसेटोबॅक्टर जिवाणू बेण्याच्या पेशींमध्ये प्रवेश करून नत्राची बचत करतात आणि स्फुरद विरघळविणारे जिवाणू जमिनीतील स्फुरद उस वाढवण्यासाठी उपलब्ध करून देतात. अशा प्रकारच्या जीवाणूच्या बीजप्रक्रियेमुळे नत्रामध्ये 50% तर स्फुरदाच्या मात्रेत 25 टक्के बचत होते.

एकात्मिक खत व्यवस्थापन:

बेणे मळ्यासाठी नेहमीच्या ऊसापेक्षा जास्त प्रमाणात खते द्यावी लागतात. त्यामुळे ऊस जाड, रसरशीत, डोळे फूगीर आणि तेजदार राहतात. उसात नत्राचे व ग्लुकोजचे प्रमाण वाढते व याचा फायदा ऊस उगवणीसाठी होतो. बेणे मळ्यासाठी नत्र हे नऊ हप्त्यांमध्ये तर स्फुरद आणि पालाश हि अन्नद्रव्ये दोन हप्त्यांमध्ये विभागून द्यावीत.

सूक्ष्म अन्नद्रव्ये:

Sugarcane Weed Management 2025 ऊस बेणेमळ्यासाठी माती परीक्षण करून घेणे महत्वाचे आहे. त्यानुसार जमिनीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असल्यास 25 किलो फेरस सल्फेट 20 किलो झिंक सल्फेट 10 किलो मॅगनीज सल्फेट आणि 5 किलो बोरॅक्स प्रति हेक्टरी द्यावे.

बेणेमळ्यासाठी आंतरमशागत:

ऊस एक महिन्याचा असताना नांग्या पडलेल्या असल्यास त्या भरून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी लागण करतेवेळीच पाण्याच्या पाटात जास्त एक डोळ्याच्या टिपऱ्या लावून या रोपांचा वापर करावा किंवा एक डोळा पद्धतीने पिशवीत रोपे तयार करावीत व पाणी द्यावे. ऊस उगवणीनंतर 2 महिन्यांनी नत्र खताचा तिसरा हप्ता 100 किलो नत्र देऊन कृषिराज औजाराच्या साहाय्याने वरंबे फोडून सायन कुळवाच्या साहाय्याने दोन ओळींमधील जमीन कुळवून सपाट करावी. त्यानंतर रिजरच्या साह्याने सऱ्या काढून ऊसास मातीची भर द्यावी.

एकात्मिक तण व्यवस्थापन:

ऊसाचे पीक पहिल्या 90 दिवसांपर्यंत तण विहरीत ठेवावे त्यासाठी ऍट्रॅझिन हेक्टरी 2 किलो क्रियाशील घटक म्हणजेच हेक्टरी 5 किलो अट्रॅटफ किंवा मेट्रीब्युझीन हेक्टरी 1 किलो क्रियाशील घटक म्हणजेच हेक्‍टरी 1.5 किलो सेन्कार 1000 लिटर पाण्यात मिसळून ऊस लागवडीनंतर 3 ते 4 दिवसांनी वाफसा असताना फवारावे.

फवारणीनंतर 3 ते 4 दिवस कसल्याही प्रकारची मशागत करू नये. तणांचे प्रमाण जास्त असल्यास लागणीनंतर 20 ते 25 दिवसांनी 2,4-डी हेक्‍टरी 1 किलो क्रियाशील घटक म्हणजेच 1.250 किलो 500 लिटर पाण्यात मिसळून या तणशकाची फवारणी करावी. तणनाशक पिकावर पडू देऊ नये प्लास्टिक हूढचा वापर करावा.

पाणी नियोजन:

बेणे मळ्यासाठी नेहमीच्या उसापेक्षा वरचेवर पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. सर्वसाधारणपणे हलक्या जमिनीमध्ये 8 ते 10 दिवसाच्या अंतराने आणि मध्यम ते भारी जमिनीत 12 ते 16 दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. पाण्याचा ताण पडू देऊ नये. पाण्याचा ताण पडल्यास ऊसास दशी पडून पोकळ होतो तसेच पेरे आखूड पडते आणि डोळे निस्तेज होऊन उगवणीनंतर विपरीत परिणाम होतो म्हणून तोडणीपर्यंत पाणी नियमित द्यावे.

हंगामकालावधीदोन पाण्यातील अंतरएकूण पाणी पाळ्या
हिवाळा नोव्हेंबर ते फेब्रुवारी18 ते 20 दिवसांनी28 ते 30
उन्हाळा मार्च ते जून8 ते 10 दिवसांनी
पावसाळाजुलै ते ऑक्टोबर12 ते 15 दिवसांनी

बेणेमळ्यातील उसाची तोडणी:

ऊस लागवडीसाठी बेणेमळ्यातील उसाची तोडणी ऊस 9 ते 11 महिन्याचा असताना करावे. नेहमीच्या उसासारखे पाणी अगोदरच तोडू नये. उसाचे तोडणी जमिनीलगत करावी. अशा प्रकारे बेणे मळ्याची काळजी घेतली तर शुद्ध आणि निरोगी बेण्याचा वेळेवर पुरवठा होऊन उसाची लागण वेळेवर करता येईल आणि प्रति हेक्टरी ऊस उत्पादन वाढण्यास निश्चितच मदत होईल.

इतर माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment