ऊसावरील किडी व उपाय!! Sugarcane Pests and Remedies 2025

Sugarcane Pests and Remedies 2025 उसामध्ये 200 पेक्षा जास्त किडींची नोंद आहे. महाराष्ट्रात त्यातले 25 प्रकार आढळतात. काहींची माहिती पुढील प्रमाणे आहे.

Sugarcane Pests and Remedies 2025

खोड कीड: किडीचा प्रादुर्भाव : Sugarcane Pests and Remedies 2025 या किडीचा प्रादुर्भाव लागणीपासून ते मोठ्या बांधणीपर्यंत होतो. हलकी जमीन, कमी पाणी, जास्त तापमानात दाट लागण अशी परिस्थिती असेल तेव्हा खोड कीड वाढते. याचा प्रादुर्भाव झालेला रोपट्यांच्या बुडघ्याजवळ छिद्र पडलेले असते. आणि सुरळी वाळलेली असते. ही कीड आधी मातृकोंभ खाते, नंतर दुसरा व तिसरा फुटवा भक्षस्थानी पडतो. अंडे, अळी, कोश, आणि पतंग अशा यांच्या जीवनक्रमाच्या चार अवस्था आहेत.

राज्यात ‘या’ जिल्ह्यात ऊसाचे बंपर पीक; यंदा 40 लाख टनाने गाळप वाढणार!!

Sugarcane Pests and Remedies 2025 उपाय:

रुंद सरी (4 ते 5 फूट ) व लागणीचे अंतर 1.5 ते 2 फुट तसेच खोल सरी यामुळे प्रादुर्भाव कमी होतो.

कांदा, लसूण, पालक , कोथिंबीर यांसारख्या आंतरपिकाने खोड किडीचे प्रमाण कमी होते. पण मक्यामुळे वाढते.

WhatsApp Group Join Now

पाचटाच्या आच्छादनामुळे अळीला बुडख्यापर्यंत पोहोचायला अडथळा येतो त्यामुळे खोड कीड कमी होते.

पीक दीड महिन्याचे झाल्यावर बाळभरणी करावी त्यामुळे खोडावरचे छिद्र मुजून जाते. पतंग बाहेर पडून शकत नाही पुढचे प्रजनन टळते.

प्रति एकरी 10 फोरमन सापळे उसाच्या उंचीच्या 1 फूट वर लावल्यास नर पतंग अडकून पुढचे प्रजनन टळते.

लागणीच्या वेळी आणि त्यानंतर महिन्याचे एकरी 8 किलो रिजंट किंवा फोरेट 10 % बुडख्यापाशी द्यावे.

बीजप्रकिया करावी त्यामुळे कीड नियंत्रित होते.

WhatsApp Group Join Now

हुमणी : किडीचा प्रादुर्भाव : Sugarcane Pests and Remedies 2025 पहिल्या अवस्थेतील अळी जमिनीतल्या सेंद्रिय घटकावर वाढते. उसाची कोवळी जिवंत मुळेसुद्धा त्याचे भक्ष असते. दुसऱ्या व तिसऱ्या अवस्थेतील अळ्या उसाचे मुळे खातात. त्यामुळे अन्नपाणी शोषण बंद पडते. ऊस मरगळतो पाने मलुल होऊन पिवळी पडतात. तीन आठवड्यात वाळून जातात. ऊस वाळतो वाळलेल्या उसाच्या बुडात 15 ते 20 आळ्या असतात. एक अळी उसाचे एक बेट तीन महिन्यात संपवते दोन आळा एका महिन्यात सर्व मुळ्या खातात.

नियंत्रण:

होलोट्रकिया हुमणीच्या नियंत्रण बहुतांश प्रकारांनी करावे लागते भुंगरे व अळी हे लक्ष्य ठेऊन उपाययोजना करावी लागते नांगरट ढेकळे फोडणे इ. उन्हाळी मशागतीमुळे पक्षाद्वारे अळ्या टिपल्या जातात ढेकळे बारीक केली म्हणजे किडीला लपायला जगाला राहत नाही.

सूर्यफुलासारखे पीक घेतल्यास यजमान पिकाची साखळी तुटते भुईमुगाचे आंतरपीक सापळा पीक म्हणून काम करते. पीक कोमेजू लागली की ओळखावे तेथे हुमणी आहे ती मारून टाकावी.

कडुलिंब, बाभूळ, गुलमोहर अशा शेताच्या आसपासच्या झाडाझुडपावर 50% फोलिडोल पावडर 100 ग्रॅम प्रति 50 लिटर पाण्यातून मिसळून फवारणी करावी.

तोडणी नंतर शेत स्वच्छ करावे फार प्रादुर्भाव असेल तर खोडवा घेऊ नये.

पिकाचे काढणी झाल्यावर रोटावेटर मशागत करावी.

मैना, कावळे, चिमण्या, बगळे, घार, मुंगूस, मांजर, कुत्रा, हे हुमणीचे शत्रू असून शेतामध्ये त्यांना आकर्षित करावे.

बिव्हेरिया मेटारायझिय व इ पी एन हे जैविक शत्रू आहेत त्यांचा योग्य उपयोग करावा गांडूळखत किंवा कंपोस्ट मध्ये मिसळून द्यावे.

एक गाडी शेणखतात चार टक्के मॅलॅथिऑन बुकटी एक किलो मिसळून ती शेणखत शेतात वापरावे.

लागणीच्या वेळी एकरी 10 कि रिजंट अथवा देवीबान 8 कि जमिनीत मिसळावे.

प्रादुर्भाव दिसल्यास 10 लिटर पाण्यात 25 मिली फ्लोरोपायरीफॉर आणि 15 मिली सायपरमेथ्रीन मिसळून दर 4 दिवसांनी एकदा अशी 4-5 वेळा आळवणी करावी.

कांडेकीड : किडीचा प्रादुर्भाव : Sugarcane Pests and Remedies 2025 भरपूर तापमान, कमी आद्रता, कमी पाऊस, अशा परिस्थितीत कांडेकिडीचा प्रादुर्भाव आढळून येतो. जमिनीत असलेल्या कांड्या पोखरलेल्या व तांबड्या रंगाच्या दिसतात. आत विष्टा सापडतात लहान ऊसात पोंगामर होते. उसाची वाढ खुंटते कांड्या लहान होतात. याची अळी फिकट पिवळसर नंतर दुधासारखी पांढरी असते. डोके पिवळसर लाल असते.

Sugarcane Pests and Remedies 2025 उपाय:

प्रादुर्भाव जास्त असेल तर खोडवा टाळावा.

कडधान्य, तेलबिया, भाजीपाला अशी फेरपालिटीची पिके घ्यावीत.

क्लोरोपायरीफॉस 2 लिटर 400 लिटर पाण्यातून मिसळून ड्रेचिंग करावे.

फेब्रुवारी व जुलैमध्ये एकरी 10 किलो क्विनॉलफॉस शेतामध्ये घालावे.

कीडग्रस्त क्षेत्रात एकरी 1 लाख 20 हजार परोपजीवी जमीन ट्रायकोड्रमा सोडावेत.

शेंडे अळी : किडीचा प्रादुर्भाव : उसाच्या उगवणी पासून तोडणी पर्यंत केव्हाही याचा प्रादुर्भाव होतो. भरपूर आद्रता, उशिरा येणारा पाऊस, मध्यम तापमान अशा परिस्थितीत प्रादुर्भाव जास्त होतो. ऑक्टोबर मध्ये अशी परिस्थिती निर्माण होत असते. उसाच्या शेंड्याला खूप पाने येतात. पानावर ओळीने आडवी छिद्र दिसतात. उभ्या उसाचे डोळे फुगतात. शेंडा वाढला तरी सहसा सहजी उपसून येत नाही. पाण्याच्या पाठीमागे लाल केशरी अंडी पुंजक्यात दिसतात. अळी मात्र मोत्याच्या माळीप्रमाणे दुधाळ रंगाची असते. शेंड्यांकडील कोवळ्या काड्या पोखरतात.

Sugarcane Pests and Remedies 2025 उपाय:

कीडग्रस्त उसाच्या प्रत्येक पोंग्यात 1 ग्रॅम कार्बोफ्युरॉन घालावे.

एकरी 10 किलो कार्बोफ्युरॉन घालावे.

प्रकाश सापळे लाऊन पतंगाचा नायनाट करावा.

पीक लहान असेल तर कीडग्रस्त ऊस उपटून नष्ट करावेत.

खवले कीड : किडीचा प्रादुर्भाव : ही कीड खोडव्यामध्ये जास्त प्रमाणात आढळते. राखाडी तपकिरी अशा गोल आकाराच्या किडीचे थर उसाच्या कांड्यांवर दिसतात. खवले पांढरे दिसतात. कांड्यांवर सुरकुत्या येतात. त्याची लांबी व जाडी कमी होते. हलकी जमीन, अनियमित पाण्याची पाळी, व दुर्लक्षित व्यवस्थापन यामुळे ही कीड वाढते.

Sugarcane Pests and Remedies 2025 उपाय:

बीजप्रक्रिया प्रति लिटर पाण्यात 3 मिलि मॅलॅथिऑन द्रावण करून त्यात बियाणे 15 मिनिटे बुडवून लागण करावी.

कांड्या सुटण्याच्या अवस्थेत प्रतिलिटर पाण्यात 3 मिली डायमेथोएट फवारणी करावी.

कीडग्रस्त फडातील खालची मरकी, वाळकी, किडकी पाने काढून टाकावीत.

बिव्हेरिया 4 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात जैविक कीडनाशकाचा वापर करावा.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment